बँक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता

Bank Reconciliation Statement In Marathi – मित्रांनो, बँकेमार्फत व्यवहार करत असताना आपण केलेल्या प्रत्येक व्यवहारांची नोंद बँक स्वतंत्रपणे लिहून ठेवत असते. तसेच व्यापारी आपल्या व्यवहारांची नोंद रोकड पुस्तकात लिहितो. बऱ्याचदा या दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेत फरक आढळून येतो. हा फरक शोधून काढण्यासाठी बँक जुळवणी पत्रक उपयोगी पडते.

बँक जुळवणी पत्रक तयार करणे ही महत्वाची बाब असून त्यासाठी रोख पुस्तकाप्रमाणे आणि बँक पास बुकाप्रमाणे दिसणाऱ्या शिल्लक रकमेतील फरक पडण्याची कारणे शोधून काढणे आवश्यक असते.

या लेखातून आपण बँक जुळवणीपत्रक कसे तयार करतात, तसेच ते तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता (Bank Reconciliation Statement In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बँक जुळवणी पत्रक म्हणजे काय (Bank Reconciliation Statement In Marathi)

Bank Reconciliation Statement In Marathi

Definition of bank reconciliation statement – कोणत्याही एका ठराविक दिवशी बँक पासबुक आणि रोख पुस्तक यामधील शिल्लक वेगवेगळी येत असेल तर ती फरक हिशोबातील चुकांमुळे निर्माण झालेला नसून तो काही व्यवहारांची दोन्ही पुस्तकात नोंद न झाल्यामुळे निर्माण झाला आहे. याची खात्री करून घेण्यासाठी जे पत्रक तयार करण्यात येते त्याला बँक जुळवणी पत्रक (Bank Reconciliation Statement) असे म्हणतात.

एका विशिष्ट दिवशी रोख पुस्तकातील बँक रकान्यात दाखवली जाणारी बँकेतील रोख रक्कम आणि बँक खाते पुस्तकात दाखवलेली रोख शिल्लक यांची पडताळणी बँक जुळवणी पत्रकाने केली जाते.

साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला बँक जुळवणी पत्रक तयार केले जाते. बँकेसोबत होणाऱ्या व्यवहारांची संख्या अधिक असली, तर बँक जुळवणी पत्रक दर आठवड्याला केले जाते.

संबंधितअर्थशास्त्राची व्याख्या मराठी (economics definition in marathi)

बँक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता (Why Bank Reconciliation Is Important In Marathi )

Importance Of Bank Reconciliation Statement In Marathi – रोकड पुस्तकाप्रमाणे दिसणारी शिल्लक रक्कम ही बँक पासबुकप्रमाणे दिसणाऱ्या शिल्लक रकमेशी पडताळून पाहणे आवश्यक असते. या दोन शिल्लक रकमेत काही फरक आढळून आल्यास, त्याची कारणे शोधायला पाहिजे.

बँक जुळवणी पत्रक बनवल्यावर ही कारणे स्पष्ट होतात. तसेच बँक जुळवणी पत्रक तयार केले नाही तर रोकड पुस्तकाप्रमाने दिसणारी बँक शिल्लक ही अगदी बरोबर आहे, अशी खात्री व्यापारी बाळगू शकत नाही. म्हणून ठराविक काळानंतर जुळवणी पत्रक तयार करणे आवश्यक असते.

सध्याच्या परिस्थितीत व्यवसाय आणि बँकेत मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झालेले दिसून येते. यामुळे व्यवहाराच्या नोंदी अचूक होतात. पण जर एखाद्या वेळेस संगणकाला चुकीची माहिती पुरविली गेली तर या माहितीमुळे अनेक घोटाळे निर्माण होतात.

जर बँक जुळवणी पत्रक वेळच्या वेळी तयार केले असेल तर संगणकीय चुकांवर नियंत्रण ठेवता येते.

संबंधितई-कॉमर्स म्हणजे काय ?

बँक जुळवणी पत्रक तयार करण्याची पद्धत (How To Prepare Bank Reconciliation Statement In Marathi)

importance of bank reconciliation statement in Marathi

1. बँक जुळवणी पत्रक कोणत्या कालावधीसाठी तयार करायचे आहे, आणि ते कोणत्या तारखेला तयार तयार करायचे आहे, ते ठरवा.

2. संबंधित बँकेत जाऊन पासबुक वर Update नोंदी करून घ्याव्यात.

3. ठरलेल्या तारखेला रोकड पुस्तकातील बँक रकान्यात शिल्लक आणि पासबुकप्रमाणे शिल्लक किती आहे, ते पाहावे. या दोन्ही रकमेत काही फरक आला तरच बँक जुळवणी पत्रक तयार करतात.

4. आता रोकड पुस्तकातील बँक व्यवहारांची, पास बुकात नोंद झाली आहे का नाही ते पाहावे. जे व्यवहार दोन्ही पुस्तकात नोंदवली असतील, त्यावर (✓) अशी खूण करावी.

5. ज्या व्यवहारांवर (✓) अशी खूण झाली नसेल, त्यांची यादी करून त्या व्यवहारांचा बँकेतील रकमेवर कोणता परिणाम झाला ते लिहून ठेवावे. यावरून पुढील माहिती स्पष्ट होईल.

  1. रोकड पुस्तकातील नावे बाजूवर लिहिलेले परंतु पासबुकात जमा बाजूवर न नोंदविलेले व्यवहार.
  2. रोकड पुस्तकातील जमा बाजूवर लिहिलेले पण पासबुकात नावे बाजूवर न नोंदविलेले व्यवहार.
  3. पासबुकमध्ये नावे बाजूवर लिहिलेले परंतु रोकड पुस्तकात जमा बाजूवर न नोंदविलेले व्यवहार
  4. पासबुकमध्ये जमा बाजूवर लिहिलेले पण रोकड पुस्तकातील नावे बाजूवर न नोंदविलेले व्यवहार

6. यानंतर कोणत्याही एका पुस्तकातील बँक शिल्लक आधार म्हणून घेऊन त्या रकमेत खालील रकमा मिळवाव्यात किंवा वजा कराव्यात.

  1. ज्या व्यवहारांमुळे आधार पुस्तकाप्रमाणे बँक शिल्लक कमी झाली असेल त्या व्यवहारांच्या रकमा आधार पुस्तकाप्रमाणे दिसणाऱ्या शिलकेत मिळवाव्यात.
  2. ज्या व्यवहारांमुळे दुसऱ्या पुस्तकातील बँक शिल्लक वाढली असेल, त्या व्यवहारांच्या रकमा आधार पुस्तकाप्रमाणे दिसणाऱ्या शिल्लक रकमेत मिळवाव्यात.
  3. ज्या व्यवहारांमुळे आधार पुस्तकाप्रमाणे दिसणाऱ्या शिल्लक रकमेत वाढ झाली असेल, त्या व्यवहारांच्या रकमा आधार पुस्तकाच्या शिल्लक रकमेतून वजा कराव्यात.
  4. ज्या व्यवहारांमुळे दुसऱ्या पुस्तकाप्रमाणे दिसणारी शिल्लक रक्कम कमी झाली असेल त्या व्यवहारांच्या रकमा आधार पुस्तकाप्रमाणे दिसणाऱ्या शिल्लक रकमेतून वजा कराव्यात.

अशा प्रकारे बेरीज वजाबाकी केल्यावर दोन्ही पुस्तकात असणारी शिल्लक रक्कम एकसारखी राहील.

महत्वाचे – रोकड पुस्तकाप्रमाणे बँक शिल्लक आधार घेऊन किंवा पास बुकाप्रमाणे बँक शिल्लक आधार घेऊन बँक जुळवणी पत्रक तयार केले जाते.

सारांश

या लेखातून आपण बँक जुळवणीपत्रक कसे तयार करतात, तसेच ते तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता (Bank Reconciliation Statement In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.