तुर्कस्तान देशाची माहिती

Categorized as Blog

तुर्कस्तान हा जगातील एक सुंदर देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याचा काही भाग आणि जास्तीत जास्त भाग आशिया मध्ये येतो. त्यामुळे याला युरेशिया असही म्हटल जातं. आजच्या या लेखात आपण याच तुर्कस्तान देशाची माहिती जाणून घेणार आहोत.

तुर्कस्तान देशाची माहिती

देशतुर्की
राजधानीअंकारा
सर्वात मोठे शहरइस्तंबूल
अधिकृत भाषातुर्कीश
लोकसंख्या8.43 कोटी (2020)
क्षेत्रफळ783,562 चौकिमी
राष्ट्रीय चलननवा तुर्की लिरा (TRY)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+90

तुर्कस्तानाच्या सीमा जवळजवळ आठ देशांना जोडलेल्या आहेत. या देशाला युरोप आणि आशिया यांचा पूल असं म्हटलं जातं. या देशाचा थोडासा प्रदेश युरोपमध्ये असून, बाकी पूर्ण प्रदेश युरोपमध्ये आहे. या देशात पक्षांच्या सर्वात जास्त प्रजाती पाहायला मिळतात.

तुर्कस्तान हा जगातील एकमेव मुस्लिम बहुमताचा देश आहे. जो की धर्मनिरपेक्ष आहे. या देशाची राजधानी अंकारा असून सर्वात मोठे शहर इस्तांबुल आहे. तुर्कीची जीडीपी ही जगातील 17 सर्वात मोठी जीडीपी आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त फेसबुक वापरणारे लोक याच देशातील आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसर्‍या क्रमांकावर इंग्लंड आहे.

तुर्कीमध्ये लहान मूल जन्मल्यानंतर त्याच्या पूर्ण शरीराला मिठाने पुसले जाते. याला सोल्टींग असे म्हणतात. असं म्हटलं जातं की यामुळे मुलांना वाईट परिस्थितीपासून दूर ठेवल जात.

तुर्की देशाचे इस्तांबुल जगातील एकमेव शहर आहे, जे दोन महाद्वीपामध्ये पसरलेले आहे. इस्तांबुलमधील सेंट्रल मार्केट जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे मार्केट आहे. येथे 64 गल्ल्या, 4000 दुकाने आणि 25000 लोक काम करतात.

मुस्तफा केमालपाशा याला आधुनिक तुर्कीचा निर्माता मानलं जातं. तुर्कीमध्ये लाल टोपी घालण्याला बंदी आहे. ही बंदी मुस्तफा कमाल पाशा यांनी लावली होती. त्यांना वाटत होतं की लाल रंग हा कट्टरतेचा प्रतीक आहे.

तुर्कस्तान जगातील सहाव सर्वात मोठ पर्यटन स्थळ आहे. या देशात 82 हजार 693 पेक्षाही जास्त मस्जिद आहेत त्यामुळे जगामधील सर्वात जास्त मज्जिद असणारा देश तुर्की आहे.

जगातील पहिली अंडरग्राउंड मज्जीद तुर्की मध्ये बनवली गेली होती. तसेच जगातील माणसांनी बनविलेले पहिले चर्च तुर्कीमध्ये आहे, याला केव चर्च किंवा सेंट पीटर्स चर्च म्हणतात.

तुर्कस्तानात या देशांमध्ये जवळजवळ 9000 जातींची फुले पाहायला मिळतात. यामुळे या देशात मधमाशांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं.

पत्रकारांसाठी तुर्कस्तान हा देश सर्वात धोकादायक देश आहे. आतापर्यंत या देशाने सर्वाधिक पत्रकारांना जेलमध्ये पाठवले आहे.

तुर्कस्तान क्षेत्रफळानुसार जगातील 37 वा सर्वात मोठा देश आहे. या ठिकाणी एक मोठा Grand Bazaar भरतो, ज्यामध्ये दरवर्षी जवळजवळ 9 करोड लोक खरेदी करतात.

सांताक्लॉजाचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. सांता क्लोज आणि नाताळ यांचे नाते अगदी घट्ट आहे. याच सांताक्लॉज उर्फ सेंट निकोलस याचा जन्म तुर्की मध्ये तिसऱ्या शतकामध्ये झाला होता.

तुर्कीचा फक्त तीन टक्के हिस्सा युरोपमध्ये असून, बाकी 97 टक्के प्रदेश आशिया महाद्वीपामध्ये येतो. तरीही याला युरोपीय देशांमध्ये गणले जाते.

तुर्कस्तानात  “Rahat lokum” ही जगातील सर्वात जुनी मिठाई आहे. येथील बियर मार्केट हे जगातील 12वे सर्वात मोठे बियर मार्केट आहे.

तुर्की जगामध्ये अक्रोडाचे उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. संपूर्ण जगातील 80 टक्के अक्रोड निर्यात एकटा तुर्कस्तान करतो.

जगातील टोमॅटो उत्पादनात तुर्की चौथ्या क्रमांकावर आहे. येथील तुर्कीतील शेतकरी दरवर्षी 11 मिलियन मॅट्रिक टन टोमॅटो उत्पादन करतात.

तुर्कीमधील चिमण्यांना हिंदी म्हंटले जाते. लोकांच म्हणणं आहे, की या चिमण्या हिंदुस्तानात जन्माला आल्या होत्या. या देशातील लोक देशभक्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. येथील लोक त्यांच्या देशाच्या प्रती कधीही चुकीचं बोलत नाहीत.

FAQs

तुर्की देशाची लोकसंख्या किती आहे?

तुर्की देशाची लोकसंख्या 8.43 कोटी (2020 नुसार) इतकी आहे.

तुर्कीची राजधानी कोणती आहे?

तुर्की देशाची राजधानी अंकारा आहे.

तुर्की देश कोणत्या खंडात आहे?

तुर्की देश युरोप आणि आशिया खंडात आहे.

कोणत्या वर्षी तुर्कस्तान मध्ये क्रांती झाली?

इसवी सन 1908 यावर्षी तुर्कस्तान मध्ये क्रांती झाली.

ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर कधी जिंकून घेतले?

ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर इसवी सन 1453 जिंकून घेतले.

सारांश

मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला तुर्कस्तान देशाची माहिती हा लेख नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.