भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – bhimashankar wildlife sanctuary information in marathi

Bhimashankar wildlife sanctuary information in marathi – भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे आहे. भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्या पैकी सहावे ज्योतिलिंग महाराष्ट्रातील भीमाशंकर या ठिकाणी आहे. भीमाशंकर अभयारण्य हे पानझडी जंगल आहे.

विविध वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती या अभयारण्यात आहे.अनेक प्रकारचे वन्यजीव भीमाशंकरच्या अभयारण्यात पाहायला मिळतात.

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय पशु म्हणजेच शेकरू या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येतात.

हे देखील वाचा – राष्ट्रीय पशु शेकरु

या लेखात आपण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य – bhimashankar wildlife sanctuary याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – bhimashankar wildlife sanctuary information in marathi

bhimashankar wildlife sanctuary
bhimashankar wildlife sanctuary

भीमाशंकरचे अभयारण्याची उंची सुमारे तीन हजार फूट आहे आणि दोन भागामध्ये विभागले आहे.भीमाशंकर अभयारण्याचा पहिला भागात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगल आहे.दुसऱ्या भागात ठाणे, रायगड, जिल्हय़ातील जंगलाचा आहेत.

सर्वत्र लाल मती असल्यामुळं पर्यटक या ठिकाणी पावसाळत पदयात्रा साठी आवर्जून येतात.

हे अभयारण्य एकूण 13 हजार 78 हेक्टर इतक्या क्षेत्रात वसलेले आहे.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य – प्रेक्षणीय स्थळे

भीमाशंकर अभयारण्यात जैवविविधता पहायला मिळते. त्याच बरोबर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती पाहायला मिळतात.महाराष्ट्राचा राज्य पशु म्हणजेच शेकरू यांचे निवासस्थान भीमाशंकर या ठिकाणी आहे. शेकरू एक खार या प्राण्याची जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा एका वेळेस पंधरा ते वीस फुटाची लांब उडी मारू शकतो.

शेकरू या प्राण्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी बिबटय़ा, वाघ, कोल्हा, लांडगा, वानर आहेत तसेच सांबर, हरीण साळिंदर, भेकर, वन्यजीव या ठिकाणी आढळून येतात.

बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध उपक्रम राबवले आहेत.तरस, काळवीट, मोर हे सुद्धा या अभयारण्यात पाहायला मिळतात.

bhimashankar wildlife sanctuary
bhimashankar wildlife sanctuary

भारतामध्ये एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी सहावे ज्योतिलिंग हे भीमाशंकर खेड या ठिकाणी आहे.

गुप्त भीमाशंकर -पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नदी भीमा या ज्योतिलिंगमध्ये उगम पावते आणि नंतर गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर नंतर पुन्हा वाहताना दिसते. म्हणूनच या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर म्हणतात.

कोकणकडा – भीमाशंकर मंदिराजवळ 1100 मीटर उंचीचा एक कडा आहे .या कड्यावरून पश्चिम बाजूचा अरबी समुद्र दिसतो. कोकणकड्यापासून घनदाट जंगलात सीतारामबाबा आश्रम आहे.

सीतारामबाबा आश्रम नंतर नागफणी पॉइंट आहे. हे ठिकाण 1230 मीटर उंच आहे. त्यामुळे इथला संपूर्ण परिसर इथून पाहता येतो. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून या ठिकाणावर नागफणी असे म्हणतात.

1200 ते 1400 वर्षांपूवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरावर सुंदर नक्षीकाम केले आहे.त्याचबरोबर दशावताराच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत, बाहेर पाच मण वजनाची लोखंडी घंटा आहे.

मंदिरात दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. एलईडी स्क्रीनवर गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते.

भीमाशंकर म्हणजे पावित्र्य आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम आहे त्याचरोबर सदाहरित जंगल आणि महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचं निवासस्थान असलेलं हे ठिकाण आहे.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य – मार्ग

bhimashankar wildlife sanctuary
bhimashankar wildlife sanctuary

पुण्यावरून भीमाशंकर हे 127 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे त्यामुळे पुण्यापासून भीमाशंकरला जाण्यासाठी तीन तास लागतात. मुंबई वरून भिमाशंकर 197 किलोमीटर आहे. मुंबईवरून भीमाशंकरला येण्यासाठी पाच तास लागतात.तर नाशिक वरून 205 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक वरून भीमाशंकरला येण्यासाठी सुद्धा पाच तास लागतात.

अहमदनगर हे भीमाशंकर पासून 165 किलोमीटर दूर आहे येथून भीमाशंकर ला येण्यासाठी तीन तास लागतात. या सर्व ठिकाणावरून येण्यासाठी नॅशनल हायवे चा वापर होतो.

याठिकाणी येण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ सेवा बस सुविधा किंवा खाजगी गाड्या वापरून घेऊ शकता. कारण या ठिकाणी कोणतेही जवळपास रेल्वे स्टेशन नाही आणि विमान स्टेशनही नाही.

सारांश

या लेखात आपण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य – bhimashankar wildlife sanctuary याबद्दल सर्व माहिती पाहिली. महाराष्ट्राचा राज्य पशु शेकरू या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.

निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी यांनी या ठिकाणी एकदा तरी पर्यटनास यायला हवे. भीमाशंकरला जाताना अनेक धबधबे लागतात. ज्यांना धबधब्याची मजा घ्यायचे आहे त्यांच्यासाठी भीमाशंकर अभयारण्य हे ठिकाणी योग्य आहे.

भीमाशंकर या परिसरात कोकणकडा आहे तिथं आपण मुंबईचा अरबी समुद्र पाहू शकतो.भीमाशंकर म्हणजे पावित्र्य आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम आहे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भीमाशंकर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे?

भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे.

भीमाशंकर अभयारण्य किती क्षेत्रात पसरले आहे?

13 हजार 78 हेक्टर इतक्या क्षेत्रात भीमाशंकर अभयारण्य पसरलेले आहे.

भीमाशंकर अभयारण्यात कोणकोणते प्राणी आढळतात ?

भीमाशंकर अभयारण्यात शेकरू या प्रजातीची जात आढळून येते. याव्यतिरिक्त बिबट्या, वाघ, हरिण, कोल्हा तरस, काळवीट, लांडगा आणि अन्य प्रजाती आढळून येतात.
भीमाशंकर अभयारण्यात सर्वात जास्त वानर आणि शेकरू पाहायला मिळतात.

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना केव्हा सुरू झाला ?

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बनवण्याचा निर्णय 1994 साली घेतला आणि प्रत्यक्ष बनवण्याची सुरुवात 1999 पासून केली.

हे देखील वाचा

Leave a Comment