2000 Rs Note News In Marathi – मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता अचानकच नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्या वेळेस चलनात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती.
या वेळेस देखील मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली आहे. यानुसार आता चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली आहे.
2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली, असे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक काल 2000 रुपयांची नोट चलनातून बाद (2000 Rupees Note ban in india In Marathi) करण्याची घोषणा केली.
आता दोन हजारांच्या नोटा तुमच्याकडे असतील तर तुम्ही काय करायला हवे? त्यासाठी आरबीआयने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, याविषयी आपण या लेखात सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ.
2000 रुपयांची नोट चलनातून बंद होणार (2000 Rs Note News In Marathi)

2016 Indian Banknote Demonetisation In Marathi – 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून 500 आणि 2000 रुपयाची नवीन नोट चालू केली. यासोबतच 10, 20, 100 आणि 200 रुपयांच्या नवीन चलनी नोटा देखील छापण्यात आल्या.
2016 Demonetisation In India In Marathi – यावेळी 2016-17 मध्ये 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या पुढे 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. यानंतर 2019 ते 2022 या तीन वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
RBI च्या 31 मार्च 2022 पर्यंत, 2,000 रुपयांच्या 4,28,394 कोटी रुपये मूल्य असणाऱ्या 214.20 कोटी नोटा चलनात असताना, या नोटांची संख्या व्यवहारातून गायब झालेल्या दिसून येतात.
NCRB आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती, पण आता ही संख्या 2,44,834 वर येऊन पोहोचली आहे.
काही लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैरवापर करत आहे. यामुळे काल दिनांक 19 मे 2023 रोजी भारत सरकारने पुन्हा एकदा नोटबंदीची घोषणा केली आहे.
या घोषणेने रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
या मुदतीत सर्व नागरिकांना नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा बदलून घ्याव्यात, असा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आला आहे.
2000 ची नोट कशी परत कराल (How To Exchange 2000 Rs Note In Marathi)

Exchange 2000 Rs Note In Marathi – रिझर्व्ह बँकेने त्यांच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकांमध्ये जाऊन 2000 ची नोट बदलू शकता किंवा तुम्ही ते पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.
कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात. पण बँकेचे खाते नसणाऱ्या व्यक्तीस नोटा बदलून घेताना एका वेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपये इतर नोटांच्या स्वरुपात बदलून मिळणार आहेत.
तसेच ज्या व्यक्तीचे संबंधित बँकेत खाते आहे, तो 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नोटा बँकेत भरू शकतो.
संबंधित लेख – जुनी नाणी व नोटा कुठे विकायच्या ?
बँकेत नोटा जमा करणे किंवा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 4 महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या वेळेनुसार 2000 ची नोट परत करायची आहे, असे RBI ने सांगितले आहे.
सारांश
या लेखातून आपण 2000 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे (2000 Rs Note News In Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली आहे.
तसेच दोन हजार रुपयांच्या नोटा कुठे व कश्या पद्धतीने बदली करून घेता येईल, याविषयी देखील माहिती जाणून घेतली आहे.
जर तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटबंदी विषयी काही प्रश्न किंवा समस्या असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
नोटबंदी म्हणजे काय ?
नोटबंदी म्हणजे चलनात असणाऱ्या नोटा ठराविक कालावधी नंतर चलन बाह्य म्हणून ठरवणे. या विशिष्ठ कालावधी नंतर चलन म्हणून या नोटा वापरता येत नाहीत.
भारतात नोटबंदी केव्हा झाली ?
जानेवारी 1946 मध्ये भारतात पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर 16 जानेवारी 1978 रोजी 1,000, 5,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.
पुढे 8 नोव्हेंबर 2016 रोजी तर आता 19 मे 2023 रोजी नोटबंदीची घोषणा करण्यात आली.