भाषा मराठी माहिती – bhasha in marathi

Bhasha in marathi – भाषा विनिमयाचे एक साधन आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी म्हणून ओळखले जातात. मानवी जीवनात भाषेचे अनन्यसाधारण आहे. मानवाने आपले जीवनात कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, शिक्षणसंस्था, राज्यसंस्था निर्माण करून आपले जीवन आनंदमय केले.

भाषा म्हणजे काय व्याख्याभाषा म्हणजे एकाचे विचार इतरांपर्यंत पोहचवण्याचे एक साधन आहे.

भाषा आणि मानवी जीवन यांची घट्ट पकड आहे. भाषेच्या आधारे आपलं भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील गोष्टीचा वेध घेऊ शकतो. त्यामुळे भाषेला सामाजिक संस्थेच्या दर्जा प्राप्त झाला आहे.

या लेखात आपण भाषा मराठी माहिती – bhasha in marathi पाहणार आहोत.

भाषा मराठी माहिती – bhasha in marathi

bhasha in marathi
भाषा मराठी माहिती – bhasha in marathi

सर्व प्राणिमात्रांची एक विशिष्ट भाषा आहे, यात प्रामुख्याने मानव असा प्राणी आहे ज्याने आपली भाषा मोठ्या कौशल्याने विकसित केली आहे. पण माणसाची भाषा ही देश, राज्य अगदी 100 किलोमीटर अंतरावर बदलत जाते.

परंतु सर्व भाषेतील शब्द आणि त्यांचे अर्थ यांची योग्य सांगड घालून आपण कोणतीही भाषा समजून घेऊ शकतो किंवा शिकू शकतो.

भाषा म्हणजे काय ?

भाषा ही एक संस्था आहे, ज्याचा वापर करून आपले विचार व्यक्त करता येतात. भाषा म्हणजे एका व्यक्तीचे विचार इतरांपर्यंत पोहचवण्याचे एक साधन अर्थात विनिमायचे साधन होय. भाषा संस्कृतीची वाहक आहे. मानवाचा प्रवास या भाषेमुळे आज आपण वाचू शकतो.

मानव हा समाजशील प्राणी आहे. भाषा आणि यांचा गहरा संबंध आहे. भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्यातील मुख्य आणि मूळ भाषा आहे.

मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे भाषा होय.

भाषेची कार्य कोणती आहे ?

भाषा ही विनीमायचे साधन असल्याने सर्वच गोष्टी भाषेवर निर्भर आहे. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार प्रगट करण्याचे साधन आहे.

दैनंदिन जीवनात आपले विचार एकमेकांसमोर मांडण्यासाठी भाषा महत्त्वाची आहे. भाषेतून आपण विकास साधू शकतो. विविध प्रकारचे ज्ञान संपादन करू शकतो.

भाषेचा आधार घेत मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या अनेक गोष्टी विकसित करत आहे. जेणेकरून मानवी जीवन सुखमय होईल.

व्यवहार असो अथवा सामान्य काम, ते सोयीस्कर होण्यासाठी पाहिजे एक भाषा. भाषा ही ध्वनी आणि लिखीत स्वरूपात पाहायला मिळते.

संपुर्ण जगात 2700 च्या जवळपास भाषा आहेत आणि 7000 च्या आसपास बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.

आपली मराठी भाषा जगातील दहावी आणि भारतातील तिसरी भाषा सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. मराठीमध्ये कोळी, आगरी, माणदेशी, वऱ्हाडी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोंकणी अश्या बोलीभाषा आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जाते. तसेच महाराष्ट्राबाहेरील 15 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली जाते.

भारतील राज्य व भाषा मराठी माहिती

राज्यराजधानीअधिकृत भाषा
आंध्र प्रदेशहैद्राबाद तेलगू आणि उर्दू
आसामदिसपूरअसामी आणि बंगाली
बिहारपाटणाहिंदी
गुजरातगांधीनगरगुजराती
हरियाणाचंदीगडहिंदी
जम्मू काश्मीरश्रीनगरकाश्मिरी आणि उर्दू
हिमाचल प्रदेशशिमलाहिंदी आणि पहाडी
केरळत्रिवेदममल्याळी
कर्नाटकबंगळूरकन्नड
मध्यप्रदेशभोपाळहिंदी
महाराष्ट्रमुंबईमराठी
सिक्कीमगंगटोकसिक्किमी आणि गोखली
अरुणाचल प्रदेशइटानगरपहाडी
मेघालयशिलाँगखाशी, जैतिया आणि गारो
मणिपूरइंफाळमणिपुरी
नागालँडकोहीमानागा आणि आसामी
मिझोरमऐजवालमिझो आणि इंग्रजी
ओरिसाभुवनेश्वरओडिसी
पंजाबचंदीगडपंजाबी
राजस्थानजयपूरराजस्थानी आणि हिंदी
तामिळनाडूचेन्नईतमिळ
त्रिपुराअगरतळाबंगाली आणि मणिपुरी
उत्तर प्रदेशलखनऊहिंदी आणि उर्दू
पश्चिम बंगालकोलकाताबंगाली
गोवापणजीमराठी आणि कोकणी
छत्तीसगडरायपुरहिंदी
उत्तरांचलडेहराडूनहिंदी
झारखंडरांचीहिंदी
तेलंगणाहैद्राबादतेलगू आणि उर्दू

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगा.

1. जगभरात सुमारे 9 कोटी लोक मराठी बोलतात.
2. मराठी ही जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात याचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
3. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
4. महाराष्ट्र, दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली आणि गोव्याची अधिकृत भाषा आहे.
5. मूळ मराठी भाषा ही मोडी लिपीत लिहिली जात असे. आता मात्र ती बाळबोध (देवनागरी) लिपीत लिहिली जाते.

मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो ?

मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी साजरा केला जातो.

जगात किती भाषा बोलल्या जातात ?

जगात सहा हजार पाचशे भाषा बोलल्या जातात.

जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती ?

जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मॅंडेरिन भाषा (चिनी भाषा) आहे.

महाराष्ट्रात किती भाषा बोलल्या जातात ?

महाराष्ट्रात 60 भाषा बोलल्या जातात.

बोली भाषा म्हणजे काय ?

विशिष्ट प्रदेश किंवा विशिष्ट संस्कृतीतील समुहाची व्यवहाराची भाषा म्हणजे बोली भाषा.

भाषिक विविधता म्हणजे काय ?

भाषेतील विविधतेला भाषिक विविधता म्हणतात.

सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांची संख्या कोणत्या देशात आहे ?

सर्वाधिक इंग्रजी भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी बोलली जाते.

मराठी भाषा कोणत्या भाषाकुलातील भाषा आहे ?

मराठी भाषा इंडो युरोपीय भाषाकुलातील भाषा आहे.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये भाषा मराठी माहिती – bhasha in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण भाषा माहिती माहितीमध्ये भाषा म्हणजे काय ? भाषेची कार्य आणि भारतातील राज्य आणि राज्यभाषा याबद्दल मराठी माहिती पाहिली आहे.

भाषा मराठी माहिती – bhasha in marathi कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला भाषा मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment