25 Principles of Environmental Policy in marathi – सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी त्याच्या आयुष्यात पर्यावरण विषयी सखोल अभ्यास आणि चिंतन करून पर्यावरणविषयक महत्वपूर्ण लेखन केले आहे.
हे लेखन करताना त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी कसे वागावे आणि शासनाचे धोरण काय पाहिजे, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती यांनी काय करायला हवे याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत.
हे विचार त्यांनी 25 सूत्रांमध्ये मांडले आहेत. यामधून त्यांनी प्रत्येक निसर्गप्रेमी, सर्वसामान्य व्यक्तीला, संस्था आणि शासनाला मार्गदर्शन केले आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज या तिघांना एकत्र आणण्याचे काम ही पर्यावरण विषयक 25 सूत्रे करतात.
या लेखात आपण पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितलेले पर्यावरण नीतीची पंचवीस सूत्रांची माहिती (25 Principles of Environmental Policy in marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
डॉ. माधव गाडगीळ माहिती मराठी (DR Madhav Gadgil Information In Marathi)
नाव | डॉ. माधव गाडगीळ |
जन्म | 24 मे 1942 पुणे महाराष्ट्र |
कार्य | पर्यावरण शास्त्रज्ञ |
लेखन | 215 संशोधन प्रबंध आणि पर्यावरण विषयक 6 पुस्तके |
संशोधन | लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण |
सर्वोच्च पुरस्कार | पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार |
डॉ. माधव गाडगीळ हे जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत. यांनी केलेल्या पर्यावरण विषयक अभ्यास आणि संशोधन उल्लेखनीय आहे. भारतातल्या पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते.
त्यांनी जीवशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी केली.
इसवी सन 1973 ते 2004 या दरम्यान त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. हे करत असतानाच त्यांनी सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस याची सुरुवात केली.
लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण या विषयावर त्यांनी संशोधन केले.
लेखकांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत पर्यावरण विषयक पुस्तके लिहिली आहेत. ती पुढीप्रमाणे आहेत.
इंग्रजी भाषेतील पुस्तके | मराठी भाषेतील पुस्तके |
---|---|
Diversity : The cornerstone of life | निसर्ग नियोजन – लोकसहभागाने |
Ecological Journeys | निसर्गाने दिला आनंदकंद |
Ecology and Equity | वारूळपुराण |
Nurturing Biodiversity: An Indian Agenda | बहरू दे हक्काची वनराई |
People’s Biodiversity Registers: A Methodology Manual | विविधता – जीवनाची कोनशिला |
This Fissured Land |
डॉ. माधव गाडगीळ यांना मिळालेले पुरस्कार माहिती मराठी
- पद्मश्री
- शांति स्वरूप भटनागर
- विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार
- पद्मभूषण
- राज्योत्सव प्रशस्ती
- हार्वर्ड सेंटेनिअल पदक
- व्हॉल्व्हो पर्यावरण पुरस्कार
- एच. के. फिरोदिया पुरस्कार
- विक्रम साराभाई पुरस्कार
- ईश्वर चंद्र विद्यासागर पुरस्कार
- पर्यावरणातील कामगिरीबद्दल टायलर पुरस्कार
पर्यावरण नीतीची पंचवीस सूत्रे माहिती मराठी (25 Principles of Environmental Policy in marathi)

विषय | पर्यावरण नीतीची पंचवीस सूत्रे |
लेखक | डॉ. माधव गाडगीळ |
- डोंगर उतारावर शेती बंद करून त्याऐवजी खूप वर्ष जगणारे झाडे आणि चाऱ्याची पिके लावणे.
- चराऊरानांचे आणि वनांचे गावकऱ्यांचा सहभाग आणि संरक्षण करून जळण आणि चाऱ्याची व्यवस्था पूर्ण होईल अशा प्रकारची व्यवस्था तयार करणे.
- कमी प्रतीच्या वनांमध्ये नवीन झाडे लावण्याचे काम गावकऱ्यांना देणे.
- बेकायदेशीर तोड, उत्पन्नाचा चोऱ्या, शिकार थांबवण्यासाठी गावांना अनुदान देऊन संरक्षणाच्या कामासाठी प्रोत्साहन देणे.
- वेगवेगळ्या वनउद्योगांना दिलेल्या सवलती बंद करणे.
- वनांवर कच्च्या मालावर सबसिडी न देता उद्योगांकडून त्या मालाची पूर्ण किंमत वसूल करणे.
- गावकऱ्यांना कच्च्या मालाचे उत्पादन करण्यासाठी सोयी-सवलती देऊन प्रोत्साहन देणे.
- जंगलाचे व्यवस्थापन ठेकेदारांना देता जंगल कामगार सहकारी संस्थांना देणे.
- पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम विशेषत्वाने राबवून त्यात दीर्घायुष्य झाडे आणि चाऱ्याची पिके लावणे.
- निरनिराळ्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांना डोंगरउतारावरील जमीन न देणे.
- काजू, रबर याची लागवड करताना आधीची झाडे टिकवणे.
- जनावरांना गोठ्यातच चारा घालने त्यासाठी चारा उत्पादन वाढविणे.
- बुरुडासारख्या कामगारांना कच्चामाल देण्यासाठी प्राधान्य देणे. बांबू, वेत यासारखी पिके त्यांनी स्वतः लावण्यास प्रोत्साहन देणे.
- वैविध्यपूर्ण, दुर्मिळ वनस्पती, पक्षी-प्राणी व स्थानिक माणसे, त्यांची परंपरा, जीवनपद्धती टिकवण्यासाठी कार्यक्रम आखणे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे.
- शेती, फलोत्पादनात रासायनिक पदार्थाचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- शेतीत विविध पिकांच्या जाती टिकून ठेवणे.
- पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत पाण्याच्या साठ्यात मत्स्य उत्पादन करण्यासाठी कार्यक्रम सुरू करणे.
- जलविद्युत निर्मितीसाठी प्रामुख्याने लहान लहान प्रकल्प हाती घेणे.
- औद्योगिक प्रदूषणावर पूर्णा नियंत्रणासाठी कडल कायदे करून त्यांची कडाक अंमलबजावणी करणे.
- शेतजमीन व गाळजमीन क्षेत्र खाणींना बंदी करणे.
- खाणी बंद केल्यावर त्या संपूर्ण भागात स्वखर्चाने वनीकरण करण्याची सक्ती खाण मालकावर करणे.
- ग्रामीण भागात जळणाचा काटकसरीने वापर व्हावा आणि महिलांच्या आरोग्यावर होणारा अनिष्ट परिणाम टाळावा म्हणून निर्धूर चूल आणि गोबरगॅस यांचा वापर करण्याकडे लक्ष केंद्रित करणे.
- आरोग्य शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे.
- शाळा, कॉलेज, विद्यापीठ, वैज्ञानिक संस्था व स्वयंसेवी संस्था यांच्या पर्यावरण कार्यक्रमात सक्रिय सहभाग वाढविणे.
- ग्रामीण आणि शहरी मुला-मुलींवर निसर्ग संस्कार करणे.
सारांश
या लेखातून आपण पर्यावरण नीतीची पंचवीस सूत्रे माहिती मराठी (25 Principles of Environmental Policy in Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
Related – पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पर्यावरण आणि तिची पंचवीस सूत्रे कोणी सांगितले ?
पर्यावरण आणि तिची पंचवीस सूत्रे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले.
पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात ?
पर्यावरणाचे विविध घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात. पर्यावरणात काही बदल झाला की तापमान, ऊन, वारा, पाऊस, हवामान यांचा समतोल बिघडतो. परिणामी गंभीर समस्या जाणवतात.