बैल पोळा माहिती मराठी

Bail pola information in marathi – महाराष्ट्र राज्यातील सण आणि उत्सव या लेखात आपण मराठी सणांविषयी माहिती जाणून घेतली होती. त्यात आपण मराठी महिन्यानुसार येणाऱ्या सणांची माहिती जाणून घेतली. श्रावण महिन्यातील अमावस्याला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो. हा एक मराठी सण असून मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातदेखील साजरा केला जातो.

या लेखात आपण महाराष्ट्रातील सण बैलपोळा याविषयी माहिती मराठी (Bail pola festival in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण बैलपोळ्याचे स्वरूप आणि महत्व याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बैलपोळा माहिती मराठी (Bail pola Information in marathi)

Bail pola information in marathi
विषयबैलपोळा
इतर नावे 1. तेलंगणाच्या उत्तर भागात – पुलाला अमावस्या व काही ठिकाणी बेंदूर
2. उत्तर व पश्चिम भारतात – गोधन
3. दक्षिण भारतात – पोंगल
प्रकारमहाराष्ट्र राज्यातील सण
महत्वबैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
साजरा करणारेशेतकरी बांधव

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यात शेतकरी बांधव बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात. हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्यातील अमावस्याला साजरा केला जातो, पण शहरी भागात भाद्रपद अमावास्याला बैलपोळा साजरा केला जातो.

शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. वर्षभर शेतात शेतकरी खूप मेहनत घेत असतो, या मेहनतीला मदत करण्याचे काम बैल करत असतो.

बैलाची मेहनत ही कष्टदायक असते. त्यामुळे शेतकरी वर्षभर शेतात राबलेल्या बैलाला श्रावण महिन्यातील अमावस्येला सजवून गावातून त्याची मिरवणूक काढतात. या दिवशी मालक आपल्या बैलाला कसलेही काम करायला लावत नाही.

बैलपोळा साजरी करण्याची पध्दत मराठी (bail pola puja vidhi in marathi)

मराठी महिन्यातील श्रावण महिन्यातील अमावस्येला बैलपोळा सण असतो. बैलपोळ्याचा आदल्या दिवशी बैलाची खांदामळणी करतात. त्याच्या पायाची नखे काढतात, त्याची शिंग शिळून स्वच्छ करतात. शेपटीचे केस कापून केसांना चांगला आकार देतात. गावातील शेतकरी आपल्या बैलांना नदीवर किंवा पाण्याच्या ठिकाणी अंघोळ घालण्यासाठी नेतात.

अंघोळ घालून घरी आणल्यावर बैलाला गुळकाला खाऊ घालतात. दुसऱ्या दिवशी बैलाचे मालक आणि मालकीण उपवास धरतात.

बैलपोळ्याच्या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला पाण्याने धुऊन स्वच्छ करतो. त्यानंतर त्याच्या अंगावरील जुने दावे काढून नवीन दावे चढवली जातात. त्याच्या गळ्यात कवड्याची माळ घातली जाते. त्यानंतर शिंगे रंगवून बैलाला आकर्षक बनविले जाते. बैलाच्या रंगीबिरंगी साजशृंगार केला जातो.

बैलाच्या पाठीवर रेशीमाची शाल चढवली जाते, त्यानंतर रंगीबिरंगी साजशृंगार केलेल्या बैलाला त्याचा मालक गावातील मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातो. त्यांनतर बैलांची मोठी मिरवणूक काढण्यात येते.

बैलाची मिरवणूक चालू असताना त्याची मालकीण घरी त्याच्यासाठी पुरणपोळीचा नैवैद्य बनविते. मिरवणूक झाल्यानंतर बैलाला घरी आणतात, त्यानंतर त्याची मालकीण त्याला कुंकू लावून पुजते. बैलाचे पूजन झाल्यावर मालकीण त्याला पुरणपोळीचा नैवैद्य खाऊ घालते.

बैलाचे पुरणपोळीचा नैवैद्य खाल्यावर मालक आणि मालकीण धरलेला उपवास सोडतात. अशा प्रकारे या बैलपोळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

बैल पोळा महत्त्व मराठी (bail pola importance in marathi)

बैल वर्षभर शेतात राबत असतो. वर्षभरात आपल्या मालकाला शेतीच्या कामात मदत करतो. ऊन, वारा, पाऊस याचे कसलेही भान न ठेवता पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवतो. यामुळे वर्षभर मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो.

हा लेख जरूर वाचाशेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी

या दिवशी बैलाची पूजा करून गावातून त्याची मिरवणूक काढली जाते. या दिवशी बैलासाठी गोड-धोड नैवेद्य जसे की, ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त हा सण मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो.

भारत देश कृषीप्रधान असल्याने ग्रामीण भागात बहुतांश लोकांच्या घरी बैल असतात, पण ज्यांच्याकडे बैल नाहीत ते पोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात.

Related

  1. बैल पोळा शुभेच्छा मराठी
  2. बैल पोळा शायरी मराठी
  3. महाराष्ट्रातील सण आणि उत्सव

सारांश

या लेखातून आपण महाराष्ट्रातील सण बैलपोळा याविषयी माहिती मराठी (Bail pola information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. यात आपण बैल पोळ्याचे महत्त्व आणि बैलपोळ्याचे स्वरूप याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ? जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

महाराष्ट्रात बैलपोळा कधी असतो ?

महाराष्ट्रात बैलपोळा श्रावण महिन्यातील अमावस्येला असतो. इंग्रजी महिन्यानुसार पोळा ऑगस्ट महिन्यात येतो.

बैलपोळा का साजरा करण्यात येतो ?

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा करण्यात येतो.

Leave a Comment