15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांचे भाषण मराठी

15 August Speech In Marathi For Students – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! आज 15 ऑगस्ट, हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या स्वातंत्र्यदिनी शाळा, महाविद्यालये आणि कॉलेजेस अशा सर्व ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

याव्यतिरिक्त सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, चौका-चौकात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो.

भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट होय.

आजच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खास तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त (15 August Speech In Marathi For Students) एक सुंदर भाषण घेऊन आलेलो आहोत.

पुढील स्वातंत्र्य दिवसाचे भाषण (Independence Day Speech In Marathi) वाचून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य खरोखरच किती लाख मोलाचे आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

या भाषणाच्या माध्यमातून मी तुमच्यापुढे भारताचा स्वातंत्र्यलढा आणि सध्या भारतापुढे असणारे आव्हाने याविषयीचे माझे मत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

चला तर मग सुरू करूयात, भारतीय स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी (15 August Speech In Marathi For Students). या भाषणाचा आधार घेत, तुम्ही देखील भाषण करू शकता.

स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी (15 August Speech In Marathi For Students)

15 August Speech In Marathi For Students

15 August Speech In Marathi For School Students – अध्यक्ष, महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट अर्थात आपल्या भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिवस. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी माझे दोन शब्द आपल्यापुढे मांडणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती.

Swatantrata Diwas Bhashan Marathi – भारतावर आधीच परकीय सत्तांनी अनेक वर्षे त्यांची हुकूमत चालवली. यात आणखी एक वाढ, ती म्हणजे इंग्रज. व्यापारासाठी येऊन इथले राज्यकर्ते झालेल्या गोऱ्यांनी म्हणजेच इंग्रजांनी, भारत देशावर सुमारे दीडशे वर्ष हुकूमत गाजवली.

Swatantra Din Marathi Bhashan – पूर्वी भारताला सोन्याची चिडिया म्हणून ओळखले जायचे, म्हणूनच परकीय सत्ता नेहमीच भारताकडे आकर्षिल्या जायच्या. असो या सोन्याच्या चिडियावर इतकी परकीय आक्रमणे होऊनही, आज भारताने जगाच्या पातळीवर एक नवीन ओळख निर्माण केली आहे, थोडक्यात सांगायचे झाले तर

आज जगतामध्ये घुमतोय,
माझ्या भारत मातेचा नारा..
अभिमानाने आकाशात डौलतोय,
माझा तिरंगा प्यारा 🇮🇳
माझा तिरंगा प्यारा 🇮🇳

Independence Day Of India Marathi – आपला तिरंगा आज आकाशामध्ये डौलाने फडकत आहे. हा क्षण आणण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अनेकांनी आपली घरदार, परिवार, इतकेच काय तर जीवाची देखील परवा न करता देशासाठी वाहून घेतले. या हुताम्यांनी एकच ध्यास मनी धरला तो म्हणजे,

आता आमुचे जगणे नव्हे आमच्यासाठी 
जे असेल ते सर्व आमच्या,
भारत भूमीसाठी 🇮🇳

अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊन या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्वांची नावे जर आपण घेत बसलो तर भाषण खूप मोठे होईल, पण थोडक्यात सांगतो.

Lokmanya Tilak Freedom Fighter – स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक भारताचा स्वातंत्र्य संग्रामाविषयी बोलताना पहिल्यांदा आठवतात.

Bhagat Singh Sukhdev Aur Rajguru – इन्कलाब जिंदाबाद असे म्हणत भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, देश प्रेम काय असते हे आपल्याला सांगून जातात.

तुम मुझे खून दो,
मै तुम्हे आजादी दूंगा…

Subhas Chandra Bose Freedom Struggle Marathi – अशी आर्त साद घालणारे आजाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांना पाणी पाजण्याचा संकल्प ज्यांनी केला, असे सुभाष चंद्र बोस अर्थात सुभाष बाबू आज आम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आठवल्याशिवाय राहत नाहीत.

15 August Bhashan Marathi Madhe – सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने इंग्रजांविरुद्ध लढा देणारे महात्मा गांधीजी (mahatma gandhi) तर इंग्रज काही केल्या आपला भारत देश सोडायला तयार नाहीत. हे लक्षात आल्यावर चले जाव ची घोषणा देणारे पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru) अशी कितीतरी नावे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेता येतील.

ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्रे ठेवत, स्वातंत्र्याच्या महायज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा सर्व देश प्रेमींना आणि थोरवीरांना माझा शतशः प्रणाम 🙏

आपला भारत एकेकाळी

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा,

हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा…

असं सर्व काही होते. परंतु आज भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली, परंतु सिंहावलोकन केल्यानंतर आज देखील भारतापुढे अनेक समस्या उभ्या आहेत.

15 august speech in marathi for school

Issues In Indian Society In Marathi – कोरोना महामारी सारखे संकट असो की, महापूर, दरड ढासळने, चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्या संकटांना तोंड देताना आज देखील भारताची दमछाक होताना दिसत आहे.

या सर्वांवर मात करण्यासाठी देशाची सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे शिक्षण. या शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणे अतिशय गरजेचे आहे.

शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जोपर्यंत असे वाटत नाही की, मी या राष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वाचा घटक आहे. तोपर्यंत भारतामध्ये अमुलाग्र बदल होणे अशक्य आहे.

आपल्या भारताचे कर्तव्यदक्ष माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी 2021 साली भारत एक जागतिक महासत्ता बनणार, हे स्वप्न पाहिले होते. ते आज 2023 येऊन देखील सत्यात उतरताना दिसत नाही. किंबहुना त्यापासून आपण कित्येक मैल दूर आहोत ही एक खेदाची बाब म्हणावी लागेल.

15 August Speech In Marathi For 1st Standard – आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने संकल्प करायला हवा तो म्हणजे,

मी देशाचा अन् देश माझा 🤗

अशी भूमिका जोपर्यंत प्रत्येक भारतीयांमध्ये येणार नाही, तोपर्यंत देशातील दहशतवाद, गरिबी आणि बेरोजगारी यासारखे गंभीर प्रश्न कधी सुटणार नाही.

15 August Speech In Marathi For 2nd Standard – आपल्या भारत देशाचा विकास करण्यासाठी कोणीतरी येईल, अन् तो जादूची कांडी फिरवेल आणि माझा भारत देश विकसित होईल. असे जर दिवास्वप्न आपण पाहत बसलो तर त्यात आता बदल करण्याची गरज आहे.

कारण भारत देशाला एका प्रगतीपथावर न्यायचे असेल तर त्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत आपल्यालाच घ्यावी लागेल.

15 August Speech In Marathi For 3rd Standard – आपण सर्वांनी एका ध्येयाने पेटून उठावा लागेल. पण दुर्दैवाने आज आपण पाहतो, आपल्या देशातील लहानांपासून थोरांपर्यंत कित्येक जण दिवसभरातील आपला अमूल्य वेळ मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून केवळ मनोरंजनासाठी वापरत आहेत.

जोपर्यंत या इंटरनेटच्या महाजालाचा उपयोग नवनवीन ज्ञान घेण्यासाठी, म्हणजेच इंटरनेटवरून ज्ञानकन वेचण्यासाठी होणार नाही. तोपर्यंत आपल्याला वयक्तिक आणि राष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत.

Relatedभारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाचे भाषण (76th Independence Day Speech In Marathi)

76th Independence Day Speech In Marathi

76 Independence Day Speech In Marathi – आज अमेरिका, चीन आणि इंग्लंड यासारखी विकसित राष्ट्रे टेक्नॉलॉजीने देशातील तरुणांना विविध ॲपच्या माध्यमातून केवळ मोबाईलमध्ये गुंतवून त्यांची क्रयशक्ती संपवण्याच काम करत आहे.

आपल्या देशातील बरेच तरुण आज सीमेवर जाऊन शत्रूशी लढण्यासाठी शरीराने सक्षम नाहीत, मनाने खंबीर नाहीत. मात्र तेच मोबाईलवर फ्री फायर यासारख्या गेमच्या माध्यमातून एका स्वप्नवत जगामध्ये जगून शत्रू आमच्यावर चाल करायला आला तर त्याला ठेचून मारू पाहत आहेत.

पण मी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतकेच सांगेल की, मित्रांनो आपल्या शारीरिक अणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, कारण आरोग्य हे अतिशय गरजेचे आहे, मग ते स्वतः साठी असो की मग समाजासाठी.

संशोधन, संरक्षण, आरोग्य तसेच पर्यावरणसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी खूप मोठ्या संधी आहेत. परंतु आजचा तरुण डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखा एका वेगळ्या जगामध्ये वावरताना आणि जगताना दिसत आहे.

15 August Bhashan Marathi

15 August Speech In Marathi For Students – आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनी एकच संकल्प करायला हवा, की देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने योगदान देणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

पण आज अशी स्थिती आहे, की युवकांना आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्रापुढे असलेल्या विविध प्रश्नांसाठी आपण काही करावे, असे वाटतच नाही.

मी असे नाही म्हणत की सर्वच तरुण, पण बऱ्यापैकी तरुण वर्ग अकार्यक्षम बनत चालला आहे. याचा पुरावा म्हणजे भारतातील वाढती बेरोजगारी.

Independence Day Speech Marathi For Kids – आजचे राजकारणी लोक केवळ संख्याबळ कसे वाढेल आणि सत्ता आमच्याकडेच कायम कशी राहील? यामध्ये गुंग असताना दिसत आहेत. अशा या अति महत्वाकांक्षी स्वभावामुळे आपली लोकशाही धोक्यात जाते की काय हे वातावरण भारत देशात मुख्यतः या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे.

मित्रांनो, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरोखरच यावर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मी आजच्या दिवशी लोकांना इतकेच सांगेल विशेषतः राजकारणी लोकांना, आपला विकास करताना देशाचा नाश होणार नाही, याचे भान ठेवा.

शेवटी माझ्या वाणीला विराम देताना, एकच सांगेन भारतातल्या युवकांनी, राजकारणी लोकांनी, विद्यार्थ्यांनी एकच ध्यास घ्यायला हवा तो म्हणजे आपला स्वार्थ बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी आपापल्या परीने योगदान देणे.

जर मित्रांनो देश बळकट होण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला ना, तर भारताला आर्थिक महासत्ता बनण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही.

थोडक्यात या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात (15 August Speech In Marathi) मी एकच आवाहन प्रत्येक भारतीयाला करेल की,

आता मनामध्ये ठेवू नका द्वेष,
विसरून जाऊ सारे क्लेश..
हा भारत देश ना माझा, ना तुझा
हा भारत देश आहे आपल्या सर्वांचा ♥️

अशी भूमिका ज्यावेळी सर्वत्र पाहायला मिळेल. त्यावेळी भारताच्या विकासाची गंगा अगदी वेगाने वाहील अन् तिला जगातील कोणतीच शक्ती अडवू शकणार नाही.

आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिनी मला स्वातंत्र्य दिनाचे भाषण (15 August Speech In Marathi For Students) सादर करण्याची संधी दिली. त्याचबरोबर आपण देखील माझे हे लांबलेले भाषण अगदी शांतचित्ताने ऐकले त्यासाठी धन्यवाद.

जय हिंद ! जय भारत ! जय महाराष्ट्र !

सारांश

Independence Day Speech In Marathi

तर मित्रांनो आशा करतो की, स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी (15 August Speech In Marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असेल. या भाषणाचा आधार घेत तुम्हीही स्वातंत्र्य दिनाचे भाषण करू शकता.

15 August Speech In Marathi For Students – लक्षात ठेवा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची तयारी करीत असताना, आपले स्वातंत्र्य दिनाचे भाषण Short but sweet असावे. यासाठी तुम्हाला स्वातंत्र्यलढ्याची लेखी माहिती मिळविणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकता.

चला, माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Leave a Comment