अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी भाषण मराठी

Ahilyabai Holkar Punyatithi Bhashan Marathi – महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी आहे. त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये अनेक वीरांगणा देखील होऊन गेल्या त्यामधीलच एक विरांगणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होय. आज 13 ऑगस्ट अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी.

अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक ठिकाणी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, यासारख्या स्पर्धांच्या आयोजन केले जाते. म्हणूनच मी आज अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त भाषणातून (ahilyabai holkar punyatithi bhashan marathi) माझे विचार भाषण रूपाने आपल्यासमोर मांडत आहे.

या भाषणाच्या मदतीने अहिल्याबाई होळकर यांचे कार्य तुमच्या लक्षात येईल, तसेच या भाषणाच्या मदतीने तुम्हीही शाळेत किंवा महाविद्यालयातील, किंवा इतर ठिकाणी अहिल्यादेवी होळकर भाषण मराठी निबंध तयार करू शकाल.

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी भाषण मराठी (Ahilyabai Holkar Punyatithi Bhashan Marathi)

Ahilyabai Holkar Punyatithi Bhashan Marathi

अध्यक्ष! महोदय! गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी. याच्या निमित्ताने मी तुमच्यापुढे माझे दोन शब्द मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे, हीच माझी इच्छा.

अहिल्याबाई होळकर यांनी केवळ मंदिरांचे जिर्णोद्धार केले, अनेक नवनवीन मंदिरे उभारली,पाणपोई काढल्या. एवढेच त्यांचे कार्य आहे. असा काही जण पुनरुच्चार करतात. परंतु आज मी माझ्या भाषणाच्या निमित्ताने अहिल्याबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्या एक कर्तबगार राज्यकर्ती म्हणून देखील कशा सर्वश्रेष्ठ होत्या ते मी माझ्या भाषणातून मांडणार आहे.

अहिल्याबाई होळकर एक थोर राज्यकर्ती, शासनकर्ती, उत्तम प्रशासक या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांच्याविषयी एकच म्हणेन,

मनगटात जिच्या
दहा हत्तींचे बळ होते
जिची तलवार शत्रूवर
आग ओकत होती
इंग्रजांनाही भीक न घालणारी
राणी अहिल्या होती.

आपल्या लक्षात आले असेलच की, अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रामध्ये मंदिर उभारणी मंदिरांचा जिर्णोद्धार यासाठी खूप मोलाचे कार्य केले त्याचबरोबर एक उत्तम प्रशासक म्हणून देखील त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे.

अहिल्याबाई होळकर यांचा अगदी लहानपणीच मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी विवाह झाला. वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर हे अगदी बिनधास्त जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व होते. साहजिकच बऱ्याचशा जबाबदाऱ्या अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे सासरे यांना पार पाडाव्या लागल्या.

एसवी सन 1754 साली झालेल्या कुंभेरच्या लढाईत पती खंडेराव होळकर मारले गेल्यानंतर त्या कालच्या प्रथेप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांना सती जाणे भाग होते. परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून अटकाव केला.

तसेच अहिल्याबाई होळकर यांना राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली. या जबाबदारीतूनच आपल्याला त्या एक उत्कृष्ट शासनकर्त्या कशा होत्या? याचा प्रत्यय आपल्याला येईल.

अहिल्याबाई होळकर यांनी इंदूर या ठिकाणी असणारी आपली राजधानी प्रशासनाच्या सोयीसाठी महेश्वरला नेली. एका महिलेसाठी आपले राजधानीचे ठिकाण बदलणे अतिशय अवघड बाब, परंतु अहिल्याबाई होळकर यांनी ती लिलया पार पाडली. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर आपल्या राज्यामध्ये चालणारी अनागोंदी, चोऱ्या, दरोडे यांना अटकाव करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले जातीने या कामात लक्ष घातले.

प्रशासन चालवत असताना अहिल्याबाई होळकर यांच्या पदरी असणारे दिवाण गंगोबा तात्या अहिल्याबाई होळकर यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत होते. त्यावेळी त्याचा देखील समाचार घेण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले.

गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी गावागावांमध्ये पंचांची नेमणूक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अहिल्याबाई होळकर यांनी केली आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला.

अहिल्याबाई होळकर या एक उत्तम प्रशासक होत्या हे त्यांनी घेतलेले का निर्णयावरून आपल्याला समजते तो निर्णय म्हणजे शेती करमुक्त केली.

आज आपण ज्या समान नागरी कायद्याच्या वल्गना करतो, परंतु अहिल्याबाई होळकर यांनी आपला राज्यकारभार करीत असताना सर्वांसाठी समान कायदा ही भूमिका अगदी त्या काळापासूनच घेतलेले आपल्याला दिसते.

थोडक्यात सांगायचे झाले तर अहिल्याबाई होळकर यांची एकच बाजू आजपर्यंत आपल्याला माहिती होती आज मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून त्या एक उत्तम शासन करता हे सांगण्याचा प्रयत्न केला.

माझ्या वाणीला विराम देत असताना अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी एकच म्हणेन

असंख्य राण्या या जगतात होऊन गेल्या
परंतु पुण्यश्लोक अहिल्याबाई
यासारखी राणी होणे नाही
आजही गर्व जिचा आहे
मराठी माणसाला
आज अभिवादन करतो
त्यांना त्यांच्या पुण्यतिथीला.

माझे हे अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त लांबलेले भाषण (Ahilyabai Holkar Punyatithi Bhashan Marathi) आपण शांतचित्ताने ऐकले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद! जय महाराष्ट्र..

सारांश

आशा करतो की, अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी भाषण मराठी (Ahilyabai Holkar Punyatithi Bhashan Marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असेल. या भाषणाचा आधार घेत तुम्हीही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त भाषणाची तयारी करू शकता.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त इतकेच सांगतो की, चला त्यांचे आदर्श पुढे नेऊया आणि सशक्त, सर्वसमावेशक आणि उज्वल भारत निर्माण करण्याच्या दिशेने काम करूया.

Leave a Comment