Akkalkot information in marathi – अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सर्वांना ठाऊक आहेतच. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थांनी समाजातील वाईट प्रवृत्ती संपवून त्याऐवजी चांगले विचार समाजात पेरण्याचे महान कार्य केले. समाजात दुःखी माणसांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम स्वामी करत. स्वामींच्या भक्तांना ते नेहमी जपायचे त्याचप्रकारे स्वामी श्रीमंत आणि गरीब यांना सारखेच मानायचे.
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
– स्वामी समर्थ महाराज
मानव आणि इतर जीवांवर स्वामींचे अपार प्रेम होते. याच कारणाने त्यांनी कुणाचा भेदभाव केला नाही.
या लेखातून आपण अक्कलकोट विषयी माहिती (akkalkot information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मंदिर इतिहास (swami samarth history in marathi) जाणून घेणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी (kolhapur famous for in marathi)
Table of Contents
- अक्कलकोट विषयी माहिती (akkalkot information in marathi)
- नृसिंह सरस्वती महाराज माहिती मराठी (Shri narasimha Saraswati in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
अक्कलकोट विषयी माहिती (akkalkot information in marathi)

नाव | अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज |
ठिकाण | अक्ककोट, सोलापूर महाराष्ट्र राज्य |
प्रसिध्द देवस्थान | स्वामी समर्थ मंदिर |
संप्रदाय | दत्त संप्रदाय |
प्रसिद्ध वचन | ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” |
कार्य | महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात दत्त संप्रदायाचा प्रसार |
स्थानिक भाषा | मराठी |
वेबसाईट – Akkalkot Swami Samarth official website | swamiannacchatra.org |
जवळील पर्यटन स्थळे | नळदुर्ग धरण नळदुर्ग किल्ला सोलापूर विज्ञान केंद्र अक्कलकोट पॅलेस सोलापूर भुईकोट किल्ला |
1. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जातात. स्वामींच्या मंदिराजवळ एक वटवृक्ष आहे, त्यामुळे या मंदिराला वटवृक्ष स्वामी मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
2. अक्कलकोटचे संस्थान हे दत्त संप्रदायातील मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते.
3. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे निवासस्थान होते, स्वामींना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते.
4. भगवान दत्तात्रेय हिंदू धर्मात एक समकालीन देवता आहे.
5. स्वामी समर्थांचे अक्कलकोटचे मंदिराच्या इतिहास फारसा माहित नाही. श्री स्वामी समर्थ या ठिकाणी केव्हापासून आहेत याचा पक्का दुवा नाही. पौराणिक कथा आधारस्तंभ म्हणून पाहिले असता, श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला 1857 या साली आले.
6. स्वामींनी या ठिकाणी बरेच चमत्कार केले.
7. पौराणिक कथेनुसार महाराजांनी 878 साली समाधि घेतली त्यानंतर त्यांचे अनुयायांनी स्वामींचे मंदिर बांधले.
8. मंदिरा सोबतच दोन मजली नगारखाना देखील बांधण्यात आला होता.
9. इसवी सन 1920 मध्ये मंदिराची पाहणी करून जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर पाच वर्षाने मंदिरासमोर सभागृह बांधण्यात आले.
10. मंदिराच्या आतील काही बांधकाम इसवी सन 1943 मध्ये सुरू केले हे बांधकाम जवळपास तीन वर्षे चालू होते.

11. वास्तुशास्त्रानुसार अक्कलकोटचे मंदिर आधुनिक मंदिर आहे.
12. अक्कलकोट शिवाय इतर बर्याच ठिकाणी स्वामी समर्थांचे मंदिर पहायला भेटते.
13. अक्कलकोटला वर्षभर उष्ण हवामान असते. किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके असते.
14. एप्रिल आणि महिन्यात सर्वत्र तीव्र उन्हाळा जाणवतो. अशा वेळेस पुणे मुंबई या ठिकाणी 41 अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमान असते.
15. या ठिकाणी अत्यंत तीव्र स्वरूपाचा हिवाळा पाहायला मिळतो रात्री तापमान 10 अंश सेल्सिअस इथपर्यंत पोहचते. अश्या प्रकारे येथील दिवसाचे सरासरी तापमान 26 अंश सेल्सिअस असते.
16. अश्या प्रकारे येथील दिवसाचे सरासरी तापमान 26 अंश सेल्सिअस असते.
17. महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळांपैकी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज मंदिर हे एक प्रमुख स्थळ आहे.
18. दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा यादिवशी अक्कलकोटला हजारो भाविक एकत्र जमतात.
19. शेंगदाण्यापासून बनवलेली शेंगा चटणी आणि खारट बकरीच्या मांसाची करी हे पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत..
20. येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांना राहण्याची सुविधा केली आहे.
21. अक्ककोटचे मंदिर सकाळी पाच वाजेपासुन भाविकांसाठी खुले असते आणि रात्री दहा वाजता बंद होते.
हा लेख जरूर वाचा – वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी (vajreshwari temple information in marathi)
22. हे मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुले असते.
23. स्वामींच्या मंदिरात आल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी मान्यता आहे.
24. अक्कलकोट पर्यटन स्थळ महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य यांच्या सीमेच्या अगदी जवळ आहे.
25. एकोणिसाव्या शतकात स्वामी समर्थ या ठिकाणी राहत होते, अशी मान्यता आहे.
26. भारतात ब्रिटीश राजवट असताना अक्कलकोट हे भोसले घराण्याचे राज्य होते.
27. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाते.
नृसिंह सरस्वती महाराज माहिती मराठी (Shri narasimha Saraswati in marathi)

नाव | नृसिंह सरस्वती |
जन्मस्थळ | कारंजा |
जन्म | इसवी सन 1378 |
मृत्यू | इसवी सन 1459 |
संप्रदाय | गाणगापूर |
28. नृसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात.
29. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका आहेत, या ठिकाणी त्यांचे लाखो भाविक जातात.
30. अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म झाला.
हा लेख जरूर वाचा – नरसोबाची वाडी माहिती मराठी (narsobachi wadi information in marathi)
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण अक्कलकोट विषयी माहिती (akkalkot information in marathi) जाणून घेतली. अक्कलकोट विषयी माहिती (akkalkot history in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही अक्कलकोट माहिती मराठी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
श्री. नृसिंह सरस्वती जन्म स्थान कोणते आहे ?
श्री. नृसिंह सरस्वती यांचे जन्म स्थान कारंजा आहे.
पुण्यापासून अक्कलकोट किती किलोमीटर आहे ?
पुण्यापासून अक्कलकोट 290 किलोमीटर आहे.
अक्कलकोटच्या जवळील रेल्वे स्टेशन कोणते आहे ?
अक्कलकोट रोड हे अक्कलकोटच्या जवळील रेल्वे स्टेशन आहे.
गाणगापूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे.
अक्कलकोट ते गाणगापुर किती किलोमीटर आहे ?
अक्कलकोट ते गाणगापुर 71 किलोमीटर आहे.
अक्कलकोट ते तुळजापूर किती किलोमीटर आहे ?
अक्कलकोट ते तुळजापूर 80 किलोमीटर आहे.