उजनी धरणाची माहिती

Categorized as Blog

उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात विमानगर या गावामध्ये आहे. हे धरण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख धरणापैकी आहे. कोयना आणि जायकवाडी या धरणांनंतर या उजनी धरणाचा तिसरा क्रमांक लागतो, याचे बांधकाम 1969 या वर्षी सुरू केले गेले. साधारण 11 वर्ष या धरणाचे बांधकाम चालू होते.

उजनी धरणात पुण्यातील मुळा आणि मुठा मधून पाणी येते. येथील परिसरात इकडे मत्स्यपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जाते. याची उंची साधारण 56.4 मीटर असून लांबी 2534 मीटर आहे. या धरणात 50.85 टीएमसी म्हणजे 50850 दशलक्ष घनफुट इतके पाणी साठवणूक करता येते.

उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर म्हणून ओळखले जाते. या लेखात आपण उजनी धरणाची माहिती जाणून घेणार आहोत.

उजनी धरणाची माहिती

नावउजनी धरण
यशवंत सागर
ठिकाणउजनी, माढा
सोलापूर
प्रकार सिंचन
उंची56.4 मीटर
लांबी2534 मीटर
पाणी साठवणूक क्षमता117 टीएमसी
वीजनिर्मिती21 गिगाहर्ट प्रतीतास
दरवाजे41

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी येथे भीमा नदीवरील धरण आहे. या धरणाच्या जागेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या धरणाची जागा पारेवाडीजवळ ठरली होती, पण सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना याचा फायदा व्हावा, या हेतूने आनंद कोठडिया जागा बदलण्याचा सल्ला दिला. नामदेवराव जगताप यांनी या कामास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.

उजनी धरणाचे पाणी पंढरपूर आणि मंगळवेढा त्याचबरोबर आजूबाजूच्या गावाला पिण्यासाठी वापरले जाते. येथील परिसरात तीस ते चाळीस साखर कारखाने या धरणावर अवलंबून आहेत.

उजनी धरण इतके मोठे आहे, की ते बांधताना 29 गावे पाण्याखाली गेली होती. धरणातील पाण्याचा पुणे,सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतीला भरपूर फायदा होत आहे.

या ठिकाणी पळसदेव मंदिर आणि इनामदार वाडा पाहायला मिळतो. पळसदेव मंदिर यादवकालीन आहे. या ठिकाणी पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे पाहता येतात. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, भंगलेला घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक गोष्टी धरणातील पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळतात.

उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे एक गाव आहे.

भिगवणपासून जवळच पळसदेव गाव आहे. गावातून गेलेला रस्ता समोर उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो. एका छोट्याशा होडीप्रवासाने पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते.

सैराट या मराठी चित्रपटात दाखवलेला इनामदारचा वाडा पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी फ्लेमिंगो हा परदेशी पक्षी आढळतो. हा पक्षी हिवाळा ऋतूमध्ये पाहायला मिळतो.

धरणाच्या पाण्यात पळसनाथ हे मंदिर आहे, जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली की ते पाहता येते. या धरणाचा फुगवटा हा खूप मोठा आहे.

FAQs

उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

उजनी धरण हे भीमा नदीवर बांधलेले आहे.

उजनी धरण जलाशयाचे नाव काय आहे?

उजनी धरण जलाशयाचे नाव यशवंत सागर आहे.

कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे.

सारांश

उजनी धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. जर तुम्हाला उजनी धरणाची माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.