मोनालिसा पेंटिंग रहस्य मराठी

Categorized as Blog

मोनालिसा पेंटिंग जगातील सर्वात रहस्यमय, महाग आणि आतापर्यंतची चर्चित पेंटिंग आहे. या पेंटिंगविषयी आत्तापर्यंत सर्वात जास्त लिहिलेले, वाचलेले आणि संशोधन केलेले आहे. ही पेंटिंग जवळजवळ पाचशे वर्षांपूर्वी प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो द विंची यांनी बनवले होते.

त्यांनीही पेंटिंग इसवी सन 1503 मध्ये बनवण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर 14 वर्षानंतर ही पेंटिंग पूर्ण तयार झाली होती. या लेखातून आपण मोनालिसा पेंटिंगचे रहस्य मराठीत जाणून घेणार आहोत.

मोनालिसा पेंटिंग रहस्य मराठी

नावमोनालिसा पेंटिंग
प्रकारचित्र
निर्मितीइ. स. 1503-1517
निर्माणलिओनार्दो दा विंची
आकार77 सेमी × 53 सेमी (30 इंच × 21 इंच)

मोनालिसा पेंटिंग हे फक्त एक चित्र नसून एक रहस्य आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे हास्य. या हास्यावर अनेक वेळा संशोधन केले गेले आहे. मोनालिसाच्या चेहऱ्यावरील हास्य प्रत्येक कोनातून वेगवेगळे पाहायला मिळते.

पहिल्यांदा हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते, परंतु आता ते फिक्कट पडत आहे. मोनालिसाचे ओठ बनवण्यासाठी लिओनार्दो दा विंची ला बारा वर्षे लागली होती.

फ्रान्समधील एक आर्टिस्ट LUC MASPERO याने 23 जुन 1852 मध्ये पॅरिसच्या एका हॉटेल वरून उडी मारून आपला जीव दिला होता. तो मोनालिसाच्या रहस्यमय हास्यासाठी आणि सुंदरतेसाठी खूप वेडा झाला होता.

त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये मोनालिसाच्या प्रेमामध्ये वेडा आहे असे लिहिले होते. इतकच नाही तर म्युझियम मध्ये या मोनालिसा पेंटिंगला अनेक प्रेमपत्रे आणि फुले सुद्धा मिळतात. मोनालिसाच्या प्रेमामध्ये वेडे झालेले लोक तेथे प्रेमपत्र सोडून जातात.

मोनालिसा पेंटिंग बनवण्यासाठी लिओनार्डो दा विंचीला जवळजवळ चौदा वर्षे लागली. त्यांनी 1503 मध्ये ही पेंटिंग बनवण्यास सुरुवात केली होती आणि 1517 मध्ये ती पूर्ण झाली होती. ही पेंटिंग बनवण्यासाठी 30 पेक्षा जास्त लेअर्स चा वापर केला गेला आहे.

यामधील काही लेयर मानवाच्या केसं पेक्षाही लहान आहे. ही पेंटिंग तसा विचार केला तर खूप मोठी असेल असे वाटते. परंतु ही पेंटिंग खूप लहान आहे. मोनालिसा ची पेंटिंग 30*12 इंच आहे आणि तिचे वजन आठ किलो ग्रॅम आहे.

मोनालिसा ची ही पेंटिंग सर्वात पहिल्यांदा खूप प्रसिद्ध नव्हती. या पेंटिंग ला सर्वात जास्त प्रसिद्धी तेव्हा मिळाली जेव्हा रिस लुब म्युझियम पॅरिस मधून ती चोरी झाली.

21 ऑगस्ट 1911 मध्ये इतक्या मोठ्या म्युझियम मधून ही पेंटींग चोरी झाली होती. याची चोरी झाल्यानंतर सर्वात पहिला संशय पेंटर पाब्लो पिकासो याच्यावर गेला होता. परंतु नंतर झालेल्या चौकशीमध्ये हा आरोप चुकीचा ठरला गेला. खूप शोध घेतल्यानंतर असे समजले की म्युझियम मधील विन्सेन्जो पेरुगिया या कर्मचाऱ्याने ती पेंटिंग चोरली आहे.

तो ती पेंटिंग परत इटली ला घेऊन जाणार होता. त्याचे म्हणणे होते की ही इटली मधील प्रसिद्ध पेंटिंग आहे. इटलीमध्ये काहीकाळ ठेवल्यानंतर परत या पेंटिंग ला म्युझियममध्ये ठेवण्यात आले.

चोरी केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची शिक्षा सुद्धा दिली गेली होती, परंतु इटलीमधील लोकांनी त्याला देशभक्त मानले होते. असे मानले जाते की लिओनार्दो द विंची याच्या फ्रेंसिस्को मेल्जी या विद्यार्थ्याने एक जुळी पेंटिंग बनवली होती. ही पेंटिंग स्पेनची राजधानी मैड्रिड च्या म्यूसेओ दे प्रादों मध्ये ठेवली गेली आहे.

मोनालिसा ही कोण महिला आहे हे आज सुद्धा एक रहस्य आहे. लिओनार्दो द विंची पेंटर असण्याबरोबरच एक लेखक सुद्धा होते. परंतु त्यांनी कधीही या पेंटिंग विषयी काहीही लिहिलेले नाही. आणि त्यांनी हे कधीही सांगितले नाही कि हि महिला कोण आहे.

काही संशोधकांचे म्हणणे आहे की ही पेंटिंग लिस घेरार्दिनी यांची आहे जी फ्लोरंस ची इटालियन महिला आहे आणि काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी ही पेंटिंग स्वतःला एका स्त्रीच्या रूपामध्ये बनवले आहे.

जेव्हा दुसरे महायुद्ध चालू झाले होते, तेव्हा मोनालिसा ची पेंटिंग सहा वेळा त्या जागेवरून हलवण्यात आली होती. याचे कारण होते की पेंटिंग जर्मन लोकांच्या हाती लागू नये.

या पेंटिंग ला नुकसान पोहोचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले आहेत. 1956 मध्ये एका पर्यटकाने यावरती दगड फेकला होता, इतकेच नाही तर एका व्यक्तीने यावर एसिड सुद्धा फेकले होते. यानंतर या पेंटिंग ला बुलेट-प्रुफ फ्रेम ठेवले गेले आहे.

लिओनार्दो द विंची याने एका चिनारच्या लाकडीच्या पॅनेलवर ऑइल पेंट चा उपयोग करून मोनालिसा ची पेंटिंग बनवली आहे. या पेंटिंग वर ब्रश चा एक निशाणा सुद्धा नाही.

एका फेस रेकॉग्निशन सॉफ्टवेअर मध्ये स्कॅन केल्यानंतर असा दावा केला गेला की मोनालिसा यांची पेंटिंग 83% खुश, 9% घृणा, 6% भीती आणि 2% राग या मध्ये आहे.

लिओनार्दो द विंची यांनी या पेंटिंग ला पूर्ण बनवले नव्हते. 1519 मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांच्या सहकार्‍यांनी ती पेंटिंग पूर्ण केली होती.

नेपोलियन बोनापार्ट याने चार वर्षापर्यंत मोनालिसा यांचा फोटो ट्यूलरीज पैलेस या आपल्या बेडरूम मध्ये लटकवला होता. तो या पेंटिंग मुळे इतका आकर्षित झाला होता की त्याला टेरेसा गुआदाग्नी नावाच्या एका महिलेवर प्रेम झाले, जी लीसा घेरार्दिनी यांच्या परिवारातील महिला होती.

सध्या मोनालिसा यांची पेंटिंग फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये स्थित मुसी डू लौवरे म्युझियम मध्ये आहे. येथे या पेंटिंग साठी एक वेगळी खोली आहे, जेथे ही पेंटिंग 1797 पासून अडकवलेली आहे.

मोनालिसा यांची कोणत्याही इन्शुरन्स शिवाय सातशे मिलियन डॉलर ची संपत्ती आहे. जेव्हा आपण या पेंटिंगला पाहतो तेव्हा आपल्याला मोनालिसा यांच्या आइब्रो दिसत नाहीत. आता हा प्रश्न येतो की मोनालिसा यांना लिओनार्दो द विंची यांनी आइब्रो का बनवल्या नाहीत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात महाग पेंटिंग आहे. 1962 मध्ये याची किंमत 100 मिलियन डॉलर केली गेली होती. 2019 मध्ये या पेंटिंग ची किंमत सातशे मिलियन डॉलर होती.

FAQs

मोनालिसा कोण आहे ?

मोनालिसा हे लिओनार्दो द विंची यांनी निर्मित केलेले महीलाचे चित्र आहे. पण ही महिला कोण आहे याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही.

मोनालिसा चित्र सध्या कुठे आहे ?

मोनालिसा चित्र सध्या पॅरिसमधील लूव्र ह्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

सारांश

मोनालिसा पेंटिंग ही जगातील सर्वात रहस्यमय महाग आणि चर्चित पेंटिंग असून याबद्दल माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.