Bhagat Singh Rajguru Sukhdev Speech Marathi – नमस्कार मित्रांनो, देशाचा स्वातंत्र्यलढा म्हटले की आपल्यासमोर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू अशी कितीतरी नावे प्रत्येकाच्याच तोंडी येतात.
परंतु कुठेतरी स्वातंत्र्यसंग्रामात आपले योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी फारसे कोणी बोलत नाही. इतिहासाच्या पुस्तकात देखील दोन तीन पानेच त्यांच्या वाट्याला येतात.
यासाठी मी आज स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव (Bhagat Singh Rajguru Sukhdev Speech Marathi) या क्रांतिकारकांनी केलेल्या योगदानाविषयी भाषण करणार आहे.
मला आशा आहे की, तुम्हाला हे भाषण नक्की आवडेल. चला तर मग आपल्या भाषणाला सुरुवात करूया.
क्रांतिकारी भगत सिंह राजगुरु सुखदेव भाषण मराठी (Bhagat Singh Rajguru Sukhdev Speech Marathi)

अध्यक्ष, महाशय! गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. कारण याच दिवशी इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो.
स्वातंत्र्य काय असते? हे आज आपल्याला कळणार नाही, कारण त्यासाठी पारतंत्र्य काय असते? हे आपल्याला अनुभवल्या शिवाय स्वातंत्र्याची किंमत कळू शकत नाही.
जरा विचार करा आपण घरामध्ये एकटे आहोत आणि आपल्या घराला कोणीतरी बाहेरून कडी लावली. काही काळाने ती कडी किंवा दरवाजा उघडणार आहे, तरीदेखील आपण घरामध्ये मध्ये घाबरून जातो.
पाच दहा मिनिटांचा काळ देखील आपल्याला नको नको करून टाकतो. इंग्रजांनी आणि इतर परकीय सत्तांनी तर आपल्याला दीडशे वर्ष कोंडून ठेवले.
जरा कल्पना करा जीवनामध्ये स्वातंत्र्य किती मोलाचे असते. या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यायला सावरकरांच्या त्या चार ओळी पुरेशा आहेत,
ने मजसी ने परत
मातृभूमीला सागरा
प्राण तळमळला
तळमळला सागरा.
पारतंत्र्यामध्ये राहणे यासारखी व्यथा या जगामध्ये कोणतीच नाही, म्हणूनच अगदी धुमधडाक्यात आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो.
ज्या ज्या शूर वीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांच्या पराक्रमाचे गोडवे आज आपण गातो. आज मी माझ्या भाषणामध्ये भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मांडणार आहे.
भगतसिंग राजगुरू सुखदेव (Bhagat Singh Rajguru Sukhdev) या तीन महान भारतीय क्रांतिकारकांनी इंग्रजांपुढे शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या न मांडता सशस्त्र लढा त्यांनी हाती घेतला.
इंग्रज जर आपल्याशी अमानुषपणे वागत असतील तर आपण जशास तसे उत्तर दिले पाहिजे हा पवित्रा या क्रांतिकारकांनी घेतला.
जे इंग्रज अधिकारी गोर गरीब जनतेला विनाकारण त्रास देत होते त्यांना धडा शिकवण्याचे काम या क्रांतिकारकांनी केले.
भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब राज्यातील लालपुर जिल्ह्यामध्ये बंगाल या छोट्याशा गावी झाला. भगतसिंग यांचे वडील आणि काका दोघेही स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्याकडूनच त्यांना या क्रांतिकारकतेचे बाळकडू मिळाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
ऐन तारुण्यात घर परिवार यांचा विचार न करता स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून देणारे भगतसिंग आपल्या आत्मचरित्रात म्हणतात,
यह शादी करने का समय नही है
मेरा देश मुझे बुला रहा है
मैने अपने दिल और आत्मा के साथ
देश सेवा करने की
प्रतिज्ञा कर ली है!
या त्यांच्या देशभक्तीपर विचारातून मी जो काही आहे तो भारतमातेसाठी आहे, हेच या शब्दांमधून हुंकार निघत आहेत.
त्यांच्या जोडीला असणारे सुखदेव यांचा जन्म देखील पंजाब मधील लुधियाना या ठिकाणी झाला. भगतसिंग सुखदेव यांच्या जोडीला असणारे राजगुरू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील खेड गावी वास्तव्यास होते. हे देखील देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भूमिकेतून सशस्त्र क्रांतिकारक लढ्यामध्ये सहभागी झाले.
भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्याविषयी माहिती (Bhagat Singh Rajguru Sukhdev Information In Marathi)

भगतसिंग राजगुरू सुखदेव (Bhagat Singh Rajguru Sukhdev) या त्रिमूर्तींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी नेमके काय योगदान दिले? हे सांगायचे झाले तर, ब्रिटिश सरकारने 1919 चा जो कायदा केला होता.
त्या कायद्याला संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात विरोध होत होता आणि तो विरोध विरोध मिटवण्यासाठी ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती तो अधिकारी आणि समिती स्थापन केली होती ती म्हणजे सायमन कमिशन होय.
सायमन कमिशन विरोधात खूप मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. भारतातील पंजाब प्रांतामध्ये या सायमन कमिशनला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
ब्रिटिशांनी लाला लाजपत राय आणि त्यांचे सहकारी यांच्यावरती लाठी चार्ज केला तो इतका भयानक होता की यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.
इंग्रजांच्या या कृत्याला आता जशास तसे उत्तर देणे भाग होते म्हणूनच लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांनी पोलीस अधिकारी सँडर्स याला गोळ्या घालून ठार मारले.
खून का बदला खून से या न्यायाने भगतसिंग राजगुरू सुखदेव त्याचबरोबर इतर क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी इंग्रजांच्या मंत्रिमंडळावर बॉम्ब हल्ला करण्याची एक योजना आखली.
योजनेनुसार हल्ला देखील करण्यात आला परंतु त्यानंतर इंग्रजांनी या तिघांविरोधात खटला चालवला. सँडर्से याचा देखील वध भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनीच केला आहे असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.
या तिघांवरती एका इंग्रज अधिकाऱ्याला मारण्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा घोषित करण्यात आली. यांनतर या तीनही क्रांतिकारकांना फाशीच्या तक्त्यावर चढवण्यात आले, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मेलो तरी चालेल अशी भूमिका या तीनही क्रांतिकारकांनी घेतली.
फाशीवर जात असताना इन्कलाब जिंदाबाद!,
भारत माता की जय!
वंदे मातरम या घोषणा दिल्या.
एकीकडे आपल्या आणि तारुण्यात फासावरती जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आज मोबाईल इंटरनेट फेसबुक इंस्टाग्राम व्हिडिओ गेम तसेच व्यसनाधीनता यामध्ये धन्यता मानणारा आजचा तरुण वर्ग यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.
आज आपला पारतंत्र्यात नक्कीच नाही, परंतु या देशाला जगाच्या पातळीवर एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी शिक्षण हे एकमेव हत्यार आहे. की ज्याच्या बळावर आपण जगावरती राज्य करू शकतो परंतु आजकालच्या तरुण पिढीला मन लावून शिक्षण घेणे, घेतलेल्या शिक्षणाचा जीवनात उपयोग उपयोग करणे यात स्वारस्य वाटत नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि आज ज्या भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी एक संकल्प करूया देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले असा उलट विचार करून बघूया आणि देशाच्या कामी येऊया. या आजच्या तरुण पिढीला एकच आवाहन करेल..
उठो धरा के अमर सपूतो
पुन: नया निर्माण करो
जन जन के जीवन मे फिरसे
नई स्फूर्ती और नये प्राण भरो
देश के लिए कुछ तो करो
कुछ तो करो
चला तर मग आपण आपापल्या परीने देशाच्या कामी येऊया. आज मला स्वातंत्र्यदिनानिमित्त भगतसिंग राजगुरू सुखदेव (Bhagat Singh Rajguru Sukhdev) यांच्याविषयी बोलण्याची संधी जी आयोजकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे या ठिकाणी मी माझे स्वातंत्र्य दिनाचे लाभलेले भाषण थांबवतो. धन्यवाद.
सारांश
तर मित्रांनो आशा करतो की, क्रांतिकारी भगत सिंह राजगुरु सुखदेव भाषण मराठी (Bhagat Singh Rajguru Sukhdev Speech Marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असेल.
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.
तुम्हाला आवडतील असे काही भाषण –