Acharya balshastri jambhekar in marathi – बाळशास्त्री जांभेकर ज्यांना आपण मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखतो. पत्रकारिता आणि साहित्याच्या माध्यमातून यांनी समाजकार्य केले. समाजाचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. हा दिवस कायम स्मरणात राहण्यासाठी 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्यात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या लेखातून आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी माहिती (acharya balshastri jambhekar in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता, समाजकार्य आणि ग्रंथसहित्य याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर माहिती मराठी (bal gangadhar jambhekar in marathi)

संपूर्ण नाव | बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर |
इतर नावे | आचार्य , मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक |
जन्म | 6 जानेवारी 1812 (पोंभुर्ले गाव तालुका. देवगड, जिल्हा. सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य) |
कार्य | समाज प्रबोधन |
व्यवसाय | पत्रकारिता, साहित्य |
प्रसिद्ध कामे | दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. |
पहिले लिहिलेले पुस्तक | शून्यलब्धी |
मृत्यू | 18 मे 1846 |
आचार्य जांभेकर याचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचा पोंभुर्ले या छोट्याश्या गावात झाला. गंगाधरशास्त्री यांनी त्यांच्या मुलास म्हणजे बाळशास्त्री यांना बालपणीच मराठी व संस्कृत भाषा शिकवल्या. पुढे चालून बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषा शिकले.
भाषा विषयासोबतच त्यांनी गणित आणि शास्त्र या विषयांत प्रावीण्य मिळविलेच यासोबत त्यांनी रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयात उत्तम ज्ञान मिळवले.
कोकणातील प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी सुधारित प्रती मुद्रित करून वाचकांपर्यंत पोहचवली.
समाजात वावरताना बाळशास्त्री अनेक समस्या पाहून अस्वस्थ होत असे. यातून समाज प्रबोधन करण्यासाठी काहीतरी करावे, ही भावना त्यांच्या मनात बसली.
हा लेख जरूर वाचा – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती (Anandibai Joshi Information in Marathi)
मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण माहिती मराठी (first marathi newspaper in india)
मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बाळशास्त्री जांभेकर व्याख्याते म्हणून काम करत होते. हे काम करत असताना आणि समाजात वावरताना बाळशास्त्री अनेक समस्या पाहून अस्वस्थ होत असे. यातून समाज प्रबोधन करण्यासाठी काहीतरी करावे, ही भावना त्यांच्या मनात बसली. यासाठी त्यांनी एक वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला.
या वृत्तपत्रातून संपूर्ण समाजालाच धडे देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचे सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.
दर्पण हे मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्र आहे. ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 साली प्रसिद्ध झाले. ‘दर्पण’ या वृत्तपत्राचे संपादक आणि संस्थापक म्हणून बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी ओळखले जाते.
या वृत्तपत्राची खास बाब म्हणजे यातील मजकूर दोन भाषेत असायचा, मराठी आणि इंग्रजी. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये परदेशीय विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व तेथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता असा होता.
त्यासाठी दर्पणमध्ये दोन स्तंभ केले होते, यामध्ये एक मराठी आणि एक इंग्रजी भाषेत मजकूर लिहिलेला असायचा. याचा उद्देश मराठी मजकूर सर्वसामान्य जनतेसाठी तर इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे ? हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता.
इसवी सन 1840 मध्ये दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक दिग्दर्शन त्यांनी सुरू केले. दिग्दर्शनमधून जांभेकर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल आणि इतिहास या विषयावर लेख आणि नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करायचे. यात त्यांना भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी मदत करीत.
दिग्दर्शन मासिकाचे संपादक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी 5 वर्ष काम केले. दर्पण हे वृत्तपत्र साडे आठ वर्ष चालले. यातून त्यांनी आपल्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आणि समाज प्रबोधन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी माहिती (acharya balshastri jambhekar in marathi)
समाजकार्याची आवड असणाऱ्या आचार्य बाळशास्त्री यांनी समाजात अनेक प्रकारांनी प्रबोधन घडवून आणले. यासाठी त्यांनी वृत्तपत्र, मासिके, ग्रंथालये यांची स्थापना केली.
नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित अशी विविध पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली.
हा लेख जरूर वाचा – भारतातील पहिले महिला विद्यापीठ माहिती (SNDT information in marathi)
तसेच त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विपुल लिखाण केले.
स्त्री-शिक्षणाचा जांभेकर यांनी पुरस्कार केला. समाजातील स्त्री आणि इतर वर्गावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला.
अशा प्रकारे जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तन वादाचा पाया घातला.
सारांश
या लेखातून आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठी (acharya balshastri jambhekar in marathi) जाणून घेतली आहे. या लेखातून आपण आपल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवन, समाजकार्य, मराठी साहित्यातील योगदान याविषयी माहिती जाणून घेतली.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला ?
आचार्य जांभेकर याचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचा पोंभुर्ले या छोट्याश्या गावात झाला.
बॉम्बे एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना इसवी सन 1824 मध्ये करण्यात आली.
दर्पणकार कोणास म्हटले जाते ?
दर्पण वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केले. त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार असे म्हटले जाते.
बाळकृष्ण जांभेकर यांचे कोणते वृत्तपत्र प्रसिद्ध झाले ?
बाळकृष्ण जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र प्रसिद्ध झाले.
पत्रकार दिन कधी साजरा केला जातो ?
पत्रकार दिन दरवर्षी 6 जानेवारीला साजरा केला जातो.
मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे ?
मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र दर्पण हे आहे. याची सुरुवात इसवी सन 1832 मध्ये झाली.
मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे ?
मराठी भाषेतील पहिले नियतकालिक दिग्दर्शन हे आहे. याची सुरुवात इसवी सन 1840 मध्ये झाली.
वृत्तपत्र हे कोणत्या प्रकारचे प्रसार माध्यम आहे ?
वृत्तपत्र हे मुद्रित माध्यमांद्वारे समाजात जागृती निर्माण करणारे प्रसार माध्यम आहे.
मराठीतील पहिले वृत्तपत्र किती भाषेत प्रकाशित होत असे ?
मराठीतील पहिले वृत्तपत्र दोन भाषेत प्रकाशित होत असे. मराठी भाषेतील मजकूर सर्वसामान्य जनतेसाठी तर इंग्रजी मजकूर राज्यकर्त्यांसाठी होता.