शोध शून्याचा – संख्या वाचन कसे करावे ?

संख्या वाचन (sankhya vachan in marathi) – आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग. ज्याच्यामुळे आपले व्यवहार आणि जीवनपद्धती अवलंबून आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क 25,050 करोड अमेरिकन डॉलर इतकी आहे. यातून तुमच्या लक्षात आले असेल, की कोणत्याही वस्तूची किंमत किंवा मूल्य दर्शवण्यासाठी प्रामुख्यानं संख्येचा वापर करण्यात येतो.

संख्यासोबत आपला संबंध लहापणापासूनच आलेला असतो.शालेय जीवनात संख्येची झालेली ओळख आयुष्यभर आपल्याला कामी येते. यातूनच आपले व्यवहारज्ञान वाढते.

शाळेत आपण एकक, दशक, हजार ते कोटी किंबहूना याच्याही पुढे संख्यज्ञान प्राप्त करतो. आपल्या देशात मोठा व्यवहार कोटीमध्ये केला जातो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा व्यवहार मिलियन्स, बिलियनमध्ये केला जातो.

अश्या वेळेस आपल्याला संख्यावाचन करण्यास आणि ते समजून घेण्यास थोडी अडचण निर्माण होते. यासाठी या लेखातून आपण संख्या वाचन कसे करावे (sankhya vachan marathi mahiti ) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचादिशा निर्देश मराठी माहिती

संख्या म्हणजे काय – व्याख्या व महत्व (numbers meaning and importance mahiti marathi)

संख्या वाचन कसे करावे (sankhya vachan in marathi)
विषयसंख्या
प्रकारगणितीय एकक
महत्वसंख्या मोजणीसाठी

संख्या हे मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे. प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. एक ते नऊ आणि शून्य हे अंक सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत.

शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. यातूनच अंकलेखन दशमान पद्धतीचा जन्म झाला.

दशमान पद्धतीत अंकाच्या स्थानानुसार त्या अंकाची किंमत बदलते. भारतीय दशमान पद्धतीनुसार आकडे पुढीलप्रमाणे लिहिले जातात. सध्या यातील काही शब्द वापरात नाहीत.

संख्याशून्यांची संख्यावाचन
10एक (एकक)
101दहा (दशक)
1002शंभर (शतक)
1,0003हजार
10,0004दहा हजार
100,0005एक लाख
10,00,0006दहा लाख
1,00,00,0007एक कोटी
10,00,00,0008दहा कोटी
1,00,00,00,0009एक अब्ज
10,00,00,00,00010दहा अब्ज
1,00,00,00,00,00011एक पद्य
10,00,00,00,00,00012दहा पद्य
1,00,00,00,00,00,00013एक नील
10,00,00,00,00,00,00014दहा नील
1,00,00,00,00,00,00,00015एक अंत्य

मिलियन, बिलियन व ट्रिलियन म्हणजे काय ?

संख्याशून्याची संख्यावाचन (अर्थ)
एक मिलियन6दहा लाख (0.1 कोटी)
एक बिलियन9एक अब्ज (शंभर कोटी)
एक ट्रिलियन12दहा पद्य (एक लाख कोटी)

मिलियन, बिलियन व ट्रिलियन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्यात येणारे संख्यावाचक परिमाणे आहेत. संख्येवर जास्त शून्य असतील किंवा मोठ्यात मोठी संख्या असेल तर ती संख्या सांगण्यासाठी या संख्या परिमाणाचा वापर केला जातो.

शेअर बाजार, फॉरेक्स मार्केट, मोठ्या बँका तसेच एखाद्या उद्योगपतींची किंवा संस्थेची वार्षिक कमाई लिहिण्यासाठी या एककाचा वापर केला जातो. तसेच देशाचे आर्थिक बजेट व इतर मोठ्या व्यवहारात या एककाचा वापर करण्यात येतो.

हा लेख जरूर वाचामूळ संख्या माहिती मराठी (mul sankhya in marathi)

सारांश

आशा करतो की, संख्या वाचन (sankhya vachan in marathi) हा लेख वाचून तुम्हाला नक्कीच उपयुक्त माहिती मिळाली असेल. या माहितीच्या आधारे तुम्ही कोणत्याही आणि कितीही शून्य असणाऱ्या संख्यांचा अर्थ व वाचन करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

गणितात किती अंक असतात ?

अंक हे संख्याना दिलेले चिन्ह आहेत. पूर्वीच्या काळी संख्या लिहिताना त्यांचा विशिष्ट चिन्ह देण्यात यायचे. आता प्रचलित असलेल्या इंग्रजी भाषेतील अंक हे भारतीय अंक प्रणाली वर विकसित झाले आहेत. सध्या गणितात दहा अंक आहेत.

रोमन अंक कुठे कुठे वापरतात ?

भारतीय अंक प्रणालीचा वापर ज्या ठिकाणी केला जातो, त्याच ठिकाणी रोमन अंक वापरतात. अर्थात रोमन अंक हीदेखील एक अंकप्रणाली असून याचा वापर संख्या मोजणीसाठी केला जातो.

एक मिलियन डॉलर म्हणजे किती रुपये असतात ?

एक मिलियन म्हणजे एक कोटी रुपये असतात. एक कोटीला सात शून्य असतात. डॉलर यांचा राष्ट्रीय चलन असून याची किंमत रोज बदलत असते. सध्याला याची किंमत 79.88 रुपये आहे. यानुसार एक मिलियन डॉलर म्हणजे सात कोटी 98 लाख रुपये आहेत.

Leave a Comment