Banana Information in marathi – मूसा जातिच्या झाडांपासून आपल्याला केळी हे फळ मिळते. याचा वापर प्रामुख्याने खाण्यासाठी केला जातो. केळीपासून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार केले जातात.
त्याचप्रमाणे कच्या केळीची भाजी बनवतात. कच्च्या केळीमध्ये पोटॅशियम, बी आणि सी विटामिन, स्टार्च आणि अॅन्टिऑक्सिडेंट्स याचे प्रमाण अधिक असते.
केळी हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे केळी आपल्या आहारात समावेश केले पाहिजे. असे केल्यास आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हिंदू धर्मात केळीच्या झाडांच्या खोडाला मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे.
आजच्या या लेखात आपण केळी खाण्याचे फायदे व तोटे माहिती – banana benefits in marathi जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- केळी खाण्याचे फायदे व तोटे माहिती – banana benefits in marathi
- दूध आणि केळी खाण्याचे फायदे – milk and banana benefits in marathi
- कच्चे केळी खाण्याचे फायदे मराठी माहिती – unripe banana benefits in marathi
- वेलची केळी खाण्याचे फायदे – Velchi Banana benifits in marathi
- केळी खाण्याचे तोटे – banana disadvantages in marathi
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
केळी खाण्याचे फायदे व तोटे माहिती – banana benefits in marathi

नाव | केळी |
शास्त्रीय नाव | मुसा इंडिका (Musa indica) |
प्रकार | फळ |
लागवड कोठे करतात | उष्णकटिबंधीय प्रदेशात |
जाती | 26 |
उपयोग | खाण्यासाठी |
अतिशय जलद गतीने ऊर्जा देणारे उत्साहवर्धक फळ म्हणून केळीला ओळखले जाते. केळीचा मुख्य वापर खाण्यासाठी केला जातो. केळी पासून वेफर्स, जॅम, भुकटी, पीठ, प्युरी, सुकेळी, पेढे, दारू, ब्रॅन्डी, शिरका, बिस्कीट हे खाद्य पदार्थ तयार केले जातात.
केळीची बाजारात कायम मागणी असते, त्यामुळे याचे उत्पादन बाराही महिने चालू असते. जगातील केळीच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो यात आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे.
हा लेख जरूर वाचा – पपनस मराठी माहिती (grapefruit information in marathi)
दूध आणि केळी खाण्याचे फायदे – milk and banana benefits in marathi
1. दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. जर तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर तुम्ही दुधात केळी आणि मध मिसळून खाल्याने तुमची झोप न येण्याची समस्या दूर होईल.
2. दारू प्यायलानंतर नशा चढते हे आपल्याला माहीत आहे ही नशा उतरवण्यासाठी केळी मिल्कशेकचा वापर केला जातो.
3. नियमित केळीच्या सेवनाने शरीराच्या मासपेशी अधिक मजबूत होतात.
4. केळीत ट्रायफोटोपण हा घटक असतो यामुळे मानवी मेंदू शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांसाठी केळी खा, असा सल्ला डॉक्टर देत असतात.
5. केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
6. नियमित केळी खाल्ल्याने महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर आराम मिळण्यास मदत होते.
7. केळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही नियमित केळी खाल्ले तर तुमचा एनिमियाचा धोका संपून जाईल.
8. केळीमध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात असते. आपल्या मेंदूच्या विकासासाठी पोटॅशियमची गरज असते, म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा खा, असा सल्ला डॉक्टर देतात.
9. केळी नियमित खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते. जर तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असेल तर केळी खाल्ल्याने तुमची पोटाची समस्या संपून जाईल.
10. याव्यतिरिक्त केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हा लेख जरूर वाचा (Weighing machine in India)
कच्चे केळी खाण्याचे फायदे मराठी माहिती – unripe banana benefits in marathi
11. कच्चा केळी मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते.
12. कच्चे केळी मधून पोटॅशियम, जीवनसत्व आणि खनिजे आपल्या शरीराला मिळत असतात. यामुळे याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करणे गरजेचे आह.
13. मधुमेह हा आजार असल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केळी खावे, याचा नक्कीच फायदा होतो.
14. एका केळामध्ये साधारणतः 130 कॅलरीज असतात. तर जीवनसत्व B6, कार्बोहायड्रेट, मॅंगनीज, विटामिन सी असते.
15. कच्चा केळीचे खाल्ल्यानं आपले वजन संतुलित राहण्यास मदत होते.
वेलची केळी खाण्याचे फायदे – Velchi Banana benifits in marathi
16. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांच्यासाठी वेलची केळी फारच गुणकारी आहे. कारण यामध्ये इतर केळांच्या तुलनेनं कॅलरीज कमी असतात.
17. व्यायाम करून झाल्यानंतर शरीरातील उर्जा भरून काढण्यासाठी या केळाचा वापर करण्यात येतो.
18. गरोदर महिलांना बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी वेलची केळ नियमित खावे.
19. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी केळी खाणे गरजेचे आहे. याच्या सेवनाने आपले केस देखील चांगले राहण्यास मदत होते.
20. आपल्या शरीरातील उर्जा भरून काढण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश नक्कीच करावा.
केळी खाण्याचे तोटे – banana disadvantages in marathi
21. केळी खाण्याचे तोटे म्हणता येणार नाही पण जर एकदम सकाळी किंवा रात्री केळी खाल्ल्याने कफ होण्याची शक्यता असते.
22. त्यामुळे एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत. आजारी असल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केळी खावे. सर्दी असेल तर शक्यतो खाणे टाळावे.
23. सकाळी उपाशीपोटी केळी खाल्ली तर पोटात गॅस होणे किंवा पोटदुखी सारखे आजार होतात. त्यामुळे शक्यतो केळी दुपारी खावीत.
24. बाजारातून केळे खरेदी करताना ते नैसर्गिक पद्धतीने पिकले आहेत का याची खात्री करून घ्यावी. नाहीतर बाजारात कृतीम रित्या पिकवलेली केळी असतात. ज्याच्या खाण्याने आपले आरोग्याचे संतुलन बिघडू शकते.
25. नियमित केळीच्या खाण्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत जाते, त्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तीने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केळ खावे.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये केळी खाण्याचे फायदे मराठी माहिती – banana benefits in marathi जाणून घेतली. केळी विषयी मराठी माहिती – banana information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
केळ्याची बाग म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
केळ्याची बाग म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो.
केळीच्या झाडाचे उपयोग मराठी माहिती
दक्षिण भारतात केळीची सालीवर जेवण वाढले जाते, असे केल्याने सालीत असणारे पोषक घटक अन्नात मिसळतात त्याने चेहऱ्यावरील डाग, पुरळफोड पासून सुटका होते. महाराष्ट्रात केळीची हिरवी साल जनावरांना चारा म्हणून वापरली जाते. आणि साल वाळल्यानंतर त्याचा वापर इंधन म्हणून केला जातो.
केळीच्या पानाचे वैशिष्ट्ये काय आहेत ?
केळीच्या पानावर पाणी कधीच टिकत नाही, त्यामुळे ते गुळगुळीत आणि स्वच्छ असते. हे पण जवळपास साडेतीन मीटर लांब असते.
केळीच्या जातींची नावे सांगा.
1. बसराई
2. श्रीमंती
3. वेलची
4. सोनकेळी
5. लाल केळी
6. चक्रकेळी
7. कुन्नन
8. अमृतसागर
9. बोंथा
10. विरूपाक्षी
11. हरिसाल
12. सफेद वेलची
13. लाल वेलची
14. वामन केळी
15. ग्रोमिशेल
16. पिसांग लिलीन
17. जायंट गव्हर्नर
18. कॅव्हेन्डीशी
19. ग्रॅन्ड नैन
20. राजापुरी
21. बनकेळ
22. भुरकेळ
23. मुधेली
24. राजेळी
स्रोत – मराठी विकिपीडिया
केळी पासून बनवले जाणारे पदार्थ कोणते आहेत ?
केळी पासून बनवले जाणारे पदार्थ – चिप्स, भुकटी, पीठ, जेली, जॅम, बनाना प्युरी,
कच्च्या केळीचे वडेे, ज्यूस,
केळ्याचे सुके अंजीर, केळी बिस्कीट, व्हिनेगर, कच्च्या केळीची भाजी, खमंग बनाना शेेव, केळ्याचे गुलाबजाम
केळ्याची बाकरवडी इत्यादी पदार्थ बनवले जातात.