हवेतील वायूंचे प्रमाण

Categorized as Blog

Air Information In Marathi – सर्व सजीव सृष्टी जिवंत राहण्यासाठी आवश्यक असे ऑक्सिजन हा एक वायू आहे. हवेमध्ये ऑक्सिजन वायू नेहमी रेणू स्वरूपात असतो. या लेखातून आपण हवेतील वायूविषयी (air information in marathi) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हवेत असणारे वायू, त्याची वैशिष्ट आणि उपयोग या लेखातून आपण समजावून घेणार आहोत.

कोणत्या वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक आहे?

विषय हवेतील वायू
प्रकार नैसर्गिक साधनसंपत्ती
समावेश नायट्रोजन
ऑक्सिजन
अरगॉन
कार्बन डाय-ऑक्साइड
निऑन
हेलियम
मिथेन
वातावरणाचे वस्तुमान5.15 × 1021 ग्रॅम

हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायु (The most abundant air) म्हणजे नायट्रोजन आहे. नायट्रोजनचे हवेतील प्रमाण 78.09% इतके आहे. त्यानंतर 20.95% ऑक्सिजन हवेमध्ये आढळतो. ऑक्सिजन हा सर्व सजीवांना श्वास घेण्यासाठी आवश्यक असतो.

अरगॉन या वायूचे हवेतील प्रमाण 0.93% इतके आहे. कार्बन डाय-ऑक्साइडचे हवेतील प्रमाण 0.039% इतके आहे. निऑन हा वायू 0.001818% या प्रमाणात हवेत आढळतो, तर 0.000524% इतक्या प्रमाणात हेलियम हा वायू आढळतो. हवेतील वायूंच्या प्रमाणात सर्वात कमी प्रमाणात आढळणारा वायु म्हणजे मिथेन होय. मी त्यांच्या हवेतील प्रमाण 0.000179% इतके आहे.

हवेतील वायूंचे वैशिष्ट माहिती मराठी

  • ऑक्सिजन हा वायू हवेमध्ये रेणू स्वरूपात आढळतो.
  • फुग्यात हेलियम हा हलका वायू भरलेला असतो.
  • मिथेन हा कार्बन डाय-ऑक्साइड चा तुलनेने वीस पटीने जास्त उष्णता शोषून घेतो. त्यामुळे मिथेन हा हरितगृह परिणामास (Green house effect) कारणीभूत ठरतो.
  • चुन्याच्या निवळीत कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू जाऊ दिला तर निवळी दुधी रंगाची बनते.
  • अमोनिया वायू पाण्यात सहज द्रावणीय असतो. अमोनिया वायू मुळे पाण्यात कारंजे तयार होतात.
  • अमोनियम हायड्रॉक्साइडला लिकर अमोनिया असे म्हणतात. अमोनिया हा वायू ज्वलनशील नसतो. ज्वालामुखीच्या प्रदेशात आमोनिया वायूंचे क्षार आढळतात.
  • सल्फर डायऑक्साइड हा विषारी वायु रंगहीन आहे, त्याचा वास ठसका येणारा वास आहे.
  • प्रयोगशाळेत हायड्रोजन सल्फाइड वायू तयार करण्यासाठी किपचे उपकरण वापरतात. हायड्रोजन सल्फाइडचा वास सडक्या अंड्यासारखा आहे. हा वायू हवेमध्ये निळसर ज्योतीने जळतो. पोटॅशियम डायक्रोमेटच्या आम्लीकृत नारंगी द्रावणातून हायड्रोजन सल्फाइड हा वायू प्रवाहित केल्यास द्रावणाला हिरवा रंग येतो.
  • ब्रॅड या जर्मन शास्त्रज्ञाने फॉस्फरसचा शोध लावला. तांबड्या फॉस्फरसचा ज्वालनांक 260° सेल्सिअस इतका आहे.
  • पिवळ्या फॉस्फरसचा वास लसणासारखा येतो. पिवळा फॉस्फरस 30 अंश सेल्सिअस मध्ये हवेत पेट घेतो म्हणून त्याला नेहमी पाण्याखाली ठेवतात.

हवेतील वायूंचे उपयोग माहिती मराठी

सजीवांना आवश्यक अशी प्रथिने (Protein) निर्मिती करण्यासाठी नायट्रोजन या वायूचा उपयोग होतो. तसेच नायट्रोजन या वायूमुळे खाद्य पदार्थ हवाबंद (Foods airtight) ठेवण्यासाठी वापर केला. हार्मोनियम ची निर्मिती ही नायट्रोजन वायू पासून होते.

ऑक्सिजन हा सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा वायू आहे. तसेच ज्वलनासाठी देखील ऑक्सिजनचा वापर होतो. कारण ऑक्सिजन हा ज्वलनशील वायू आहे.

फ्लोरोसेंट पाईप मध्ये क्रिप्टॉन या वायूचा वापर होतो. तर अरगॉन या वायूचा वापर विजेच्या बल्बमध्ये (Light bulb) केला जातो.

वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन-डाय-ऑक्साइड हा वायू लागतो. तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये देखील कार्बन डाय-ऑक्साइडचा वापर केला जातो.

विना पंख्याचा इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये हेलियम हा वायू वापरण्यात येतो. हेलियमचा दुसरा वापर कमी तापमान मिळवण्यासाठी केला जातो.

फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनोन हा वायू वापरतात, तर जाहिरातींसाठीच्या दिव्यात आणि रस्त्यावरच्या दिव्यात निऑन हा वायू वापरला जातो.

बर्फ निर्मितीच्या कारखान्यात शीतक (cooler) म्हणून अमोनियाचा वापर करतात. तसेच अमोनियाचा उपयोग खत निर्माण करण्यासाठी (To produce manure) करतात.

द्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी केला जातो. साखर उद्योग, कृतीम धागे निर्मिती करताना विरंजक म्हणून सल्फर डायऑक्साइडचा वापर केला जातो. तसेच सल्फर डायऑक्साइडचा उपयोग सल्फुरिक अँसिडच्या निर्मितीत आणि घरघुती शितकपाटात शितक म्हणून करतात.

सल्फर डायऑक्साइड हा क्षपणक आणि विरंजक म्हणून कार्य करतो. तसेच सुकी फळे टिकवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या मूलद्रव्यांची वनस्पतींना सर्वाधिक आवश्यकता असते.

क्लोरीन हा हिरव्या रंगाचा अधातू आहे. तो अतिविषारी अधातु म्हणून ओळखला जातो. याचा वापर पहिल्या महायुद्धात हत्यार म्हणून वापर करण्यात आला होता.

धातूचे धन मुलके ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत हायड्रोजन सल्फाइड हा वायू वापरतात.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण हवेतील वायू मराठी माहिती (air information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

FAQs

वातावरणाचे पाच थर कोणते आहेत?

वातावरणाचे पाच थर पुढीप्रमाणे आहेत.
1. ट्रॉपोस्फियर
2. स्ट्रॅटोस्फियर
3. मेसोफेयर
4. थर्मोस्फीयर
5. एक्सोस्फीयर

वातावरणात कोणता वायू अधिक प्रमाणात असतो?

वातावरणात नायट्रोजन वायू अधिक प्रमाणात असतो. याचे हवेतील प्रमाण 78.09 % इतके आहे.

अरोरा प्रकाश वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?

अरोरा प्रकाश वातावरणाच्या पृथ्वीच्या ध्रुविय भागामध्ये आढळतो.

पृथ्वीवरील सर्व सजीवांचे अस्तित्व असलेल्या थरास काय म्हणतात?

पृथ्वीवरील सर्व सजीवांचे अस्तित्व असलेल्या थरास ट्रॉपोस्फियर असे म्हणतात.

वातावरणात ऑक्सिजन ची टक्केवारी किती आहे?

वातावरणात ऑक्सिजन ची टक्केवारी 20.95% आहे

वातावरणाच्या कोणत्या थरात अभिसरण प्रवाहाचा विभाग असे म्हणतात?

वातावरणाच्या तपांबर या थरात अभिसरण प्रवाहाचा विभाग असे म्हणतात.

दलांबर या थराचा वातावरणामध्ये विस्तार किती किलोमीटर पर्यंत आहे?

दलांबर या थराचा वातावरणामध्ये विस्तार 360 ते 400 किलोमीटर पर्यंत आहे.

हवेमध्ये कोण कोणते वायू असतात?

हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, अरगॉन, कार्बन डाय-ऑक्साइड, निऑन, हेलियम, मिथेन हे वायु असतात.

वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती आहे?

वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण 78.09% इतके आहे.

एलपीजी मध्ये कोणता ज्वलनशील घटक असतो?

एलपीजी मध्ये द्रवरूप हायड्रोकार्बन हा ज्वलनशील घटक असतो, त्यात प्रोपेन 30% ब्युटेन 70% असतो.