बांद्रा माऊंट मेरी चर्च मुंबई माहिती

Categorized as Blog

माऊंट मेरी चर्च मुंबईतील बांद्रा या ठिकाणी असलेले रोमन कॅथेलिक चर्च आहे. या ठिकाणी मारिया म्हणजेच येशू ख्रिस्त यांची आई यांचा वाढदिवस 8 सप्टेंबरला आठवडाभर साजरा करण्यात येतो. या वेळेस बरीच मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. या लेखात आपण बांद्रा माउंट मेरी चर्च मुंबई याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

माऊंट मेरी बॅसिलिका माहिती मराठी

नावमाऊंट मेरी बॅसिलिका
प्रकाररोमन कथेलिक चर्च
ठिकाणबांद्रा मुंबई
उत्सव 8 सप्टेंबर (मारिया वाढदिवस)
साजरा करणारेख्रिस्ती समुदाय

मरियम ज्याला आपण मराठीत मारिया म्हणतो, ती येशू ख्रिस्ताची आई आहे. 8 सप्टेंबर रोजी या चर्च मध्ये मरियाचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. यावेळेस मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात.

बांद्रा येथील माऊंट मेरी चर्च हे एका टेकडीवर स्थित असून, साधारणपणे याची उंची समुद्रसपाटीपासून 80 मीटर इतकी आहे. या टेकडीवरून अरबी समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

सध्या हे चर्च 100 वर्षे जुने आहे पण या चर्चमध्ये मारियाचा असणाऱ्या मूर्ती इसवी सन सोळाव्या शतकातील आहे. इसवी सन 1738 मध्ये मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यात हे चर्च पडले होते, इसवी सन 1904 मध्ये हे चर्च नव्याने बांधण्यात आले.

दरवर्षी मारियाचा वाढदिवस असताना येथे मोठी जत्रा भरते, त्यावेळी संपूर्ण परिसर सजविला ​​जातो. स्थानिक व्यापारी येथे विविध धार्मिक वस्तू, भाजलेले हरभरे, फराळ आणि मिठाई विकण्यासाठी स्टॉल लावतात.

जत्रेच्या दिवशी मरियमच्या आकारात बनवलेली मेणबत्ती विकली जाते. लोक त्यांच्या आजाराशी सुसंगत मेणबत्ती निवडून, मारियाला त्यांच्या मदतीसाठी आवाहन करत चर्चमध्ये लावतात.

संबंधित – नाताळ सणाची माहिती

बांद्रा माऊंट मेरी चर्च मुंबई इतिहास मराठी

मुंबईतील सर्वात सुंदर चर्च म्हणून माऊंट मेरी बॅसिलिका ओळखले जाते. याची स्थापना 16व्या शतकात एका पोर्तुगीज कंपनीने केली. ही मूर्ती पोर्तुगालमध्ये लाकडाची बनवलेली असून येशु ख्रिस्त यांच्या अनुयायांनी पाठवली होती.

इसवी सन 17 व्या शतकाच्या प्रारंभी अरबी लोकांनी समुद्रात हल्ला केला. सोन्याच्या शोधात असलेल्या या लोकांनी मरियाची मूर्ती फोडली. पुढे इसवी सन 1760 ही मूर्ती पुन्हा बांधण्यात आली. कोळी मच्छीमार या मूर्तीला मोट माऊली म्हणतात. याचा अर्थ मोत्याची आई किंवा पर्वताची आई असा आहे.

मुंबईतील सर्वात सुंदर चर्च म्हणून माऊंट मेरी बॅसिलिकाला ओळखले जाते. हे ठिकाण एका टेकडीवर असून या टेकडीवरून मुंबईचा समुद्र व निळेशार आकाश पाहायला मिळते. तसेच अरबी समुद्र आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसेच येथून 7 किलोमीटर अंतरावर सिद्धिविनायक मंदिर आहे.

बॉलिवुडमधील अनेक सिनेमा कलाकार बांद्रा या ठिकाणी राहतात. यामध्ये सुप्रसिद्ध शाहरुख आणि सलमान खान यांचा देखील समावेश होतो.

बांद्रा माऊंट मेरी चर्च सोमवार ते शनिवार या वेळेत सकाळी 8:00 ते 8.30 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. या वेळेत दुपारी 1 ते 2 तास बंद असते. या चर्चमध्ये येण्यासाठी कसल्याही प्रकारचा पास किंवा तिकीट काढण्याची गरज नाही.

FAQs

माऊंट मेरी बॅसिलिका चर्च कुठे आहे?

माउंट मेरी रोड, शांती अवेदना सदन जवळ, माउंट मेरी, बांद्रा पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400050

मारिया कोण आहे?

मारिया येशू ख्रिस्त यांची आई आहे.

बायबल ग्रंथ कोणी लिहिला?

बायबल हा ग्रंथ नसून अनेक लेखकांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा तो संग्रह आहे. त्यामुळे हे बायबल कुण्या एका लेखकाने लिहले नाही.

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला बांद्रा माऊंट मेरी चर्च मुंबईविषयी सविस्तर माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.