Asian countries and their capitals marathi – पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत, हे आपण मागील लेखात पाहिले आहे. या सात खंडात क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने आशिया हा सर्वात मोठा खंड म्हणून ओळखला जातो.
जगातील 60% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे. जगातील सर्वात मोठा देश रशिया व सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत आणि चीन देश आशिया खंडात आहेत.
या लेखातून आपण आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधानी (Asian countries and their capitals marathi) माहिती मराठी जाणून घेणार आहोत.
आशिया खंड मराठी माहिती (asia information in marathi)

नाव | आशिया |
प्रकार | खंड |
क्षेत्रफळ | 44.58 million km² |
एकूण देश | 51 |
प्रमुख भाषा | 2300+ |
सर्वात मोठा देश (क्षेत्रफळानुसार) | रशिया |
सर्वात लहान देश (क्षेत्रफळानुसार) | मालदीव |
क्षेत्रफळाने व लोकसंख्येने जगातील पहिल्या क्रमांकाचे खंड आशिया याचे नाव ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या बाजूचा प्रदेश म्हणून आसू हे नाव दिले, यावरूनच पडले आहे.
आशिया खंडाची जडणघडण अतिशय जटिल स्वरूपाची मानली जाते. आशिया व आफ्रिका खंड पूर्वी एकमेकांना जोडलेली होती.
आशिया खंडातील देश महासागरापासून 3.2 किमी. पेक्षा जास्त दूर असल्याने किनारीप्रदेश व खंडातील प्रदेशाच्या हवामानात मोठा फरक दिसतो.
जास्त तापमान असणारे, कमी तापमान किंवा बर्फाचा प्रदेश असे हवामानाचे बहुतेक सर्व प्रकार आशिया खंडात आढळतात. आशियामधील सर्वात जास्त तापमानाचे स्थान जाकोबाबाद तर सर्वात कमी तापमानाचे ठिकाण व्हर्कोयानस्क आहे.
आशिया खंडामध्येचे जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट, पृथ्वीवरील सर्वात कमी उंचीचा भुभाग मृत समुद्र, पृथ्वीवरील सर्वात उंच भूभाग सागरमाथा आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म बौद्ध, ज्याची स्थापना करणारे गौतम बुद्ध आशिया खंडातील भारत देशातले आहेत. जगातील सर्वात जुना मानला जाणारा धर्म हिंदू हा आशिया खंडातील भारतात आहे.
अश्या विविध प्राचीन धर्माचा व संस्कृतींचा उगम आशिया खंडात झाला आहे.
आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधानी माहिती मराठी (Asian countries and their capitals marathi)

आशिया खंडात एकूण 48 देश आहेत. यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश रशिया असून त्याचे क्षेत्रफळ 17.1 million km² आहे. मालदीव हा आशिया खंडातील क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा देश आहे, ज्याचे क्षेत्रफळ 297.8 km² इतके आहे.
1. अफगाणिस्तान – हा देश आशिया खंडाच्या मध्यभागी आहे. अफगाणिस्तान देशाची राजधानी काबुल आहे. येथील स्थानिक भाषा दारी आणि पश्तू ही आहे. एकेकाळी हा देश आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न व प्रगत होता. पण आता हा देश जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे.
2. आर्मेनिया – पूर्वी सोव्हिएत संघापैकी आर्मेनिया आता बहुपक्षीय लोकशाहीवादी प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. येरेवान ही आर्मेनिया देशाची राजधानी आहे. या ठिकाणी आर्मेनियन ही प्रमुख भाषा आहे. येथील साक्षरता दर हा 99 टक्के इतका आहे.
3. अझरबैजान – हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश असून याची राजधानी व सर्वात मोठे शहर बाकू हे आहे. हा मुस्लिम देश असून येथील बहुसंख्य जनता तुर्की व सुन्नी इस्लाम वंशाची आहे. अझरबैजानी ही या देशाची अधिकृत भाषा आहे.
4. बहारीन – हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश असून मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे. अरबी ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते.
5. बांगलादेश – भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. इसवी सन 1947 रोजी अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो.
बांगलादेशाची सर्वात मोठे शहर व राजधानी ढाका ही आहे. ब्रम्हपुत्रा, पद्मा व मेघना ह्या येथील प्रमुख नद्या आहेत. बांगलादेश हा जगातील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे.
6. भूतान – हा भारताच्या उत्तर सीमेवरील भूपरिवेष्ठित असणारा आशियातील देश आहे. या देशाच्या तीन दिशांना भारत तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
7. ब्रुनेई दारुस्सलाम – हा आग्नेय आशियातील बोर्निओ बेटाच्या उत्तर किनाऱ्यावरील देश आहे. बंदर सेरी बेगवान हे या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
8. कंबोडिया – हा आग्नेय आशियातील देश आहे. नॉम पेन्ह ही कंबोडियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
9. चीन – जगाच्या मध्यभागी वसलेला देश म्हणजे चीन. जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश असून येथील 91% लोकसंख्या बुद्ध धर्मीय आहे. चीनचे सर्वात मोठे शहर शांघाय तर राजधानी बीजिंग ही आहे.
10. पूर्व तिमोर – पूर्व तिमोर हे तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसले आहे. याची राजधानी व सर्वात मोठे शहर दिली हे आहे.
11. जॉर्जिया – हा पश्चिम आशियातील देश व पूर्व युरोपमधील एक देश आहे. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अमेरिकेतील एका राज्याचे नाव देखील जॉर्जिया आहे.

12. भारत – भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील सातवा सर्वांत मोठा देश तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली ही आहे.
13. इंडोनेशिया हा देश आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. याची राजधानी नुसंतारा आणि सर्वात मोठे शहर जकार्ता हे आहे.
14. इराण – इराणचे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. इराणची राजधानी व सर्वात मोठे शहर तेहरान हे आहे.
15. इराक – हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इराकचे अधिकृत चलन दिनार असून या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य आहे. खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक लागतो.
16. इस्रायल – पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे. जेरुसलेम या ठिकाणी जगातील सर्वात मोठा धर्म असणाऱ्या ख्रिस्ती धर्माचा देव येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे.
17. जपान – हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानी या शब्दाचा मराठीत अर्थ उगवता सूर्या असा होतो. जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून देखील ओळखले जाते. टोकियो हे शहर जपान मधील सर्वात मोठे शहर व राजधानी आहे.
18. जॉर्डन – हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे. या भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत.
19. कझाकस्तान – हा मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. याची राजधानी नुरसुल्तान व अल्माटी हे सर्वात मोठे शहर आहे.
20. लाओस – हा आग्नेय आशियातील देश आहे. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधानी माहिती मराठी (asia countries and capitals list in marathi)
21. कुवेत – कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक देश आहे. कुवेती दिनार हे इतर देशांच्या चलनांपेक्षा जास्त किमतीचे चलन आहे.
22. किर्गिझस्तान – हा मध्य आशियातील एक देश आहे. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
23. लेबेनॉन हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
24. मलेशिया हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. येथे इस्लामला देशाचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळालेली आहे. पण सहिष्णुता धोरणानुसार येथे बौद्ध विहार, चर्च, हिंदू मंदिर असण्याबाबतची परवानगी आहे.
25. मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. माले ही मालदीवची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत मालदीव आशियातील सर्वात छोटा आहे.
26. मंगोलिया हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे.
27. म्यानमार – आग्नेय आशियातील एक देश असून हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. यांगोन हे सर्वात मोठे शहर तर नेपिडो ही म्यानमार आहे.

28. नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नसून तो त्रिकोणी आहे. काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे.
29. उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे. देशातील सर्वात मोठे शहर व राजधानी प्यॉंगयांग ही आहे.
30. ओमानची सुलतानी हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
31. पाकिस्तान भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे.
32. पॅलेस्टाईन हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. या प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत.
33. कतार हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
34. रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे.
ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
35. सौदी अरेबिया – हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो.
36. सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे. याची राजधानी सिंगापूर आहे. सिंगापूरची अर्थव्यवस्था हि व्यापार आधारित अत्यंत विकसित भांडवली अर्थव्यवस्था आहे.
37. दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील देश आहे. सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे. प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत.
38. श्रीलंका हा हिंद महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्री जयवर्धनपुर कोट्टे राजधानी तर कोलंबो हे सर्वात मोठे शहर आहे. प्राचीन काळापासून हा देश सिंहल या नावाने ओळखला जायचे. भारतीय साहित्यात या देशाला लंका म्हणायचे. ब्रिटीश राजवटीमध्ये याला सिलोन असे नाव पडले.
39. सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरबी ही सीरिया देशाची अधिकृत भाषा आहे.
आशिया खंडातील देशांची नावे व राजधान्या (asian countries and their capitals list in marathi)
40. तैवान किंवा चीनचे प्रजासत्ताक हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. तैवान देशाची राजधानी ताइपेइ ही आहे. मॅंडेरिन ही देशाची अधिकृत भाषा आहे.
41. ताजिकिस्तान हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. देशातील सर्वात मोठे शहर आणि राजधानी दुशान्बे ही आहे. ताजिक ही येथील मुख्य भाषा आहे.
42. थायलंडचे म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.
43. फिलिपाईन्स हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर मनिला आहे. हा देश नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असून जगातील सर्वात जैवविविध क्षेत्रांपैकी एक आहे.
44. तुर्कस्तान हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.
45. तुर्कमेनिस्तान मध्य आशियातील एक देश आहे. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या देशाची अधिकृत भाषा तुर्कमेन ही आहे.
46. संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. अबु धाबी ही राजधानी तर दुबई हे संयुक्त अरब अमिराती मधील सर्वात मोठे शहर आहे.
47. उझबेकिस्तान हा मध्य आशियातील एक देश आहे. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. 1 सप्टेंबर हा दिवस उझबेकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.
48. व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. हा देश जगात 13 वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हिएतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची 85% लोकसंख्या ही बौद्ध आहे.
49. येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर साना हे आहे. देशाची अधिकृत भाषा अरबी आहे.
50. मकाओ हा चीन देशाच्या दोन विशेष शासकीय प्रदेशांपैकी एक आहे. मकाओ हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. येथील अधिकृत भाषा मॅंडरिन आणि पोर्तुगीज ही आहे.

51. हाँग काँग हा चीन देशातील एक स्वायत्त प्रदेश आहे. हाँगकाँग अधिकृतपणे हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्र पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (HKSAR), आणि एक विशेष शहर आहे. हाँगकाँग हे जगातील सर्वात विकसित शहरांपैकी एक आहे.
सारांश
या लेखातून आपण आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधानी (Asian countries and their capitals marathi) जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?
क्षेत्रफळानुसार आशिया खंडातील सर्वात मोठा देश रशिया असून लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा सर्वात मोठा देश आहे.
आशिया खंडातील सर्वात लहान देश कोणता आहे ?
क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव हा आहे.
आशिया खंडातील एकूण देश किती आहेत ?
आशिया खंडातील एकूण देश 51 आहेत. यातील 47 स्वतंत्र देश आणि उर्वरित 4 संस्थाने व प्रांत आहेत.
आशिया खंडातील लोकसंख्या किती आहे ?
इसवी सन 2018 साली 456.07 कोटी इतकी आशिया खंडातील लोकसंख्या आहे.
आशिया खंडाचे क्षेत्रफळ किती आहे ?
44.58 million km² इतके आशिया खंडाचे क्षेत्रफळ आहे.
आशिया खंडाची भूमी किती टक्के आहे ?
पृथ्वीवरील एकूण जमिनीपैकी आशिया खंडाची भूमी 30 टक्के आहे.
पुढील वाचन :