पपनस फळाची माहिती मराठी

Categorized as Blog

महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टीवर साधारणपणे पपणसाची झाडे जास्त प्रमाणत आढळतात. गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत राज्यातील काही भागात आहे. पपनस लिंबू वर्गीय वनस्पती असून ही याचे फळ आरोग्यासाठी चांगले असते. या लेखातून आपण पपनस फळाची माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत.

पपनस फळाची माहिती मराठी

नावपपनस (पोमेलो)
शास्त्रीय नावसिट्रस मॅक्झिमा
वर्गलिंबू
प्रकारऔषधी
वर्णनपांढऱ्या रंगाची – फुले
हिरव्या रंगाची – फळ
आढळकोकण, महाराष्ट्र राज्य
उपयोगआरोग्यासाठी

पपनसाचे झाड साधारणपणें 5 ते 10 मीटर इतके उंच असते. याच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले असतात. पपनसच्या फळाचा आकार हा मोठ्या चेंडूइतका असतो आणि साल हिरव्या रंगाची असते.

सुरवातीला हिरव्या रंगाची असणारी साल फळे पिकू लागल्यावर पिवळ्या रंगाची होते. पपनसच्या फळांना सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत पाहायला मिळतात.

मोसंबीसारख्या फोडींची रचना यामध्ये पाहायला मिळते. यामध्ये पांढरा गर आणि गुलाबी रंगाचा गर असलेल्या दोन जाती आहे. पपनसाचे फळ कच्चे असल्यास गराची चव कडू लागते. फळ पिकल्यावर थोडासा कडवटपणा कमी होत जातो.

इतर फळांप्रमाने या फळाच्या बियांपासून रोपे तयार करता येतात. भारतातील महाराष्ट्र राज्यात याची झाडे जास्त प्रमाणात आढळून येतात.

पपनसाला ‘चकुत्र’ ‘बंपर’ आणि ‘चकोत्रा’ अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. फुलांपासून अत्तर तयार करतात. या झाडाचे लाकूड कठीण असते. त्यामुळे त्याचा वापर करून अवजारांच्या मुठी बनविल्या जातात.

गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे. याचे फळ रसाळ आणि गोड आहे, पपनसाचे फळ कच्चे असल्यास गराची चव कडू लागते. फळ पिकल्यावर थोडासा कडवटपणा कमी होत जातो. हे फळ आरोग्यदायी म्हणून ओळखले जाते.

पपनस खाण्याचे फायदे

पोषकतत्त्वांचे प्रमाण जास्त – पपनसमध्ये भरपूर पोषक घटक आहेत. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणत असून अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, यामुळे आपले वजन प्रमाणत ठेवण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – पपनसमध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.

हृदयासाठी चांगले – द्राक्षाचे नियमित सेवन केल्याने आपले हृदय निरोगी राहते. संशोधनानुसार, असे सिद्ध झाले आहे की याचे नियमित सेवनाने हृदयरोगाचा धोका खूप कमी होतो.

त्वचेची काळजी – यामधे असणारे व्हिटामिन सी आपल्या त्वचेसाठी खूप उपयोगी असतात. यामुळे त्वचेला रीजुव्हेनेट होण्यास मदत होते.

अँटीऑक्सिडं – पपनसच्या फळात अँटी ऑक्सिडंट्स् जास्त प्रमाणत असते. यामुळे आपले जुने रोग उद्भवत नाहीत. त्यामुळे अश्या या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळाचे आपण रोज सेवन करायला हवे.

FAQs

पपनसमध्ये कोणते जीवनसत्व असते ?

पपनसमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि सी जीवनसत्व असते.

पपनस म्हणजे काय ?

पपनस लिंबू वर्गीय वनस्पती असून ही वनस्पती औषधी गुणधर्माची आहे.

सारांश

आशा करतो की, तुम्हाला पपनस फळाची मराठी माहिती मिळाली असेल. या लेखात पपनसाचे फायदे देखील आपण जाणून घेतले आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. बाकी दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.