कलामहर्षी बाबूराव पेंटर मराठी माहिती

Categorized as Blog

Baburao painter information in marathi – बाबूराव पेंटर चित्रकार यांना एक उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर भारतीय चित्रपट सृष्टीत यांनी मोलाची कामगिरी बजावली. बाबुराव यांचे संपूर्ण नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री हे आहे.

चित्रकला, चित्रपटनिर्मिती, चित्रपटदिग्दर्शन, रेखाटन, शिल्पकला, प्रकाशचित्रण या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला.

भारतीय चित्रपटातील एक उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून यांना ओळखले जाते. शिल्पकलेच्या कामासाठी यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला होता. शिल्पकलेबरोबरच त्यांनी चित्रकला अवगत होती.

महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी शिल्पे कोल्हापूरमध्ये तयार केली आहे. या लेखात आज आपण बाबूराव पेंटर मराठी माहिती (Baburao Painter Information In Marathi) जाणून घेणार आहोत.

बाबूराव पेंटर मराठी माहिती (Baburao Painter Information In Marathi)

नावबाबुराव कृष्णराव मेस्त्री
जन्म3 जून 1890
कोल्हापूर
वडिलांचे नावकृष्णराव मेस्त्री
कार्यचित्रकला
चित्रपटनिर्मिती
चित्रपटदिग्दर्शन
रेखाटन
शिल्पकला
प्रकाशचित्रण
मृत्यू16 जानेवारी 1954
पुरस्कारकलामहर्षी बाबूराव पेंटर

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा जन्म 3 जून 1890 या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. यांचे वडील कृष्णराव मेस्त्री हे एक सुतार आणि लोहारकाम करत असायचे. वडिलांना कामात मदत करताना बाबुरावांनी शिल्पकला आणि चित्रकला शिकून घेतली.

यानंतर त्यांनी चित्रकला, शिल्पकला आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात असामान्य कौशल्य आत्मसात केले. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी शिल्पे कोल्हापूरमध्ये बनवली आहेत, ही शिल्पे कोल्हापुरात आजही पाहायला मिळतात.

आनंदराव हे बाबूराव मिस्त्री चे आतेभाऊ होते. यांना देखील कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जाते.

बाबूराव पेंटर यांचा चित्रपट माहिती मराठी

बाबुराव पेंटर यांनी जिद्द आणि अथक परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर आणि स्वदेशी कॅमेरा तयार केला. यासोबतच छपाई यंत्र आणि डेव्हलपिंग स्पिडोमीटरही बनवला. यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 1918 या दिवशी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

यानंतर त्यांनी स्त्रीपात्रे असणारा सैरंध्री हा पहिलाच चित्रपट निर्माण केला आणि हा चित्रपट 7 फेब्रुवारी 1920 या दिवशी आर्यन थिएटर पुणे या ठिकाणी प्रदर्शित केला. या चित्रपटात भीम आणि कीचक यांचे द्वंद्वयुद्धाचे दृश्य दाखवण्यात आले होते. हे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले. यामुळे ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, ही पद्धत आजही सुरू आहे.

या चित्रपटानंतर इसवी सन 1925 साली सामाजिक मूकपट वर आधारित सावकारी पाश या मुकपटाची निमिर्ती केली. हा चित्रपट परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठवण्यात आला.

महाराष्ट्र फिल्म कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार जगासमोर आले. मूक चित्रपट मधून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार हे कलावंत तयार झाले.

इसवी सन 1920 ते इसवी सण 1928 मध्ये बाबुरावांनी 17 मूकपटांची निर्मिती केली. सिंहगड हा भारतात पहिल्यांदा विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला चित्रपट आहे.

सिंहगड या चित्रपटाला इतका प्रतिसाद मिळाला की, या गर्दीचे नियंत्रण सरकारला करावे लागले होते. तेव्हापासून सरकारने चित्रपटावर करमणूक कर लागू केला.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी घतला. बाबुराव पेंटर यांनी चित्रपटाला कलात्मक शिस्त आणि सौंदर्य प्राप्त करून दिले. बाबुराव पेंटर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमधून तयार झालेले व्ही. शांताराम, एस्. फत्तेलाल, विष्णुपंत दामले आणि केशवराव धायबर यांनी हा वारसा पुढे चालविला.

बाबुराव पेंटर यांना मिळालेले पुरस्कार (Baburao Painter Award List In Marathi)

बाबुराव यांनी भारतीय चित्रपसृष्टीत मोलाची कामगिरी बजावली. यासाठी त्यांना कलामहर्षी या पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या नावाने चित्रपट दिग्दर्शकांना सन्मानित करण्यात येते.

कलामहर्षी बाबुराव पेंटर हा पुरस्कार सई परांजपे यांना 2012 साली देण्यात आला याबरोबरच श्याम बेनेगल यांना 2013 साली हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण बाबूराव पेंटरची माहिती (Baburao Painter Information In Marathi) मराठीमध्ये जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

FAQs

भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात कोणी केली?

भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी केली.

एक जुने मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर यांचे संपूर्ण नाव काय आहे?

एक जुने मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर यांचे संपूर्ण नाव राजाराम दत्तात्रय ठाकूर असे आहे.

बाबूराव पेंटर यांनी कोणता चित्रपट काढला?

बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा पहिला चित्रपट, त्यानंतर सावकारी पाश हा सामाजिक मूकपट, सिंहगड हा प्रसिद्ध चित्रपट निर्मिती केली. याबरोबरच त्यांनी 17 मुकपटांची निर्मिती केली.

बाबुराव पेंटर यांचा स्मृतिदिन केव्हा साजरा करतात?

बाबुराव पेंटर यांचा स्मृतिदिन 16 जानेवारी रोजी साजरा करतात.