जगात किती खंड आहेत व कोणते?

Categorized as Blog

पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असे म्हंटले जाते. पृथ्वीला ‘निळा ग्रह’ देखील म्हणतात. सूर्यमालेतील इतर कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नसून ती फक्त पृथ्वीवरच अवलंबून आहेत.

पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. याच जमिनीवर मानवी वस्ती अस्तित्वात आहे. जिला आपण जग, दुनिया, सृष्टी, ब्रह्मांड असे म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी जमीन एकसलग नसून ती महासागरांनी विभागलेली आहे. महासागरांनी पृथ्वीवरील 71% पृष्ठभाग व्यापला आहे.

यामुळे जमिनीवर राहणारी मानवी वस्ती खंडात विभागली गेली. खंड म्हणजे समुद्राने वेढलेला विस्तृत भूप्रदेश होय. युरोप आणि आशिया खंड सोडल्यास इतर सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे. या लेखात आपण जगात किती खंड आहेत व कोणते, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जगात किती खंड आहेत व कोणते?

विषयखंड
प्रकारमानवी वस्तीचे स्थान
एकूण खंड 7
सर्वात मोठा खंडआशिया
सर्वात लहान खंडऑस्ट्रेलिया

जगात सात खंड आहेत व ती आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक ही आहेत.

यातील आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या खंडाच्या चारही बाजूंनी महासागर आहे. तर युरोप व आशिया खंडाचा काही भाग पाण्याने वेढलेला आहे.

या सात खंडात मिळून 195 देश आहेत. या सर्व देशाची मिळून 800 कोटीहून अधिक लोकसंख्या आहे. म्हणजेच पृथ्वीवर साधारण 800 कोटीहून लोक वास्तव्यास आहेत. सुरुवातीला हे सर्व खंड एकमेकांना अपरिचित होते. पण हळूहळू मानवी शोध वाढत जाऊन सर्व खंडाचा शोध लागत गेला.

पृथ्वीवर असणाऱ्या सातही खंडांवर वेगवेगळे हवामान असते. यामुळे येथील लोकांची जीवनशैली एकमेकांहून वेगळी असते. प्रत्येक खंडात बोलली जाणारी भाषा आणि संस्कृती पूर्णतः वेगळी असते.

क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. आशिया हा खंड पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग व्यापतो. याच खंडात जगातील 10 सर्वोच्च उंच शिखरे आहेत. उदा. माउंट एव्हरेस्ट

जगातील सर्वात मोठा देश रशिया आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत आणि चीन देश आशिया खंडात आहेत. अंतराळातून दिसणारी मानवनिर्मित वस्तू एकमेव आहे, ती म्हणजे आशियातील चीनची ग्रेट वॉल आहे.

जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा व जगातील सर्वात लांब नदी नाईल आफ्रिका खंडात आहे. आफ्रिका जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. आफ्रिकेतून होमो सेपियन्सची उत्पत्ती, असे मानले जाते. जगातील 95 टक्के हिरे आणि 50 टक्के सोने आफ्रिकेतून येते. जगातील 66 टक्के चॉकलेटही याच खंडातून येतात.

जगातील सर्वात लहान देश, व्हॅटिकन सिटी युरोप खंडात असून जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एल्ब्रस हा याच खंडात आहे. जगातील तीन चतुर्थांश बटाट्याची पिक युरोपमध्ये घेतले जाते.

महाद्वीप आणि आशिया हे एकाच भूभागाचे आहेत, जे उरल पर्वत आणि कॅस्पियन समुद्र यांनी वेगळे केले आहेत.

उत्तर अमेरीकेमध्ये मिसिसिपी नदी आहे. ही नदी जगातील तिसरी सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. उत्तर अमेरिका हा खंड सोयाबीन, गहू व मक्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे.

उत्तर अमेरिकेत जगातील सर्वात लहान घुबड आहे. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर सुपीरियर लेक उत्तर अमेरिकेत आहे. या खंडात एकूण 23 देश आहेत.

दक्षिण अमेरिकेत जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक ब्राझील देश व जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन आहे.

दक्षिण अमेरिकेत सालार डी उयुनी हे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. एंजल फॉल्स हा जगातील सर्वात उंच धबधबा याच ठिकाणी आहे. सर्वात मोठी नदी अमेझॉन दक्षिण अमेरिकेत आहे.

ऑस्ट्रेलिया खंड हा जगातील सर्वात लहान खंड आहे. यात निलगिरीच्या झाडांच्या 500 जाती आहेत. या खंडात फक्त तीन देश आहेत. पहिला ऑस्ट्रेलिया, दुसरा पापुआ न्यू गिनी, तिसरा इंडोनेशिया. ऑस्ट्रेलियाचा दोन तृतीयांश भाग वाळवंट आहे. 2,000 किमी लांबीचा ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो.

अंटार्टिका खंडाची लोकसंख्या 1,106 आहे. जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी 70 टक्के पाणी अंटार्क्टिका खंडात आहे. या खंडात उन्हाळ्यात सरासरी तापमान -35 अंश सेल्सिअस तर हिवाळ्यात 70 अंश सेल्सिअस इतके तापमान असते.

अंटार्टिका खंडाला कोणतेही टाइम झोन नाही. पृथ्वीवरील सर्वात थंड आणि कोरडे ठिकाण म्हणून अंटार्टिका खंडाला ओळखले जाते.

FAQs

खंड म्हणजे काय?

खंड म्हणजे समुद्राने वेढलेला विस्तृत भूप्रदेश होय. खंडाला तुकडा, भाग, हिसा अशी समानार्थी शब्द आहेत.

आशिया खंडात किती देश आहेत?

आशिया खंडात 48 देश आहेत.

आफ्रिका खंडात किती देश आहेत?

आफ्रिका खंडात 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.

युरोप खंडात किती देश आहेत?

युरोप खंडात 50 देश आहेत.

अमेरिका खंडात किती देश आहेत?

अमेरिका खंडात एकूण 35 स्वतंत्र देश व 23 वसाहती आहेत.

ऑस्ट्रेलिया खंडात किती देश आहेत?

ऑस्ट्रेलिया खंडात तीन देश आहेत.

अंटार्टिका खंडात किती देश आहेत?

अंटार्टिका खंडात कोणताही देश आहेत. पण सात देश आपला भाग अंटार्टिका खंडात येतो असा दावा करतात.

आर्क्टिक खंडात किती देश आहेत?

आर्क्टिक खंडात आठ देश आहेत.

जगातील कोणता खंड श्वेत खंड म्हणून ओळखला जातो?

जगातील अंटार्टिका खंड श्वेत खंड म्हणून ओळखला जातो.

सारांश

तर मित्रांनो आशा करतो, की तुम्हाला जगात किती खंड आहेत व कोणते, याविषयी सविस्तर माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.