नाताळ सणाची माहिती मराठी

Categorized as Blog

ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण असून संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी रात्री 12 वाजता प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी 24 डिसेंबरच्या रात्रीच साजरा केला जातो. या लेखातून आपण ख्रिसमस नाताळ सणाची सविस्तर माहिती मराठीत जाणून घेणार आहोत.

नाताळ सणाची माहिती मराठी

अधिकृत नावनाताळ
साजरा करणारेख्रिस्ती समुदाय
इतर नावेख्रिसमस डे
बडा दिन
दिनांक24/25 डिसेंबर
वारंवारीतादरवषी

ख्रिस्ती धर्मातील अतीशय आनंदाचा दिवस म्हणजे नाताळ, कारण याच दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. येशू ख्रिस्त यांना परमेश्वराचा पुत्र म्हणून ओळखले जाते. जगाचा तारणहार म्हणून सुद्धा ओळखले जाते.

नाताळाच्या अगोदर ख्रिस्ती लोक आपले घर सजवणे चालू करतात. ख्रिसमस ट्री (वृक्ष) याला खूप महत्त्व आहे, याच्या समवेत सर्व सजावट करून संपूर्ण घर प्रकाशमय केला जातो.

24 डिसेंबरला रात्री सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो, असे मानले जाते. या भेटवस्तूमध्ये आपल्याला हवे ते परमेश्वर देतो, अशी भावना आहे.

नाताळच्या दिवशी चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनवून वाढदिवस साजरा करण्याची तयारी करतात. मग सर्व ख्रिस्ती लोक एका ठिकाणी चर्चमध्ये जमून आपल्या प्रिय प्रभु येशू ख्रिस्त यांची आराधना करतात. या सणाला सर्वजण एकमेकांना विविध भेटवस्तू, ख्रिसमस स्पेशल शुभेच्छापत्र देतात.

येशू ख्रिस्त यांची आराधना करतात, गाणे गात आपल्या देवाची स्तुती करतात. त्यानंतर येशू ख्रिस्ताच्या नावाने केक कापून सर्वसमवेत वाटून घेतात. अश्या प्रकारे ख्रिसमस सण अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्म लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या आणि इतर गोड खाद्यपदार्थांचे एकमेकांस वाटून हा सण साजरा करतात. तर काही जण सांताक्लॉजचा वेष धारण करून लहान मुलांना भेटवस्तू देतात.

कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये येशू ख्रिस्त यांची जन्म आठवण म्हणून गायीचा गोठा तयार करण्याची एक परंपरा आहे. याचे कारण येशू च जन्म गाईच्या गोठ्यात झाला होता.

येशू ख्रिस्त माहिती मराठी

नावयेशू ख्रिस्त
इंग्रजी नावJesus Christ
Jesus of Nazareth
धर्म स्थापना प्रमुखाचे नावयेशू ख्रिस्त
जन्मस्थळबेथलेहेम ,जेरुसलेम
इस्रायल देश
आईचे नावमारिया
पित्याचे नावजोसेफ
कार्यमानवजातीला पापांच्‍या बंधनातून मुक्त करणे
प्रमुख सणनाताळ (ख्रिसमस)
गुड फ्रायडे
पवित्र ग्रंथबायबल

येशू हे नाव इम्मानुएल या नावाचे भाषांतरित नाव आहे. याचा अर्थ असा आहे, ‘आम्हाबरोबर देव.’ येशू ख्रिस्ताला हिब्रू भाषेत येशुआ असे म्हणतात तर ग्रीक भाषेत येसूस असे म्हणतात.

पवित्रशास्त्रनुसार सर्व मानवजातीला त्यांच्या पापांपासुन मुक्त करण्यासाठी, येशू ख्रिस्त याला परमेश्वराने पृथ्वीवर पाठवले. त्यामुळे येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र आणि जगाचा तारणारा म्हणून ओळखले जाते.

येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंबर या दिवशी झाला असल्याने हा दिवस नाताळ म्हणून साजरा केला जातो.

ख्रिस्ती धर्मातील पवित्रा ग्रंथ बायबल आहे. हा ग्रंथ दोन भागात विभागला आहे. पहिल्या भागात जुना करार आणि दुसऱ्या भागास नवीन करार असे म्हणतात.

जुना करार हा यहुदी लोकांचा धर्मग्रंथ आहे आणि नाव करार हा येशू ख्रिस्त यांच्या संबंधित आहे. हा ग्रंथ परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे लिहलेले आहे.

बायबल ग्रंथ ख्रिस्ती धर्माची श्रद्धेची आणि जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात व्यवस्थित सांगितले आहे.

सर्वप्रथम प्रकाशित झालेला आणि सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे बायबल होय. जगातील इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्या सर्वाधिक प्रती आजपर्यंत छापल्या गेल्या आहेत.

संपूर्ण जगात मुख्य भाषा आणि बोलीभाषा मिळून एकूण 5000 भाषा आहेत. त्यापैकी 2100 भाषांत बायबलचे संपूर्ण किवा अंशतः भाषांतर केले आहे.

बायबल हा ग्रंथ यहुदी आणि ख्रिस्ती लोकांसाठी महत्वपर्ण ग्रंथ मानला जातो. जुन्या कराराला सुमारे तीन हजार वर्षाचा आणि नव्या कराराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.

बायबल या शब्दाचा अर्थ ग्रंथसंग्रह असा होतो. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह.

बायबल एकहाती लिहिलेले नसून, ख्रिस्तपूर्व 1300 ते इसवी सन 100 या साधारण 1400 वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आहे.

येशू ख्रिस्ताने अनेक मृतांना जीवंत केले. अनेक रोग्यांना बरे केले. जो आंधळा आहे त्याला दृष्टी देण्याचे काम केले. प्रभू येशू ख्रिस्त मानवजातीचा पापांसाठी मरण पावला आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जीवंत झाला आणि स्वर्गात गेला.

सांताक्लॉज म्हणजे काय?

सांता क्लॉजाचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. सांता क्लोज आणि नाताळ सण यांचे नाते अगदी घट्ट आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या अगोदर म्हणजे 24 डिसेंबर या दिवशी रात्री खेळणी आणि इतर भेटवस्तू वाटत असतो, असे मानले जाते.

जगभरात या सांता क्लॉज ची एक वेगळीच ओळख आहे. प्रत्येक लहान मुले हे सांता क्लॉजला पसंद करतात. युरोपात आणि भारतातही ख्रिसमस सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात.

इसवी सनाच्या चौथ्या शतकातील ग्रीक ख्रिस्ती बिशप सेंट निकोलस हे मायरा या ठिकाणी राहत होते. हे नेहमी गरिबांना भेटवस्तू वाटायचे. त्यामुळे ते ख्रिस्ती धर्मात विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी आयुष्यभर ख्रिस्ताची सेवा केली.

त्यांच्या मृत्युनंतर मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही चालू राहिली. फरक इतकाच की संत निकोलसच्या नावाऐवजी सांता क्लॉज असे नाव पडले.

इसवी सन सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये नाताळबाबा या नावाने ही संकल्पना सुरू राहिली. त्यामुळे सांता क्लॉज ख्रिस्ती धर्मात लोकप्रिय झाला. सांता क्लॉज वर अनेक लेखकांनी कथा रचून, अनेक चित्रपट आणि मालिका तयार केल्या आहेत.

FAQs

सांताक्लॉज कोण आहे?

सांताक्लॉज एक ख्रिस्ती सेवक आहे. जो गरिबांना नेहमी भेटवस्तू वाटायचा. त्याचे मूळ नाव सेंट निकोलस असे आहे.

येशू ख्रिस्ताचा जन्म कोठे झाला ?

येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम या गावी गाईच्या गोठ्यात झाला.

येशूची प्रार्थना कशी करावी?

हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो.
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही
तुझ्या इच्छेप्रमाणे होवो
आमची रोजची भाकर
आज आम्हास दे ;
आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडवली आहे
जशी तू आमची ऋण आम्हास सोड ;
आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस ;
तर आम्हास वाईटापासून सोडीव
[ कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत ; आमेन ]

सारांश

तर मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला नाताळ सणाची सविस्तर माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.