रोख पुस्तक आणि पासबुकाप्रमाणे दर्शविल्या जाणाऱ्या शिलकांमध्ये फरक पडण्याची कारणे

5 Difference Between Cash Book And Bank Statement In Marathi – नमस्कार मित्रांनो, मागील लेखात आपण बँक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्त्व, आवश्यकता आणि पद्धत याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

एका विशिष्ट दिवशी रोख पुस्तकातील बँक रकान्यात दाखवलेली शिल्लक आणि त्यादिवशी बँक पासबुक दाखवलेली शिल्लक यात काही कारणांमुळे फरक येऊ शकतो.

आजच्या लेखातून आपण रोख पुस्तक आणि पासबुकाप्रमाणे दर्शविल्या जाणाऱ्या शिलकांमध्ये फरक पडण्याची कारणे (5 Difference Between Cash Book And Bank Statement In Marathi) काय आहेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रोख पुस्तक आणि पासबुकाप्रमाणे दर्शविल्या जाणाऱ्या शिलकांमध्ये फरक पडण्याची कारणे (5 Difference Between Cash Book And Bank Statement In Marathi)

5 Difference Between Cash Book And Bank Statement In Marathi

1. बँकेत जमा केलेले परंतु वसूल न झालेले चेक – व्यापाऱ्याला मिळालेले चेक वसुलीसाठी बँकेत जमा करण्यात येतात. ज्या दिवशी चेक बँकेत पाठविण्यात येतात, त्याच दिवशी व्यापारी आपल्या रोकड पुस्तकातील नावे बाजूवर बँक रकान्यात त्याची नोंद करतो.

परिणामी रोकड पुस्तकाप्रमाणे त्याच दिवशी त्याची बँकेतील शिल्लक तेवढ्या रकमेने वाढते, बँक चेकची रक्कम जोपर्यंत वसूल होत नाही, तोपर्यंत त्या संबंधी ग्राहकाच्या खात्यात (पास बुकात) कोणतीच नोंद करत नाही.

त्यामुळे व्यापाऱ्याच्या रोकड पुस्तकाप्रमाणे बँक शिल्लक जास्त तर पास बुकाप्रमाणे शिल्लक कमी दिसेल.

2. इतरांना दिलेले पण बँकेकडे वसुलीसाठी सादर न झालेले चेक – व्यापाऱ्याने बँकेवर काढलेल्या चेकची त्याच दिवशी रोकड पुस्तकातील जमा बाजूवर बँक खात्यात नोंद केली जाते. यामुळे रोकड पुस्तकातील बँकेची शिल्लक तितक्या रकमेने कमी होते.

पण ज्यांना चेक दिले आहेत, त्यांनी बँकेकडे वसुलीसाठी चेक सादर केले नसतील, तर त्याची बँकेत नोंद होणार नाही. त्यामुळे या चेकची पासबुकात नोंद होणार नाही, व पासबुकप्रमाने शिल्लक पूर्वी इतकीच राहील.

परिणामी रोकड पुस्तकातील शिल्लक कमी, तर बँक पासबुकप्रमाणे शिल्लक जास्त दिसेल.

3. बँकेने खात्यावर दिलेले व्याज – बँकेत जमा असलेल्या रकमेवर बँक व्यापाराला व्याज देते, या व्याजची नोंद दर सहा महिन्यांनी व्यापाऱ्याच्या खात्यात केली जाते.

अर्थात हे व्याज रोख न देता, व्यापाऱ्याच्या खात्यात जमा केले जातात. यामुळे ग्राहकाच्या खात्यात शिल्लक वाढते. पण या व्याजाची नोंद रोकड पुस्तकात ताबडतोब न करता व्याजाची माहिती मिळाल्यावर केली जाते.

परिणामी रोकड पुस्तकाप्रमाणे दिसणारी शिल्लक कमी तर पास बुकाप्रमाणे दिसणारी शिल्लक जास्त दिसते.

संबंधित लेखसंयंत्र, व्यवसाय संस्था व उद्योग म्हणजे काय ?

4. रोकड पुस्तकात चुकीच्या नोंदी झाल्यास – प्राप्त लाभांश, व्याज यांची रोकड पुस्तकात चुकीने एकापेक्षा अधिक वेळा नोंदी झाल्यास रोकड पुस्तकातील बँकेतील शिल्लक वाढते.

पण त्यासंबंधी पास बुकात एकदाच नोंद झाल्याने ही शिल्लक कमी दिसेल. परिणामी दोन्ही शिलकेत फरक पडेल.

तसेच पासबुकमध्ये नावे किंवा जमा नोंद करताना चूक झाल्यास दोन्ही पुस्तकातील शिलकात फरक पडू शकतो.

5. व्यापाऱ्याच्या ऋणकोंनी व्यापाराच्या खात्यात परस्पर रक्कम जमा केल्यास – काही वेळा व्यापाऱ्याला त्याचे ऋणको रक्कम न पाठविता त्याच्या बँकेतील खात्यामध्ये परस्पर रक्कम जमा करतात. याची नोंद बँक लगेच करते, त्यामुळे व्यापाऱ्याच्या खात्यातील शिल्लक वाढते.

पण ऋणकोंनी व्यापाराला रक्कम जमा केल्याबद्दलची सूचना दिली नसेल, किंवा या व्यवहारांची व्यापाऱ्याकडून रोकड पुस्तकात चुकून नोंद झाली नसेल. तर रोकड पुस्तकाप्रमाणे त्याची शिल्लक कमी राहील.

परिणामी पासबुक आणि रोकड पुस्तकातील शिलकेमध्ये फरक पडेल.

या व्यतिरिक्त खालील कारणांमुळे रोख पुस्तकातील आणि पास बुकातील शिल्लक रकमेत फरक पडतो.

6. ग्राहकांतर्फे किंवा व्यापाऱ्यातर्फे बँकेने गोळा केलेली रक्कम

7. बँकेने आकरलेले कमिशन, बँक शुल्क, कर्जावरील व्याज, इत्यादींची नोंद फक्त पासबुकमध्येच झाली आहे

8. ग्राहकातर्फे बँकेने चुकत्या केलेल्या रकमा (बँकेने केलेले शोधन)

9. बँकेतून वटविलेल्या हुंड्यांचे अनादरण झल्यासंबंधीची नोंद रोकड पुस्तकात झाली नसल्यास

10. चेकच्या संबंधित व्यवहारांच्या चुकीच्या किंवा अपूर्ण नोंदी आढळल्यास शिलकांवर होणारे परिणाम

  • वसुलीसाठी बँकेत भरलेल्या चेकची, रोकड पुस्तकात नोंद झाली नसल्यास
  • एखादा चेक काढल्यानंतर त्याची रोकड पुस्तकात नोंद झाली नसल्यास
  • दुसऱ्यांकडून मिळालेले चेक रोकड पुस्तकात नोंदविल्यास, परंतु ते बँकेत न पाठविल्यास

सारांश

आशा करतो की, तुम्हाला रोख पुस्तक आणि पासबुकाप्रमाणे दर्शविल्या जाणाऱ्या शिलकांमध्ये फरक पडण्याची कारणे (5 Difference Between Cash Book And Bank Statement In Marathi) व्यवस्थितपणे समजली असेल.

अशा प्रकारे रोकड पुस्तक आणि पास बुकातील शिलकातील फरक पडण्याची निश्चित कारणे कळल्यानंतर तो फरक दूर करण्यासाठी बँक जुळवणी पत्रक तयार करावे लागते.

संबंधित लेखबँक जुळवणी पत्रक कसे तयार करावे ?

Leave a Comment