श्रम बद्दल माहिती

श्रम बद्दल माहिती – श्रम याचा सोपा अर्थ असा आहे की काम करणे. आपण आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींना काम करताना पाहत असतो. जसे की शेतकरी शेतात काम करतो, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो, तर एखादा कामगार कारखान्यात काम करतो. यामध्ये काम हे प्रामुख्याने काहीतरी मोबदला मिळावा याहेतूने केले जाते.

अर्थशास्त्रामध्ये श्रम या संकल्पनेला एक विशिष्ट अर्थ आहे. अर्थशास्त्रानुसार श्रमाची व्याख्या ‘आर्थिक मोबदल्याची हेतूने केलेले कोणतेही काम म्हणजे श्रम होय.’

थोडक्यात सांगायचे झाले तर, जर एखादे काम आर्थिक मोबदल्यासाठी केले गेले नसेल, तर त्याला श्रम असे म्हटले जात नाही. उदाहरणार्थ. आईने तिच्या मुलाचा सांभाळ केला तर याला श्रम म्हणता येणार नाही.

याउलट त्याच मुलाचा सांभाळ जर पाळणाघरात केला असेल तर, त्या मुलाचा सांभाळ करणाऱ्या दाईने श्रम केले असे म्हणता येईल. कारण आईने कोणताही मोबदला न घेता मुलाचा सांभाळ केला आहे आणि दाईने सांभाळ करताना त्याचा मोबदला मिळेल या हेतूने काम केले आहे.

या लेखात आपण श्रम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण श्रमाची प्रकार आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

श्रम बद्दल माहिती

श्रम बद्दल माहिती
श्रम बद्दल माहिती
विषयश्रम
प्रकारउत्पादनाचा प्रकार

मानवी जीवन जगत असताना, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. हे उत्पादन करणाऱ्यांना उत्पादक वर्ग असे म्हणतात. या वस्तूंचा आणि सेवांचा उपभोग घेणाऱ्यांना उपभोक्ता असे म्हणतात.

उत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने चार घटक असतात. पहिला प्रकार म्हणजे भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल आणि चौथा प्रकार म्हणजे संयोजन होय.

मागील लेखात आपण भूमी विषयी माहिती जाणून घेतली आहे. यात आपण उत्पादनाच्या दुसऱ्या घटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. श्रम हा उत्पादनाचा घटक आहे.

श्रमाचे प्रकार माहिती

शारीरिक, बौद्धिक आणि उत्पादक अश्या तीन वर्गात श्रमांचे विभाजन होते.

शारीरिक श्रम व्याख्या – ज्या श्रमामध्ये शारीरिक शक्तीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्याला शारीरिक श्रम असे म्हणतात.

बौद्धिक श्रम व्याख्या – ज्या श्रमामध्ये बौद्धिक शक्तीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्याला बौद्धिक श्रम असे म्हणतात.

उत्पादक श्रम व्याख्या – ज्या श्रमामधून उपयोगिता निर्माण होते, त्या श्रमास उत्पादक श्रम असे म्हणतात.

शारीरिक श्रम बौद्धिक श्रमउत्पादक श्रम
हमाल प्राध्यापकविणकाम
मजूरडॉक्टरशिंपी
शेतकरीइंजिनियर कुंभार

श्रमाचे वैशिष्ट्ये माहिती

श्रम हा भावनात्मक घटक आहे – श्रम करणारे कामगार हे भावना असणारा घटक आहे. यामुळे यांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. प्रत्येक कामगाराला आठवड्यातून एक सुट्टी देणे बंधनकारक असते.

श्रम शीघ्र विनाशी आहे – भांडवल यासारखे श्रमाची साठवणूक करता येत नाही.

श्रम आणि श्रमिक अविभाज्य आहेत – ज्या ठिकाणी श्रम वापरून उत्पादन केले जाते त्या ठिकाणी कामगार (श्रमिकाला) जावे लागते.

श्रम बहुजिनसी आहेत – श्रमिकाची कार्यक्षमता वेगवेगळी असते. थोडक्यात सांगायचे झाले तर, एखादा कामगार कमी वेळेत अधिक उत्पादन करू शकतो या तुलनेने दुसरा कामगार त्याच्या इतके उत्पादन करू शकत नाही. ही उत्पादन करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.

याचे मुख्य कारण म्हणजे ते श्रमिकाची शिक्षण, वेतन, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता आणि इतर गोष्टी वेगवेगळ्या असतात.

सारांश

आपण या लेखामध्ये श्रम बद्दल माहिती जाणून घेतली आहे. यात आपण श्रमाचे प्रकार आणि श्रमाचे वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. श्रम हा भूमी या घटकापेक्ष्या वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला श्रम बद्दल माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

श्रमदान म्हणजे काय ?

विनामोबदला जनकल्याणसाठी घेतलेले कष्ट किंवा उभारून दिलेली यंत्र /पैसा म्हणजेच श्रमदान होय.

श्रमविभागणी संकल्पना कोणी मांडली ?

कार्ल मार्क्स यांनी श्रमविभागणी संकल्पना मांडली.

श्रमाचा मोबदला काय म्हणतात ?

श्रमाचा मोबदला हा अर्थिक स्वरूपात मिळत असतो, या मोबदल्यास रोजगार असे म्हणतात.

श्रम म्हणजे काय ?

आर्थिक मोबदल्याची हेतूने केलेले कोणतेही काम म्हणजे श्रम होय.

शारीरिक श्रमाची जागा कोण घेत आहे ?

दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वापर होताना आज दिसून येत आहे. कामात चूक आणि जलद रित्या होण्यासाठी तंत्रज्ञान कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अश्या प्रकारे शारीरिक श्रमाची जागा तंत्रज्ञान घेत आहे.

पुढील वाचन

Leave a Comment