9 August Jagtik Adivasi Divas Bhashan Marathi – भारतात वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि परंपरेत आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, बोली भाषेचा महत्वाचा वाटा मानला जातो. मागील लेखात आपण आदिवासी समाजाची सविस्तरपणे माहिती समजावून घेतली.
या लेखातून मी तुमच्यासाठी जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती (9 August Jagtik Adivasi Divas Bhashan Marathi) घेऊन आलो आहे.
मला आशा आहे की, हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरू करूयात…
जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती (9 August Jagtik Adivasi Divas Bhashan Marathi)

नमस्कार, आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, माझे गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी आपल्याला 9 ऑगस्ट हा दिवस आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाचे औचित्य साधून मी माझे विचार भाषण रूपाने आपल्यासमोर मांडत आहे.
माझे हे जागतिक आदिवासी दिनाचे (International Tribal Day Speech In Marathi) दोन शब्द आपण शांतचित्ताने ऐकावेत अशी मी आपल्याला विनंती करतो.
जागतिक आदिवासी दिन भाषण मराठी (Jagtik Adivasi Divas Bhashan Marathi)
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या भूमीचा प्रथम भूमिपुत्र, निसर्गपूजक आणि ज्याला आदीपुरुष म्हणतो, अशा समूहास प्रवाहात आणण्यासाठी साजरा होत असलेला आदिवासी दिन या आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा (World Tribal Day Wishes In Marathi)
भारत हा विविध धर्म, जाती, भाषा यांनी समृद्ध असलेला तरीही विविधतेत एकता जपणारा देश आहे. या भारत माते मधील एक उपेक्षित राहिलेला घटक म्हणजे आदिवासी होय.
Adivasi Meaning In Marathi – आदिवासी म्हणजे कोण हे आपल्याला सांगायचे झाले तर, जंगल, डोंगरदऱ्या, नद्या खोऱ्यांमध्ये ज्याने राहणे पसंत केले आणि या जागतिक झगमगाठापासून जो कायम वंचित राहिला तरीही त्याने स्वतःला मी या संस्कृतीचा पूजक आहे. या भूमिकेतूनच निसर्गापुढे आत्मसमर्पण केले.
निसर्ग हाच माझा पाठीराखा
निसर्ग हाच माझा सखा
असे म्हणून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. हा आदिवासी समूह त्याची दिनचर्या कवितेतून सांगायची झाली तर,
जंगलामध्ये मी मग्न असतो
– International Tribal Day Poem In Marathi
निसर्गाचे गाणे मनी गाणे गातो,
वाजवतो मी मंजुळ पावरी
दऱ्या खोऱ्यातून
इकडून तिकडे मी वावरी…
असा हा निसर्गाशी नाते असलेला एक घटक म्हणजे आदिवासी होय.
आपण राहत असलेल्या नागर संस्कृती पासून जो कायमच दूर आणि अलिप्त राहिला तो समाजातील घटक म्हणजे आदिवासी होय. हे आदिवासी जंगलात राहत असल्यामुळे यांना वनवासी देखील म्हटले जाते.
अगदी पुराण काळामध्ये देखील आदिवासींचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणूनच या संस्कृतीतील सर्वात आधीम घटक म्हणून या आदिवासींकडे पाहिले जाते.
जस जसा माणसाचा विकास होत गेला तसतसा माणूस विघातक कृत्य करत गेला साम्राज्यवादी प्रवृत्तीने एकमेकांचा नरसंहार सुरू झाला. यातूनच या सृष्टीने दोन महायुद्ध पाहिली. पुन्हा अशा विघातक बाबी घडू नयेत. या प्रेरणेतूनच अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केली.
या संयुक्त राष्ट्राने जगभरातील सर्व देशांना एकत्र आणण्याचे काम केले. देशा देशातील वाद मिटवलेच त्याचबरोबर जो उपेक्षित वर्ग आहे, वंचित वर्ग आहे त्यांच्या विकासासाठी देखील अनेक महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या. हे आपल्याला मी यासाठी सांगत आहे कारण जागतिक आदिवासी दिन आणि संयुक्त राष्ट्र संघ यांचा खूप जवळचा संबंध आहे.
संयुक्त राष्ट्र संघ स्थापनेला ज्यावेळी 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्याच दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाने जगातील विविध देशांमध्ये जंगलामध्ये रहिवास करणाऱ्या मूळ निवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे हे ओळखून त्यांच्यासाठी शिक्षण आरोग्य, रोजगार,शिक्षण या बाबी पोहोचवणे गरजेचे आहे.
याच प्रेरणेतून संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 रोजी पहिला जागतिक योग दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस international de off indigenous people अर्थात पहिला विश्व आदिवासी दिवस की ज्याला आपण आज जागतिक आदिवासी दिन म्हणतो.
हा इतिहास सांगण्याचे तात्पर्य हेच की संयुक्त राष्ट्र संघाने या जागतिक आदिवासी दिनाला सुरुवात केली.
या आदिवासी समूहाने नेहमीच कोणताही लढा असो त्या लढ्यामध्ये आपले योगदान कायमच दिले आहे.
अगदी पुराण काळाचा जर विचार केला तर आपल्या द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा बहाल करणारा एकलव्य आदिवासीच होता, शिवाजी महाराजांचे अनेक मावळे हे देखील आदिवासी होते.
आदिवासींच्या हक्कावर पायमल्ली आणणारे इंग्रज यांच्याविरुद्ध बंड पुकारणारा आद्य क्रांतिवीर राघोजी हा देखील आदिवासीच होता.
जंगलामध्ये राहणारा लढवय्या आणि या सृष्टीचा आदी (प्राचीन) घटक म्हणजे आदिवासी होय. हे अनेकांना माहित नाही. माझ्या या आदिवासी बांधवांविषयी एवढेच म्हणेन
जागतिक आदिवासी दिन कविता मराठी (Jagtik Adivasi Divas Kavita In Marathi)
जंगलातला आदीम तू
या सृष्टीचा रक्षक तू
जगाला स्वाभिमान
शिकवणारा आदिमानव तू
आमच्या संस्कृतीचा पायक तू
गुरुदक्षिणा म्हणून गुरूसाठी
अंगठा छाटणारा एकलव्य तू
शिवबाचा मावळा म्हणून
शत्रूवर तुटून पडणारा आदिवासी तू
इंग्रजांना सळो की पळो करून
सोडणारा आद्य क्रांतिवीर राघोजी तूच
सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यांचा पहरेदार तू
या सृष्टीचा मूळ मालक तू
आम्हा सर्वांचा मूळ राजा तू
खरं पाहिले तर या प्रवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक परंतु जंगल दर्या खोऱ्यांमध्ये राहिल्यामुळे मागास असलेला समूह म्हणजे आदिवासी लोक होय.
जागतिक आदिवासी दिन निबंध मराठी (Jagtik Adivasi Divas Essay In Marathi)
आज शासनामार्फत या आदिवासी लोकांसाठी खूप मोठ्या योजना राबवल्या जात आहेत, परंतु त्या योजना त्यांच्यापर्यंत नेण्याचे काम हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
सरकार आपापल्या परीने काम करत आहे तरी सेवाभावी संस्थांनी देखील या आदिवासी लोकांना या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
आदिवासी लोकांनी कथा, गाणी, नृत्य ,शिल्पकला चित्रकला त्यांची स्वतःची अशी वारली चित्रकला असा कितीतरी मोठा ठेवा जपला आहे. जगप्रसिद्ध वारली पेंटिंग चे जनक जीवा सोमा म्हसे यांनी तर वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिलेले आहे, म्हणूनच भारत सरकारने 2011 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.
आपल्या महाराष्ट्र राज्यापुरते सांगायचे झाले तर, या आदिवासींच्या विकासासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याने 1972 साली आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर या संचालनालयाची 23 कार्यालय सुरू करून आदिवासी लोकांसाठी असणाऱ्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने देखील आपण शाळांमध्ये आदिवासींच्या वेशभूषा गायन नृत्य असे वेगवेगळे उपक्रम राबवून आदिवासी दिन साजरा करू शकतो.
आदिवासी सुरक्षित तर
तर आपली जंगले सुरक्षित
जंगले सुरक्षित तर
पर्यावरण संतुलित राहील
पर्यावरण संतुलित तर
सर्व काही सुरळीत चालेल
असा हा आपल्या निसर्गाचा खरा काना म्हणजे आदिवासी होय. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे आदिवासी दिनाचे लांबलेल्या भाषणाचे दोन शब्द थांबवतो धन्यवाद…
जय हिंद, जय महाराष्ट्र…
सारांश
या लेखातून आपण जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती (9 August Jagtik Adivasi Divas Bhashan Marathi) जाणून घेतली.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
तुम्हाला आवडतील असे काही भाषण –