अजातशत्रू माहिती मराठी (Ajatashatru information in marathi)

ajatashatru information in marathi – बौद्ध धर्माची पहिली परिषद कुठे भरली होती किंवा कुणी भरवली होती ? असा प्रश्न आला की आपल्याला नाव आठवत ते म्हणजे अजातशत्रूच. बिंबीसार याला मगध साम्राज्याचा संस्थापक होता, अजातशत्रू हा बिंबिसार राजाचा पुत्र (ajatshatru son of bimbisara) होता.

या लेखात आपण अजातशत्रू माहिती मराठी (Ajatashatru information in marathi) जाणून घेणार आहोत.

Table of Contents

अजातशत्रू माहिती मराठी (Ajatashatru information in marathi)

Ajatashatru information in marathi
नाव अजातशत्रू
जन्मइसवी सन पूर्व 509 ते इसवी सन पूर्व 461
वडील बिंबुसार
ओळखमगधवंशीय सम्राट
कार्यकालइसवी सन पूर्व 492 ते इसवी सन पूर्व 460

इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू,पांचाल, गांधार, अवंती, मगध अशी सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रुपांतर करण्याची सुरुवात बिंबिसारने केली. त्याने मगधला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली.

बिंबिसार हा हर्यक घराण्यातील हा पहिला प्रसिद्ध राजा होय. इ.स.पूर्व 543 मध्ये बिंबिसार मगधच्या गादीवर आला. त्यावेळेस त्याचे वय 15 वर्ष इतके होते. बिंबिसार एक हुशार, मुत्सद्दी, धोरणी आणि पराक्रमी म्हणून ओळखला जातो.

पुढे बिंबिसारने अवतीभोवतीची महाजनपदे वेगवेगळ्या मार्गांनी वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

अंग या महाजनपदावरती ब्रह्मदत्त या राजाची सत्ता होती. बिंबिसारने अंगवर आक्रमण करून जिंकून घेतला. पुढे बिंबिसारने अंग या प्रदेशाची चंपा ही बाजारपेठ आणि राजधानी मगधच्या साम्राज्यात विलीन केली.

तसेच अंग येथील राजधानीवर कुणालची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. कुणाल हा मौर्य सम्राट अशोक यांचा पुत्र होता.

कुणाल हा संस्कृत शब्द आहे, याचा मराठी अर्थ सुंदर डोळ्यांचा पक्षी असा आहे. कुणाल हे नाव माणसाचे असेल तर, त्याचा अर्थ असा आहे की असा माणूस ज्याला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसते.

मगधवंशीय सम्राट अजातशत्रु माहिती मराठी (Ajatashatru information in marathi)

अजातशत्रू या शब्दाचा मराठी अर्थ असा आहे की, ज्याला कुणीही शत्रू नाही असा व्यक्ती. अजातशत्रू हा भगवान महावीर आणि गौतम बुद्धांच्या समकालीन राजा होता. अजातशत्रूचे नाव पाली भाषेतील ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आढळते. बौद्ध साहित्यात आणि जैन साहित्यात कूणिक, कूणिय अशा नावांनीही अजातशत्रूचा उल्लेख आढळतो.

अजातशत्रूच्या काळातील सर्वात मोठी घटना म्हणजे इसवी सन पूर्व 483 बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. या निमित्ताने अजातशत्रूने बुद्धाची अस्थिकलश मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

बुद्धांच्या निर्वाणानंतर बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणींसाठी वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यासाठी भगवान बुद्धांची शिकवण, वक्तव्ये आणि उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी ही पहिली बौद्ध परिषद महाकश्यपने भरवली होती.

हा लेख जरूर वाचाbuddha jayanti park – बुद्ध जयंती पार्क (नवी दिल्ली)

पहिली बौद्ध परिषद इ.स.पू. 487 मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने राजगृह या ठिकाणी भरली होती. बौद्ध धम्म नियमांविषयी सभेत वादविवाद झाला. तसेच सुत्तपिटक आणि विनयपिटक ह्या दोन धम्मग्रंथाची निर्मिती झाली. अजातशत्रूने या बौद्ध परिषदेला हवी ती मदत पुरविली होती.

अजातशत्रूने मगधचा विस्तार उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये केला. त्याने पश्चिमेकडील कोसल आणि काशी आपल्या राज्याला जोडले. लिच्छवींचे विभाजन करून साम्राज्याचा विस्तार करणारे वासकर हे अजातशत्रूचे मंत्री होते. ते राजकारणात अत्यंत निपुण होते.

कोसलचा राजा प्रसेनजीतचा पराभव केल्यानंतर अजातशत्रूने राजकुमारी वजिराशी विवाह केला. अजातशत्रू आणि वजिरा यांना एक पुत्र झाला त्याचे नाव उदयभद्र (ajatshatru son name) असे होते. अजातशत्रू नंतर उदयभद्र हा मगध साम्राज्याचा राजा बनला. गंगा आणि सोन नदीवर असलेले कुसुमपुर (पाटलीपुत्र) ची स्थापना करून मगध साम्राज्याची राजधानी बनवली.

अजातशत्रू धर्म विषयक माहिती मराठी (Ajatashatru religion information in marathi)

हा लेख जरूर वाचाभारतातील प्रमुख धर्म मराठी माहिती (india’s major religion information in marathi)

जैन धर्माच्या पहिल्या परिशिष्टात आपल्याला भगवान महावीर आणि अजातशत्रू यांच्यातील संबंधांची माहिती मिळते. अजातशत्रूने भगवान महावीर यांना सर्वोच्च मान दिल्याचे वर्णन आहे. यात असेही म्हटले आहे की भगवान महावीर यांची दैनंदिन दिनचर्येची माहिती देणारा अजातशत्रूकडे एक अधिकारी होता.

अजातशत्रू हा बौद्ध अनुयायी होता, त्याने भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर राजगीरमध्ये प्रथम बुद्ध धम्म संगीत आयोजित केले.

हा लेख जरूर वाचागौतम बुद्ध कथा मराठी (gautam buddha story in marathi)

अजातशत्रूचा मृत्यू माहिती मराठी (ajatashatru death information in marathi)

इतिहासकाराच्या मते, अजातशत्रूने त्याचा वडिलांची म्हणजे बिंबीसार याची हत्या केली. त्यानंतर अजातशत्रू हा मगधचा राजा झाला. त्यानंतर अजातशत्रूचा पुत्र उदयभद्र याने देखील त्याच्या वडिलांचा म्हणजे अजातशत्रूची हत्या केली. यामुळे इतिहासात यांना पितृहंता वंश म्हणून ओळखले जाते.

इतिहासकारांनी नोंदवलेल्या अजातशत्रूच्या मृत्यूची नोंद इसवी सन पूर्व 535 पूर्वीची आहे. त्याच्या मृत्यूचे विवरण जैन आणि बौद्ध परंपरांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्न आहे. त्यानुसार अजातशत्रूचा मृत्यू इसवी सन पूर्व 461 मध्ये झाला.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण अजातशत्रू माहिती मराठी (ajatshatru information in marathi) जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

हर्यक घराण्याचा संस्थापक राजा कोण होता ?

हर्यक घराण्याचा संस्थापक राजा बिंबिसार हा होता.

अजातशत्रूने बौद्ध धर्माची परिषद कोठे भरली ?

अजातशत्रूने बौद्ध धर्माची परिषद मगध येथील राजगृह येथे भरली.

अजातशत्रू म्हणजे काय ?

अजातशत्रू म्हणजे ज्याला कुणी शत्रू नाही असा.

Leave a Comment