मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या

Categorized as Blog

Mul Sankhya In Marathi – ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच पूर्ण भाग जात असेल, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. या लेखातून आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

संख्यांचे प्रकार माहिती मराठी

विषय मूळ संख्या
प्रकार अंकगणित
वापरगणित आणि व्यवहार करण्यासाठी

आपण गणितात आणि व्यवहारात नकळत अनेक प्रकारच्या संख्या वापरत असतो, पण या संख्या कोणत्या आहेत याची फारशी माहिती आपल्याला नसते. त्यामुळे या लेखातून आपण संख्यांचे प्रकार थोडक्यात जाणून घेऊ.

अंकगणितात एकूण 13 संख्यांचे प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे –

 1. नैसर्गिक संख्या (natural numbers)
 2. मूळ संख्या (prime numbers)
 3. सम संख्या (even numbers)
 4. विषम संख्या (odd numbers)
 5. पूर्णांक संख्या (whole numbers)
 6. अपूर्णांक संख्या (fractions)
 7. परिमेय संख्या (rational numbers)
 8. अप्रिमेय संख्या (fractional numbers)
 9. वास्तव संख्या (real numbers)
 10. अवास्तव संख्या (non-real numbers)
 11. संयुक्त संख्या (combined numbers)
 12. विरुद्ध संख्या (opposite numbers)
 13. त्रिकोणी संख्या (triangular numbers)

मूळ संख्या माहिती मराठी

ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात.

 • 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत.
 • पहिली मूळ संख्या 2 आहे.
 • 2 ही एकमेव सम संख्या आहे, जी मूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या विषम असतात.
 • मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17………∞

mul sankhya in marathi – 1ते 100 मूळ संख्या पुढीलप्रमाणे….

संख्या मुळसंख्या
मूळ संख्या 1 ते 502, 3, 5, 7
11, 13, 17, 19
23, 29
31, 37
41, 43, 47
51 ते 100 मूळ संख्या53, 59
61, 67
71, 73, 79
83, 89
97

मूळ संख्यांचे उपप्रकार माहिती मराठी

मूळ संख्यांचे दोन उपप्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे…

1. जोडमूळ संख्या हा मूळ संख्यांचा पहिला उपप्रकार आहे. ज्या दोन क्रमवार मूळ संख्या मध्ये 2 चा फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्याची जोडी असे म्हणतात. जोडमूळ संख्या कधीच एकटी नसते, तर ते नेहमी जोडीने उपस्थित असते.

उदाहरणार्थ… 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या पुढीप्रमाणे…

 • (3-5)
 • (5-7)
 • (11-13)
 • (17-19)
 • (29-31)
 • (41-43)
 • (59-61)
 • (71-73)

1ते 100 यामध्ये जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत.

2. सहमूळ संख्या हा मूळ संख्यांचा दुसरा प्रकार आहे. सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्यामध्ये एकही अवयव सामाईक नाही. सहमूळ संख्या आणि मूळ संख्या यांच्यात काहीच संबंध नाही. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो.

उदाहरणार्थ… (4, 5), (8, 11), (12, 13) (15, 17), (17, 20) या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्याविषयी माहिती मराठी समजावून घेतली आहे. तुम्हाला अजून संख्यांच्या प्रकाराची माहिती हवी असेल तर आम्हला नक्की कळवा

FAQs

सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या कोणती आहे?

सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या 3 आहे, कारण पहिली मूळ संख्या जरी 2 असली तरीदेखील 2 ही. सम संख्या आहे.

सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे?

सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.

मूळ संख्या शोधण्यासाठी विशिष्ट चाळणी पद्धत कोणत्या गणितज्ञाने शोधली?

मूळ संख्या शोधण्यासाठी विशिष्ट चाळणी पद्धत इराटोस्थेनिस या गणितज्ञाने शोधली.

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत?

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25 आहेत.

1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 इतकी आहे.

एकमेव सम संख्या सांगा जी मूळ संख्या आहे?

2 ही एकमेव सम संख्या आहे, जी एक मूळ संख्या आहे.