आंबोली घाट माहिती – amboli waterfall information in marathi

Amboli waterfall information in marathi – आंबोली घाट हा बेळगाव आणि गोव्याचा रस्ता जोडतो.कोकणातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणजे अंबोली. निसर्ग पर्यटन म्हणजे काय हे आंबोली घाटात गेल्यावर समजते. याच्या टेकड्या जणू आभाळशी स्पर्धाकरताहेत अस वाटत त्याचरोबर कायम हिरव्यागार असणाऱ्या या दऱ्या पावसाळयात खूप खुलून दिसतात.

कोकणातील सागरी पर्यटन करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.आजच्या लेखात आपण आंबोली घाट माहिती – amboli waterfall information in marathi जाणून घेणार आहोत

आंबोली घाट माहिती – amboli waterfall information in marathi

amboli waterfall information in marathi
amboli waterfall information in marathi
राज्यमहाराष्ट्र
जिल्हासिंधुदुर्ग
तालुकासावंतवाडी
जवळचे शहरसावंतवाडी
अधिकृत भाषामराठी
लोकसंख्या4,004
(2011 जनगणनानुसार)
क्षेत्रफळ5,619 हेक्टर
घाटाची लांबी30 किलोमीटर
कोठे आहेसिंधुदुर्ग ( Amboli Ghat sawantwadi )
प्रेक्षणीय स्थळेनांगरतास धबधबा ( Amboli waterfall )
हिनरण्यकेशी नदी
महादेव मंदिर
सनसेट पॉइंट
कावळेशेत पॉईंट
घनदाट जंगल
आंबोली थंड हवेचे ठिकाण

1. आंबोली गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून 690 मीटर आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे.

2. इतिहासानुसार महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रह करताना काही काळ या ठिकाणी वास्तव्य करुन शिरोडा येथील आंबोली घाटातून मार्गस्त झाले होते.

3. महादेव गडाचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. लेप्टनंट कर्नल मॉर्गन यांनी हा गड 1830 मध्ये घेतला होता. कुडाळ, फोंडा, सावंतवाडी या कोकणातील महत्वाच्या ठिकाणावर महादेव गडावरुन लक्ष देणे सोपे वाटत होतं.

4. आंबोली सह्याद्रीच्या कुशीत वसलेला घाट रस्ता आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा मार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला यांच्या मध्यस्ती आंबोली घाट आहे.

5. या घाटात प्रवास करताना बरीच नागमोडी वळणे पाहायला मिळतात.

6. पावसाळ्यात या घाटावर पर्यटकांचा ओघ सुरु असतो. याठिकाणी दाट जंगले, दर्‍या खोर्‍यांचा नयनरम्य देखावा, अमर्याद निसर्गसौंदर्य पाहता येते आणि घनदाट जंगलातून भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.

7. आंबोली घाटाच्या जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे असे वन्य प्राणी पाहायला मिळतात.

8. याबरोबरच अनेक प्रकारच्या वनौषधी या ठिकाणी आहेत.

9. आंबोली जवळ चौकुळ परिसरात 35 ते 40 लहान-मोठ्या गुहा आहेत. त्यापैकी काही गुहा अतिशय भव्य आहेत.

10. जंगल पर्यटन करण्यासाठी आंबोली घाट अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी जैविक विविधता या ठिकाणी आढळून येते.

आंबोली थंड हवेचे ठिकाण

amboli waterfall information in marathi
amboli waterfall information in marathi

11. आंबोली एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.

12. या ठिकाणी भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात. पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.

13. या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान सरासरी 350 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो त्यामुळे येथील वातावरण थंड असते.

14. आंबोलीच्या पारपोलीचा धबधबा हा सर्वात मोठा धबधबा आहे.

15. महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगेत सर्वाधिक जास्त धबधबे, घाटवळणाचे रस्ते आंबोली घाटात आहे. यामुळे आंबोली घाट हा पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ बनलेले आहे.

16. आंबोली ही सावंतवाडी संस्थानची उन्हाळी राजधानी होती.

17. घाटापासून 4 किलोमीटरवर पार्वती देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी पर्यटक देवी पार्वतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात त्याचबरोबर येथील सुंदर परिसर पाहतात.

18. आंबोली येथे उगम पावणारी हिरण्यकेशी ही एकमेव नदी पूर्वेकडे वाहत जाते.

19. हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाबद्दल स्थानिक अख्यायिका आहे. महादेवाने पार्वतीसाठी हिरण्यकेशी नदी तयार केली.

20. पार्वतीच्या मंदिरासमोर एक लहान तलाव आहे.

21. जवळच एक गुहा आहे. ही गुहा दोन ते तीन किलोमीटर लांब आहे.या गुहेत 7 तलाव आहेत. हिरण्यकेशी नदीच्या सोबत नांगरतास नावाचा धबधबा पाहायला मिळतो.

22. कावळेशेत पॉईंट हा अंबोलीतील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते.

23. जेव्हा तुम्ही कावळेशेत पॉईंटवर जाता तेव्हा तुम्हाला एक अत्यंत खोल दरी पहायला मिळते.या दरीमध्ये फेकलेली वस्तू उलट दिशेने येणार्‍या हवेच्या दबावामुळे पुन्हा बाहेर फेकली जाते. हे पाहण्यासाठी येथे पर्यटक दरीत पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रुमाल, टोप्या अशा वस्तू टाकतात आणि त्या वस्तू परत येताना पकडण्याचा प्रयत्न करतात.

24. आंबोलीत पावसाळयात भरपूर पाऊस पडतो. हिवाळा सुरू झाला की दिवसभर हवामान थंड असते. उन्हाळ्यामध्ये वातावरण गरम असते.

25. आंबोली घाटाजवळ चौकुलीचे जंगल आहे. या जंगलात आपण वन्यजीव पाहायला मिळतात. जसे की, हरिण, ससे, गायी आणि जंगली मांजरे इत्यादी.

26. आंबोलीत महादेव गड, कवळे साद, आणि सनसेट पॉईंट इ. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.

27. आंबोलीमध्ये प्रामुख्याने भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

आंबोली घाट – कसे पोहचाल ?

amboli waterfall information in marathi
amboli waterfall information in marathi

कोल्हापूर आणि सावंतवाडी या रेल्वेमार्गाने आंबोली घाट वर जाण्यास पडते.

पुण्यापासून आंबोली घाट 345 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून आंबोली घाट पर्यंत जाण्यास 7 तास लागतात. मुंबईपासून आंबोली घाट 490 किलोमीटर अंतरावर आहे त्यासाठी तिथून आंबोली घाटात येण्यासाठी 9 तास लागतात. कर्नाटक पासून 244 किलोमीटर लांब आहे तेथून जाण्यासाठी 5 तास लागतात.

सारांश

आंबोली घाट इन्फॉर्मशन इन मराठी – सावंतवाडी , मुंबई ,पुणे व कोल्हापूर येथून महामार्गाने जोडलेले आहेत. आंबोली हे पावसाळ्यातील खास प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील धबधबे व जैवविविधता खूपच रमणीय आहे. लगतचा जिल्हा कोल्हापूर तसेच बेळगाव येथून पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने येतात.

हे देखील वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

राऊतवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोल्हापूर जिल्ह्यात राऊतवाडी धबधबा आहे.

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे .

ताम्हिणी घाट कुठे आहे ?

कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे.