वायू प्रदूषण होण्याची कारणे आणि उपाययोजना माहिती

Air pollution information in marathi – हवा, जल, भूमी आणि ध्वनी हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. मागील लेखात आपण पर्यावरण प्रदूषण का होते, प्रदूषणाचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेतली आहे.

आता आपण वायू प्रदूषण या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण हवा प्रदूषण का होते (Air Pollution Information In Marathi) आणि यावर काय उपाययोजना कराव्यात, याविषयी चर्चा करणार आहोत.

वायू प्रदूषण मराठी माहिती (Air Pollution Information In Marathi)

air pollution information in marathi

वायु प्रदूषण म्हणजे काय तर हवेमध्ये झालेले भौतिक, जैविक किंवा रासायनिक बदलामुळे सजीवाच्या आरोग्याला, सुरक्षेला आणि कल्याणला हानी पोहचते. यालाच वायुप्रदूषण असे म्हणतात.

वायू प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती मराठी (vayu pradushan marathi) – हे प्रदूषण देखील मानवनिर्मित आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करणे आपलेच काम आहे. साधारणपणे हवेचे प्रदूषण दोन प्रकारांनी होते. यातला पहिला प्रकार नैसर्गिक आणि दुसरा मानवनिर्मित.

1. नैसर्गिक प्रदूषण – या प्रकारात साधारणपणे वादळ, वनवे, ज्वालामुखी आणि अवर्षण अशा घटनांचा समावेश होतो. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने निसर्गताच यावर उपयोजना होत असतात.

2. मानवनिर्मित प्रदूषण – मानवाने तयार केलेले उद्योगधंदे वस्तू निर्मितीसाठी तयार केलेले कारखाने, स्वयंचलित वाहने आणि घरगुती इंधन ज्वलनातून हवेचे प्रदूषण होते. हवा प्रदूषणामध्ये विविध प्रकारचे गॅसेस आणि धूर हे प्रदूषक असतात.

vayu pradushan in marathi – या प्रदुषणाने सगळ्याच सजीवसृष्टीला धोका पोहोचत असतो. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन वायू ची गरज भासते. पण या प्रदूषणामुळे ऑक्सिजन वायू हा विषारी बनत जातो परिणामी आपल्या आरोग्याला अनेक प्रकारांनी धोका निर्माण होत असतो.

खालील तक्त्यामध्ये आपण औद्योगिक क्षेत्रामुळे कोण कोणते परिणाम होतात याविषयी माहिती जाणून घेऊ.

औद्योगिक कारणपरिणाम
रंग बनवण्याच्या प्रक्रियेतून स्फोटक पदार्थ निर्माण होतात.श्वसनसंस्थेचे ला सूज येणे.
डोळे आणि त्वचेला हानिकारक असते.
वाहने आणि कारखान्यांमधून जाळलेल्या हायड्रोकार्बन्सरक्तातील ऑक्सिजन कमी होतो.
डोकेदुखी आणि डोळे दुखतात.
स्नायुंचे विकार होतात.
वाहनातून निर्माण होणारा धूरफुप्फुसावर परिणाम करतो.
कोळसा आणि तेल जाळल्यानेछातीवर दाब येतो.
डोकेदुखी आणि उलट्या होणे.
श्वसन संस्थेचे विविध विकार होतात.
कारखान्याच्या चिमणीतून येणारा धूरडोळ्याची आग होते आणि कॅन्सर होण्याची शक्यता
पारायुक्त कीटकनाशक बनवल्यानेमिनीमाटा रोग होण्याची शक्यता
बोरोन निर्मिती संयंत्रातून मानसिक विकार जडतात.
चिडचिड होते आणि शरीराला सूज येते.
तंबाखू
किंवा धूम्रपान करताना तयार झालेल्या धूर
कॅन्सर होण्याची शक्यता
पेट्रोलियम शुध्दीकरणश्वसन यंत्रणेवर गंभीर परिणाम होतो.
रासायनिक कारखाने, पेपर मिल्सघसा दुखणे,
डोळ्याची आग होणे.
झोप न येणे.
air pollution causes and effects in marathi

याचबरोबर कायम धुरामध्ये बसल्याने डोळे सुजणे, डोळ्याची आग होणे, नाकाचा दाह होणे, दमा आणि फुप्फुसाचे अनेक आजार होतात. हा परिणाम प्रामुख्याने खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर होत असतो. कारण खेड्यात लाकडाला इंधनाचे साधन म्हणून जास्त वापरले जाते.

Related – भारतातील खनिज तेल माहिती मराठी

वायू प्रदूषण कारणे मराठी माहिती (vayu pradushan in marathi)

वरील तक्यात पाहिल्याप्रमाणे हवेचे प्रदूषण मुख्यतः धुरामुळे होत आहेत.

1. यामध्ये विविध प्रकारचे गॅसेस जास्त करून असतात. घरगुती इंधन म्हणून वापरण्यात येणारे लाकूड आणि गॅस यापासून वायू प्रदूषण होत असते.

2. त्याचप्रमाणे स्वयंचलीत वाहणापासून बाहेर पडणारा धूर वातावरणात मिसळतो, आणि हवा दूषित करतो.

3. घरात किंवा औद्योगिक ठिकाणी होणारा कचरा आणि कुजलेले पदार्थाचे योग्य विल्हेवाट लावली नाही, तर त्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू हवेत मिसळले जाते. परिणामी वायू प्रदूषण होते.

4. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने हवा दूषित होत आहे. यामुळे यावर उपाययोजना म्हणून शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

5. औद्योगिक विकास क्षेत्रात विविध प्रकारच्या रासायनीक पदार्थाचा उपयोग करून नवनवीन प्रयोग केले जातात. यातून नवीन पदार्थ बनवले जातात. यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे रासायनिक द्रव्ये हवेत मिसळले जातात आणि हवा दूषित करतात.

Related – जल प्रदूषण होण्याची कारणे मराठी माहिती

वायू प्रदूषणाचे परिणाम मराठी माहिती (Air Pollution Information In Marathi)

6. हवा दूषित झाल्याने सर्व सजीवांना घातक परिणाम भोगावे लागतात. यामध्ये मानवाला विविध प्रकारच्या आजारांना समोर जावे लागते. यातील काही आजाराबद्दल माहिती वरील तक्त्यात दिली आहे.

7. हवेतील प्रदूषकांमुळे वनस्पतीची वाढ होत नाही. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गवतामध्ये वाहनांच्या धुरात असणारे शिसांचे सूक्ष्म कण मिसळतात. असे गवत प्राण्यांनी खाल्ल्यावर त्यांच्या आरोग्यवर वाईट परिणाम होतो.

8. खनिज तेलाचे उत्पादन करणारा क्षेत्रामध्ये वनस्पतींचे संख्या कमी असते. याचे कारण म्हणजे खाजिन तेलाने होणारे प्रदूषण वनस्पतींना घातक ठरते.

9. हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम दगड आणि धातूवर होतो. त्यामुळे दगडी, लाकडी, मातीचे आणि धातूची शिल्पे यावर दूषित हवेची प्रक्रिया होत असते.

10. ओझोन वायूचा ठर कमी होणे – ओझोन वायू सूर्यापासून येणारी अल्ट्राव्हायोलेटसारखी हानिकारक किरणे वातावरणाच्या वरच्या बाजूला रोखून धरण्याचे काम करीत असतो. या वायूचा थराला पृथ्वीचे कवच असे म्हणतात.

11. हवेतील क्लोरोफ्लोरो कार्बन हा प्रदुषक हवेत मिसळला जाऊन ओझोनच्या थरात पर्यंत जाऊन पोहोचतो. ओझोनला प्राणवायूत विघटित करतो परिणामी ओझोनचे प्रमाण कमी होत आहे.

12. दूषित हवा पावसावर देखील परिणाम करते. पावसावर परिणाम झाल्याने शेतीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पृथ्वीवर वाळवंटीकरण होण्याचा वेग झपाट्याने वाढेल.

13. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांतून बाहेर पडणारे प्रदुषक हवेत जाऊन मिसळतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत आहे.

14. पेट्रोल आणि डिझेल यामधे आढळणारे प्रदूषकांमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड, अर्धवट जळालेल्या हायड्रोकार्बन्स, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, शिशांची संयुगे, धूर आणि सूक्ष्म कणांचा समावेश होतो.

Related – पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती

वायू प्रदूषण उपाय योजना मराठी माहिती (vayu pradushan marathi mahiti)

15. प्रदूषण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वाढती लोकसंख्या, ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी व्यक्ती, समाज आणि शासन यांनी नियोजनपूर्वक काम करायला हवे.

16. रासायनिक कारखाने आणि तेल शुद्धीकरण कारखाने किंवा खत, कागद आणि धातू प्रक्रिया कारखाने या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या प्रदूषकांची सहनसीमा प्रत्येक उद्योगाने कटाक्षाने पाळला पाहिजे. असे केल्यास हवा प्रदूषणाचे प्रमाण निश्चितच कमी होईल.

17. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा आणि जैविक ऊर्जा अशा पारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करावा.

18. वाहनांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करून प्रदूषण नियंत्रण केले जाऊ शकते.

19. एकाच ठिकाणी कारखान्यांची गर्दी झाल्याने त्या परिसरातले सगळेच वातावरण प्रदूषित होऊन जाते यासाठी आपण कारखाने विकेंद्रित स्वरूपात विकसित करायला पाहिजे.

20. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले पर्यावरण ही सार्वजनिक संपत्ती असून या नैसर्गीक संपत्तीचा काळजीपूर्वक वापर करावा.

Related – पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी

वायू प्रदूषण प्रकल्प मराठी माहिती (vayu pradushan marathi project)

vayu pradushan project in marathi – शालेय उपक्रमात आणि सामाजिक उपक्रमात भाग घेऊन वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही प्रकल्प करणे आवश्यक आहे. यामध्ये विविध ठिकाणी झाडे लावून या झाडांची योग्य संगोपन करून आपण पर्यावरण संवर्धन करू शकतो.

पर्यावरण प्रदूषण कमी कसे करावे ? यावर जनजागृती करणे आवश्यक आहे. वायू प्रदूषण प्रकल्पाचे विश्लेषण याबाबत अधिक माहिती मिळवणे आणि वायू प्रदूषण प्रकल्पाचे महत्त्व सर्वांना पटवून देणे.

सारांश

या लेखातून आपण वायू प्रदूषण का होते (air pollution information in marathi) आणि त्यावर करायच्या उपाययोजना याची सविस्तर माहिती जाणून घेतली.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हवा प्रदूषणाची कोणतेही चार नैसर्गिक कारणे सांगा.

हवा प्रदूषणाची चार नैसर्गिक कारणे पुढीप्रमाणे.
1. जोरदार वादळ येणे
2. वणवे
3. ज्वालामुखी
4. अवर्षण

कोणत्या वर्षी हवा प्रदूषण नियंत्रण कायदा करण्यात आला ?

इसवी सन 1983 या वर्षी हवा प्रदूषण नियंत्रण कायदा करण्यात आला.

भारतात पर्यावरण विभाग स्वतंत्र रीतीने कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ?

भारतात पर्यावरण विभाग स्वतंत्र रीतीने इसवी सन 1986 या वर्षी स्थापन करण्यात आला.

हवे मध्ये कोण कोणते वायू असतात ?

हवे मध्ये नायट्रोजन, ऑक्सीजन, आरगॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलिअम आणि हायड्रोजन  हे वायू असतात.

वातावरणात कोणता वायू अधिक प्रमाणात असतो ?

वातावरणात नायट्रोजन हा वायू अधिक प्रमाणात असतो.

ज्वलनासाठी कोणता वायू गरजेचा असतो ?

ज्वलनासाठी ऑक्सिजन वायू गरजेचा असतो.

ऑक्सिजनचे वातावरणातील प्रमाण किती आहे ?

ऑक्सिजनचे वातावरणातील प्रमाण 21% इतके आहे.

नायट्रोजन ऑक्साईडचा मानवी शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम होतो ?

नायट्रोजन ऑक्साईडचा मानवी शरीराच्या दात आणि डोळे या अवयवावर परिणाम होतो.

वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती आहे ?

वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण 78% आहे.

हवा प्रदूषणाचे ताजमहालवर झालेले परिणाम लिहा.

हवा प्रदूषणाचे ताजमहाल वर झालेले परिणाम पुढीप्रमाणे आहेत.
ताजमहालावर 55% धुळीचे कण, 35% ब्राउन कार्बन कण आणि 10% काळे कण आढळले.
यासोबतच ताजमहालाचा रंग हवा प्रदूषणामुळे बदलत आहे.

Leave a Comment