भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती – Anandibai Joshi Information in Marathi

Anandibai Joshi Information in Marathi – मित्रांनो! भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ? हा प्रश्न आपल्या सर्वांना नक्कीच पडतो. आजच्या लेखामध्ये आम्ही “Anandibai Joshi Information in Marathi – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती” घेऊन आलो आहोत. आम्हाला अशा आहे की, हा लेख वाचून आपणास नक्कीच आवडेल.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती – Anandibai Joshi Information in Marathi

नावआनंदीबाई गोपाळराव जोशी
जन्म31 मार्च 1865
शिक्षणएम.डी. (डॉक्टर ऑफ़ मेडिसिन)
प्रशिक्षण संस्थाविमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया
ख्यातीभारतातील पहिल्या महिला डॉक्टर
मृत्यू26 फेब्रुवारी 1887

भारताच्या पहिल्या महिला स्त्री डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या आनंदीबाई जोशी त्यांचे व्यक्तिमत्व भारतातील प्रत्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आनंदीबाई जोशी यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले. डॉक्टर या पदापर्यंत चा प्रवास पूर्ण केला. खडतर प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आनंदीबाई जोशी होय. ज्या काळामध्ये शिक्षणाला जराही महत्व नव्हते अशा काळामध्ये आनंदीबाई जोशी यांनी डॉक्टर पर्यंत प्रवास केला. ज्या काळामध्ये केवळ महिलांना चार भिंतीच्या आत मध्ये कैद केले जात होते. अशा काळामध्ये आनंदीबाई जोशी यांनी ती किती संघर्ष केला असेल याचा अंदाजा आपल्याला येऊ शकतो.

आनंदीबाई जोशी यांनी आपल्याला स्वप्न पूर्ण करत विदेशवारी देखील केली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर भोजन त्यांनी भारताचा तर गौरव केलाच त्यासोबत स्वतःला देखील उंचावले. डॉक्टर होताना त्यांना कोण कोणत्या संघर्षातून आणि परिस्थिती मधून जावे लागले याची माहिती आपण आज जाणून घेऊयात.

आनंदीबाई जोशी यांचा जन्म (anandibai joshi birth information in marathi)

anandibai joshi birth information in marathi – भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणारा आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण मधील एका मराठी कुटुंबामध्ये झाला. आनंदीबाई जोशी यांचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला त्या कुटुंबामध्ये केवळ संस्कृत भाषा बोलली आणि वाचली जात असे. त्यामुळे आनंदीबाई जोशी यांना लहानपणीच संस्कृत भाषेचे ज्ञान मिळाले.

आनंदीबाई जोशी यांचे सुरुवातीचे जीवन (anandibai gopalrao joshi information in marathi)

आनंदीबाई जोशी या कल्याण परिसरामध्ये रहाणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी या मराठी माणसाच्या जेष्ठ कन्या होत्या. आनंदीबाई जोशी अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांचा विवाह व त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. आनंदीबाई जोशी यांचे सुरुवातीचे नाव यमुना असे होते, लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांचे नाव यमुना हे बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव हे कल्याणमधील एका पोस्ट ऑफिस मध्ये कारकूनचे काम करत होते.

आनंदीबाई हा 14 वर्षाच्या असताना त्यांनी मुलाला जन्म दिला, परंतु त्यांच्या मुलाची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने त्यांचे पहिले म्हणून केवळ दहा दिवसच जगू शकले. हाच प्रसंग आनंदीबाई यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर त्यांनी डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली यासाठी त्यांच्या पतीने त्यांना मशिनरी शाळेमध्ये प्रवेश घेऊन दिला.

त्यानंतर गोपाळ राव यांची बदली कोलकाता येथे करण्यात आली. गोपाळराव येथे तत्कालीन काळातील एक थोर विचारवंत होते कारण त्यांनी त्या काळामध्ये देखील आपल्या पत्नीला शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. कलकत्ता येथे गेले आणि आनंदीबाई जोशी याने इंग्रजी आणि हिंदी विषयाचे ज्ञान प्राप्त केले.

आनंदीबाई जोशी यांना शिक्षणामध्ये त्यातल्या त्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये रस असल्याचे गोपाळराव जोशी यांनी ओळखले व त्यांनी आनंदीबाई जोशी यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आग्रह केला. गोपाळराव जोशी नेहमी लोकहितवादी पत्र वाचत. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या पत्नी आनंदी बाई जोशी यांना इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रुढी परंपरेला दिलेला लढा (anandibai joshi turning point in marathi)

आनंदीबाई जोशी यांनी ज्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षण देण्याचा निश्चय केला होता त्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेण्यायासाठी परवानगी दिली जात नव्हती. त्यावेळी आनंदीबाई जोशी यांना समाजातील अनेक लोकांनी त्यांना विरोध केला. परंतु त्यांनी सर्वांना न डगमगता सामोरे गेल्या.

त्यानंतर आनंदीबाई जोशी यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याबाबत गोपाळराव जोशी यांनी अमेरिकेमध्ये काही पत्रव्यवहार केला. परंतु वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्या काळामध्ये केवळ ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती. परंतु धर्मांतर करणे हे आनंदीबाई जोशी यांना मान्य नव्हते.

आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांनी प्रयत्न न सोडता वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळावा यासाठी खडतर प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले व ख्रिस्ती धर्म न स्वीकारता आनंदीबाई जोशी यांना 1883 मध्ये म्हणजेच त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी ” विमेंस मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया” मध्ये प्रवेश मिळाला.

त्यानंतर आनंदीबाई जोशी या शिक्षण घेण्याकरिता अमेरिकेमध्ये गेला परंतु तेथील वातावरणामुळे आनंदीबाई जोशी यांची प्रकृती असलेले परंतु अमेरिकेमध्ये त्यांना एका कार्पेंटर जोडप्याचे खूप सहाय्य लाभले.

आनंदीबाई जोशी यांचा अमेरिकेतील संघर्ष

आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेतील “वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया” येथे प्रवेश मिळाला. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 11 मार्च 1886 आनंदीबाई जोशी यांनी आपले शिक्षण पूर्ण करून एमडी म्हणजेच डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी प्राप्त केली. पुढे होऊन देखील त्यांच्या मागील समस्या ने त्यांचा पिच्छा सोडला नाही.

अमेरिकेमध्ये राहून शिक्षण पूर्ण करीत असताना आनंदीबाई जोशी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हाडे गोठवणार्‍या थंडी मध्ये योग्य खाणेपिणे न मिळाल्याने त्यांची प्रकृती खूप खराब झाली. सतत प्रकृतीमध्ये आलेल्या अस्वस्थ पणामुळे आनंदीबाई जोशी या ” ट्यूबर्क्युलोसिस” या रोगाच्या बळी पडल्या. आरोग्याची सात नसतानादेखील त्यांनी खडतर प्रयत्न केले व डॉक्टरची पदवी मिळवून त्या भारतात परत आल्यावर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला.

भारतामध्ये परत आल्यानंतर त्या कोल्हापूर मधील अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. भारतातील महिलांना आणि लहान मुलांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या.

आनंदीबाई जोशी यांचे निधन (anandibai joshi death reason)

अल्बर्ट एडवर्ड रुग्णालय, कोल्हापूर या ठिकाणी महिला डॉक्टर म्हणून काम करत असताना आनंदीबाई जोशी यांना क्षयरोगाची लागण झाली. आणि यामध्ये 26 फेब्रुवारी 1887 मध्ये म्हणजेच आनंदीबाई जोशी यांच्या वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

यांच्या स्मरणार्थ इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन इंन सोशल सायन्स आणि लखनऊ येथील एका गैरसरकारी संस्थेने वैद्यकीय क्षेत्रामध्ये आनंदीबाई जोशी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणात 26 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी ” महिला आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो.

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती – Anandibai Joshi Information in Marathi जाणून घेतली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण आनंदीबाई जोशी मराठी माहिती (Anandibai Joshi Information in Marathi) जाणून घेतली. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी माहिती (Bhartatil pahilya mahila doctor) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू कोणत्या दुर्धर आजाराने झाला ?

क्षयरोग या आजाराने डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू झाला.

भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे ?

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत.

आनंदीबाई जोशी यांचे चरित्र कोणी लिहिले ?

आनंदीबाई जोशी यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.