अहमदनगर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक जिल्हा माहिती मराठी

Ahmednagar Information In Marathi – अहमदनगर महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने शहर असून राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा खूपच रोमांचक इतिहास आहे. 28 मे 1490 या रोजी अहमदनगर या शहराची स्थापना झाली. अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार उत्तरेला नाशिक व औरंगाबाद, पूर्वेला बीड, दक्षिणेला सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेला पुणे व ठाणे असा आहे.

या लेखातून आपण महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा – अहमदनगर माहिती मराठी (Ahmednagar information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि पर्यटन, जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती अशी विविध माहिती जाणून घेणार आहोत.

अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती (Ahmednagar information in marathi)

Ahmednagar information in marathi
नाव अहमदनगर
क्षेत्रफळ17, 048 चौ. किमी
स्थापना 28 मे 1490
स्थानिक भाषा मराठी
लोकसंख्या3, 50, 905 (इसवी सन 2011)
स्थान व विस्तारपूर्व – बीड
पश्चिम – पुणे
दक्षिण – सोलापूर
उत्तर – नाशिक व औरंगाबाद
प्रशासकीय विभाग नाशिक
तालुके14
प्रमुख नद्या आणि धरणेनदी – गोदावरी
धबधबा – रांधा धबधबा
प्रमुख पीक गहू, ज्वारी, बाजरी, भुईमूग, ऊस
प्रमुख फळपीकमोसंबी, डाळिंब, द्राक्षे
प्रमुख पर्यटन स्थळे नेवासे
चांदबीबीचा महाल
भुईकोट किल्ला
हरेगाव
भिंगार छावणी
शिर्डी साईबाबा
सिद्धटेक – श्री सिध्दीविनायक
आरटीओ कोड MH 16
MH 17
MH 51
वेबसाईट 1. https://amc.gov.in/ (महानगरपालिका)
2. https://ahmednagar.nic.in/ (राज्य सरकार)
अहमदनगर माहिती (Ahmednagar information in marathi)

अहमदनगर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा (maharashtra largest district) आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नाशिक आहे. जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.

गोदावरी ही प्रमुख नदी असून भीमा, घोड, सीना, कुकडी या नद्या आहेत. प्रवरा नदीकाठी ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी सांगितली. प्रवरा या नदीवर भंडारदरा हे मोठे धरण आहे. पाण्याच्या उपलब्धतनुसार राज्यात ऊस उत्पादनात अहमदनगरचा राज्यात दुसरा क्रमांक आहे.

सर्वाधिक साखर कारखाने आपल्या अहमदनगर जिल्ह्यात आहेत. इलेक्ट्रॉनिक उद्योग आणि वाहांनाचे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमधील सेंट तेरेसा चर्च महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून ओळखले जाते. राहता तालुक्यात जगप्रसिद्ध शिर्डीचे साईबाबा मंदिर आहे. अष्टविनायक गणपतीपैकी सिध्दीविनायक गणपती कर्जत तालुक्यात आहे. नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर मंदिर प्रसिद्ध असून, या गावात बिनादरवाज्याचे गाव म्हणून ओळखले जाते.

अहमदनगरचा इतिहास माहिती मराठी (history of ahmednagar information in marathi)

भारतातील सर्वात जुना जिल्हा अहमदनगर असून, याची स्थापना 28 मे 1490 साली झाली. जिल्ह्याची निर्मितीचे श्रेय मलिक अहमदला दिले जाते. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा आणि बहिरंभट कुलकर्णीचा नातू होता. तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

इसवी सन 14 व 15 व्या शतकात दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत बहामनी यामध्ये तिमाभट सुभेदार बनला. बहामनी साम्राज्याचा विस्तार दिवाण महंमद गावानमुळे झाला, पण त्याची राज्यकारभारावरील पकड कमकुवत झाल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

यावेळी तिमाभटाचा मुलगा मलिक अहमद याने स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य घोषित केले, पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे अहमदची राजधानी होती.

तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात अहमदने बहामनी सैन्याचा पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी 28 मे 1490 रोजी अहमदने अहमदनगर शहराची स्थापना केली.

अहमदच्या फौजेत लढणारा राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद हे नाव होते, ही एक विशेष बाब आहे.

या साम्राज्याच्या मूळ पुरुष बहिरंभट असल्याने त्याच्या नावावरून सर्व घराण्याने बहिरी नाव धारण केले. तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला. यामुळे अहमद आणि त्याच्या साम्राज्याला निजामशाही म्हणून ओळखले जाते.

त्यानंतर मलिक अहमदने अहमदनगर शहरात अंडाकृती भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली. किल्ल्यामध्ये पाण्याची सोय म्हणून गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या 4 विहिरी बनविल्या. सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बनविले.

तत्कालीन कालखंडात भुईकोट किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. या शहरास कोटबाग निजाम नाव दिले गेले. कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे होते की, त्याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची.

निजाम या शब्दाचा अर्थ जमिनीची व्यवस्था पाहणारा असा आहे. त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले.

हैदराबाद येथील निजामशाही आणि अहमदनगरची निजामशाही यांचा काहीही संबंध नाही. ते पूर्णतः वेगळी आहे.

अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबर हा शूर आणि धोरणी प्रधान होता. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. तसेच शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला, त्यामुळे मलिक अंबरला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते.

शिवाजी महाराजांचे आजोबा, वडील आणि इतर भाऊबंद याच निजामशाहीत होते. मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील) या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केल्याची नोंद आहे.

भोसले घराण्याबरोबर निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले.

भोसले आणि घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परांडा, औसा, उदगीर, धारूर, देवगिरी यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले.

अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण 11 निजाम होऊन गेले. त्यापैकी चौघांचे खून झाले. तरीदेखील 125 वर्षे ही राजसत्ता टिकली. इसवी सन 1636 साली शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि निजामशाही साम्राज्य संपले.

त्यानंतर इसवी सन 1636 ते 1759 पर्यंत अहमदनगर साम्राज्य मोगलांच्या ताब्यात होते. मुघल बादशहा औरंगझेब याचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी अहमदनगर येथे झाला.

नगरचा किल्ला ताब्यात घेण्याची इच्छा शिवाजी महाराज यांची होती, पुढे इसवी सन 1759 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यांनतर नगरचा किल्ला महादजी शिंदेच्या जहागिरीत होता.

मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिस यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे 1817 रोजी हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला. त्यानंतर ब्रिटिशांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. ब्रिटिशांमुळे नगर शहराचे आधुनिकीकरण झाले.

पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. यामधे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांचा समावेश आहे.

नगरच्या तुरुंगात असताना जवाहरलाल नेहरूंनी भारताचा शोध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान तर मौलाना आझाद यांनी गुब्बारे खातिर् हे ग्रंथ लिहिले आहेत.

अहमदनगरच्या पावणभुमित अनेक संत, समाजसुधारक, राजकारणी, उद्योजक, खेळाडू, साहित्यिक, अभिनेते जन्मले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा ही देशातील एकमेव नगरपालिका आहे, जिला राष्ट्रीय भूजल पुरस्कार मिळालेला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचा भूगोल माहिती मराठी (geography of ahmednagar district in marathi)

अहमदनगर शहराची समुद्रसपाटीपासून उंची 649 मीटर इतकी आहे. याचे नकाशावरील स्थान 19.08° उत्तर अक्षांश 74.73° पूर्व रेखांश असे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरला ओळखले जाते.

अहमदनगर जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात.

पश्चिमी डोंगराळ क्षेत्रमध्यवर्ती पठार प्रदेशउत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र
अकोले आणि संगमनेर तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. पारनेर, अहमदनगर तालुका, संगमनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील काही भागाचा समावेश होतो.श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यांचा समावेश होतो.
अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगडच्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. घोड, भीमा आणि सिना नद्यांचे खोरे आहे.
सह्याद्री पर्वतरांग मधील सर्वोच्च उंच शिखर कळसूबाई, ज्याची उंची 5427 फूट आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील विभाग (Ahmednagar information in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील नद्यांची नावे (rivers in ahmednagar district in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी आणि भीमा नदी आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. याव्यतिरिक्त प्रवरा, मुळा, सिना आणि धोरा या नगर जिल्ह्यातील नद्या आहेत.

अकोले तालुक्यातील प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे. या नदीवर भंडारदरा हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या परिसरात रंधा धबधबा आहे. राहुरी तालुक्यात मुळा नदीवर बारागाव नांदूर येथे धरण बांधण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पिक माहिती मराठी (ahmednagar agriculture information in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पिक गहू, ज्वारी, बाजरी, भुईमूग आणि ऊस हे आहेत. तर जिल्ह्यातील प्रमुख फळपिके मोसंबी, डाळिंब आणि द्राक्षे ही आहेत.

ऊस उत्पादन क्षेत्र आणि उत्पादनात अहमदनगरचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. श्रीरामपूर तालुक्यातील मोसंबी जगप्रसिद्ध आहे. राहुरी तालुक्यात एक कृषी विद्यापीठ आहे, यामधून शिक्षण घेऊन आज यशस्वी शेतकरी उद्योजक घडत आहे.

हा लेख जरूर वाचाभारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती मराठी (india’s major crops information in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील औद्योगिक विकास (ahmednagar industrial development in marathi)

अहमदनगर जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या संख्येने आहेत. कै. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरालोणी या ठिकाणी इसवी सन 1949 साली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. साखर उत्पादनात अहमदनगरचा राज्यात पहिला क्रमांक लागतो.

या व्यतिरिक्त जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक उद्योग आणि वाहन उद्योग अस्तित्वात आहेत.

हा लेख जरूर वाचाएमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहिती (midc full form in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन माहिती मराठी (ahmednagar government information in marathi)

Ahmednagar map in marathi
Image Credit – ahmednagar.nic.in

अहमदनगर जिल्ह्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त शहरांचा कारभार पाहण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिका कार्यरत आहेत. तर गावांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद समिती कार्यरत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1311 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 194 ग्रुप ग्रामपंचायती आहेत. तर 1175 स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासन माहिती (maharashtra police information in marathi)

अहमदनगर जिल्ह्यात 7 महसूल विभाग आणि 14 तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे…

महसूल विभागतालुके
नगर विभाग1. नगर
2. नेवासा
कर्जत विभाग1. कर्जत
2. जामखेड
पाथर्डी विभाग1. पाथर्डी
2. शेवगाव
श्रीगोंदा विभाग1. श्रीगोंदा
2. पारनेर
संगमनेर विभाग1. संगमनेर
2. अकोले
शिर्डी विभाग1. राहता
2. कोपरगाव
श्रीरामपूर विभाग1. श्रीरामपूर
2. राहुरी
अहमदनगर जिल्ह्यातील तालुके यादी (Ahmednagar district taluka list in marathi)

अहमदनगर मधील प्रसिद्ध व्यक्ती (Famous personalities of Ahmednagar information in marathi)

अहमदनगरच्या पावणभुमित अनेक संत, समाजसुधारक, राजकारणी, उद्योजक, खेळाडू, साहित्यिक, अभिनेते जन्मले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर यांनी नेवासा येथे पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली.

अहमदनगरजवळील शिर्डी हे संत साईबाबांची कर्मभूमी असणारे गाव आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक भक्त साई बाबांच्या मंदिरास भेट देतात.

जैन धर्मग्रंथ आणि अन्य धर्मांची शिकवण देणारे आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी इसवी सन 1920 साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.

भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू मेहेर बाबा यांनी जीवनभर धार्मिक कार्य अहमदनगर जिल्ह्यात केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले.

गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर हे एक मराठी नाट्य आणि हिंदी, मराठी, ओरिया, हरियाणी, भोजपुरी, बंगाली व गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर या ठिकाणचे आहेत.

रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी होते. यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला असून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते.

बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे होते. यांना राजकारणी, गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार म्हणून ओळखले जाते.

हा लेख जरूर वाचामराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi)

भाई सथ्था आणि दादा चौधरी हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ मधू दंडवते यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला आहे.

मराठी लेखक, कवी नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक हे नगरचे रहिवासी आहेत. ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी या गावातील रहिवासी आहेत.

नरेंद्र फिरोदिया हे अहमदनगर मधील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत.

निवृत्तीनाथ महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे गाव आहे. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.

अहमदनगर शिक्षण संस्था माहिती मराठी (ahmednagar education society information in marathi)

अहमदनगर जिल्ह्यात सर्व गावात प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत असणाऱ्या गावात 7 वी पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. तर ग्रुप ग्रामपंचायती मध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय केली आहे.

यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यात अनेक कॉलेज संस्था असून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. अहमदनगर जिल्ह्यात अभियांत्रिकी शिक्षण, मेडिकल कॉलेज, वकिली शिक्षण, कृषी विद्यापीठ, आयटीआय, आणि इतर व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक सेवा (ahmednagar transport service in marathi)

अहमदनगर जिल्ह्यातील आरटीओ पासिंग MH 16, MH 17 आणि MH 19 आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक सेवा अतिशय झपाट्याने विकसित होत आहे. अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, बीड, सोलापूर, नाशिक या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांने जोडले गेले आहे.

रेल्वे आणि विमान वाहतूक सेवा अतिशय झपाट्याने विकसित होत आहे. दौंड – मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.

साई आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिर्डी हे नगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे माहिती मराठी (ahmednagar tourist places in marathi)

नेवासे या ठिकाणी प्रवरा नदीच्या काठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. नेवासे तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील मंदिर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शनी शिंगणापूरला दरवाजा नसलेले गाव म्हणून ओळखले जाते.

अहमनगरजवळील चांदबीबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी आणि कारागृह प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

हा लेख जरूर वाचाहरिश्चंद्रगड माहिती मराठी (harishchandragad trek information in marathi)

अहमदनगर येथील कारागृहात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते डांबण्यात आले होते. तुरुंगात असताना जवाहरलाल नेहरूंनी भारताचा शोध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान तर मौलाना आझाद यांनी गुब्बारे खातिर् हे ग्रंथ लिहिले आहेत.

राहुरी तालुक्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, अकोले येथे अगस्तींचा आश्रम आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी असणारे सेंट तेरेसा चर्च महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून ओळखले जाते. जेरुसलेम हे येशू ख्रिस्ताचे जन्मस्थळ आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी आहे. नगर तालुक्यात सरपंच पोपटराव पवार यांनी हिरवे बाजार गावाला आदर्श गाव बनविले.

जामखेड तालुक्यातील चोंडी ही पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आहे. राहता तालुक्यात शिर्डीचे साईबाबा मंदिर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तर कोपरगाव तालुक्यात संत चांगदेव महाराजांची समाधी आहे. अष्टविनायकांपैकी श्री सिद्धिविनायक हा गणपती कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथे आहे.

सेनापती बापट यांची जन्मभूमी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहे. अकोला तालुक्यातील भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. कर्जत तालुक्यातील देऊळगाव-रेहेकुरी या ठिकाणी काळवीट अभयारण्य प्रकल्प आहे.

सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कळसुबाई ज्याची उंची 1646 मीटर आहे, ते अहमदनगर जिल्ह्यात आहे. अहमदनगर आणि सोलापूरच्या सीमेवर नान्नज या ठिकाणी माळढोक पक्षी अभयारण्य हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

सारांश

या लेखातून आपण महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा – अहमदनगर माहिती मराठी (Ahmednagar information in marathi) माहिती जाणून घेतली. यात आपण अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, नद्यांची नावे, पिके, औद्योगिक, प्रशासन, प्रसिद्ध व्यक्ती, शिक्षण संस्था, वाहतूक सेवा, पर्यटन स्थळे माहिती मराठी जाणून घेतली.

अहमदनगर माहिती मराठी (Ahmednagar information in marathi) तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते ?

अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून हिवरे-बाजार या गावाला ओळखले जाते. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात आहे.

अहमदनगरचे क्षेत्रफळ किती आहे ?

अहमदनगरचे क्षेत्रफळ 17, 048 चौ. किमी इतकी आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कर्जत हा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एक अवतारी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते ?

अहमदनगर जिल्ह्यातील एक अवतारी पुरुष म्हणून शिर्डीच्या साईबाबांना ओळखले जाते.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

अहमदनगर जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत.

अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे ?

अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगननेनुसार 45, 43, 080 इतकी आहे.

निजामशाही नंतर अहमदनगर कोणी काबीज केले ?

इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा शेवट झाला. त्यानंतर शाहजहानने अहमदनगर काबीज केले.

अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली ?

अहमदनगर जिल्ह्याची स्थापना 28 मे 1490 रोजी झाली.