भारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी – तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, हा ध्वज केसरी, पांढरा आणि हिरवा रंगाचा असून यात निळ्या रंगाचे अशोकचक्र आहेत. यातील प्रत्येक रंग भारताचे एक वैशिष्ट सांगत आहे. ज्यामध्ये केशरी रंग त्याग आणि शौर्य याचे प्रतीक आहे, तर पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृध्दीचे प्रतीक आहे.
अशोक चक्र हे धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र असून भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा यामध्ये याला स्थान देण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या बदलांची, सुधारणांची आणि प्रगतीची गतिशीलता दाखवणारे प्रतीक म्हणजे हे अशोकचक्र आहे.
या लेखात आपण भारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी जाणून घेणार आहोत. यात आपण तिरंगा विषयक माहिती जाणून घेणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – संविधानाची उद्देशिका म्हणजे काय (constitution of india in marathi)
भारतीय राष्ट्रध्वज – तिरंगा झेंड्याची माहिती

नाव | तिरंगा |
वर्णन | तीन रंग आणि अशोकचक्र यापासून बनलेला क्षैतिज आयताकृती |
रंग (प्रतीक) | केसरी – त्याग आणि शौर्य पांढरा – शांती हिरवा – समृध्दी |
अशोकचक्र | क्रियाशीलता |
वापर | नागरी वापर |
स्वीकार | 22 जुलै 1947 |
24 मार्चला 1947 रोजी इंग्रज भारत देश लवकर सोडून जाणार आहेत अशी घोषणा केल्यावर स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा यासाठी तातडीने एक समिती स्थापन करण्यात आली.
या समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख असून भारताचा झेंडा कसा असावा याविषयी मत त्यांनी मांडले आहे. त्यांनी घटना समितीपुढे काँग्रेस पक्षाचा ध्वज हाच आपला राष्ट्रीय ध्वज असावा फक्त यामध्ये चारख्याऐवजी अशोकचक्र असावे, असा प्रस्ताव ठेवला.
हा प्रस्ताव घटना समितीने 22 जुलै 1947 रोजी मंजूर केला त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र देश झाला आणि भारताच्या अधिपत्याखालील तिरंगा अधिकृत ध्वज झाला.
तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असून याला फडकवण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम आहेत. हे नियम पुढीप्रमाणे आहेत.
तिरंगा फडकवण्याचे नियम माहिती मराठी
- तिरंगा हा खादी किंवा रेशीम या कापडापासून बनविलेला असवा. तसेच लांबी आणि रुंदीचे प्रमाण 2:3 असायला हवे.
- सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये, तो नेहमी अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.
- संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.
- ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे.
- केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.
हा लेख जरूर वाचा – गोवा मुक्ती दिवस माहिती मराठी (goa liberation day information in marathi)
भारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी
हिंदी कवी श्यामलाल गुप्ता पार्षद ह्यांनी लिहिलेल्या “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।” ह्या गीतास 1938 च्या काँग्रेस आधीवेशनात झेंडा गीत म्हणून स्वीकारले.
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा सरसाने वाला,
वीरों को हरषाने वाला, मातृभूमि का तन-मन सारा।। झंडा…।
स्वतंत्रता के भीषण रण में, लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में,
कांपे शत्रु देखकर मन में, मिट जाए भय संकट सारा।। झंडा…।
इस झंडे के नीचे निर्भय, लें स्वराज्य यह अविचल निश्चय,
बोलें भारत माता की जय, स्वतंत्रता हो ध्येय हमारा।। झंडा…।
आओ! प्यारे वीरो, आओ। देश-धर्म पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ, प्यारा भारत देश हमारा।। झंडा…।
इसकी शान न जाने पाए, चाहे जान भले ही जाए,
विश्व-विजय करके दिखलाएं, तब होवे प्रण पूर्ण हमारा।। झंडा…।
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
राष्ट्रध्वजाचे तीन रंग काय दर्शवतात ?
केसरी – त्याग आणि शौर्य
पांढरा – शांती
हिरवा – समृध्दी
भारतीय ध्वज गीत कोणी लिहिले ?
भारतीय ध्वज गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.
भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली ?
पिंगली वेंकैया यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना केली.
भारतीय ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?
भारतीय ध्वज दिवस 7 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो.