भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi

Bhudargad fort information in marathi – भुदरगड हा महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यापैकी एक आहे. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या जिल्ह्यात आहे.

किल्ल्याच्या चारही बाजूला घनदाट झाडी आहे, सध्या अगदी मोजक्याच किल्ल्यांची व्यवस्थित तटबंदी पाहायला मिळते.

गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशी अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला हा भुदरगड किल्ला आहे. आज आपण भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi पाहणार आहोत.

भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi

bhudargad fort information in marathi
bhudargad fort information in marathi
नावभुदरगड
उंची3,212 फूट
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणकोल्हापूर, महाराष्ट्र राज्य
भारत
डोंगररांगसह्याद्री
जवळील पर्यटन स्थळेरांगणा
जोतिबा
bhudargad in marathi

1. कोल्हापूर जिल्ह्यापासुन साधारणपणे 55 किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे.

2. भुदरगड किल्ला आठशे मीटर लांब आणि सातशे मीटर रुंदी़चा आहे, तसेच येथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे.

3. भुदरगड किल्ल्याला दोन दरवाजे आहे.

4. या ठिकाणी दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरत असते.

भुदरगड किल्ला इतिहास – bhudargad fort history in marathi

5. भुदरगड किल्ला राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता.

6. त्यानंतर हा किल्ला अदिलशाही कडे बरीच वर्षे होता, त्यानंतर इसवी सन 1667 मध्ये स्वराज्यात आला.

7. इसवी सन 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची दुरूस्ती केली आणि यालाच प्रबळ लष्करी ठाणे बनवले.

8. त्यानंतर मुघलांनी काही दिवसातच याला आपल्या ताब्यात घेतले.

9. त्यानंतर पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला केला आणि त्यात यशस्वी देखील झाले.

10. मुघलांची काही निशाणे अजूनही देवळात आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांतील यावर ताबा मिळवला.

11. पुढे दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1844 मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले.

12. त्यामध्ये सामानगड व भुदरगड प्रमुख होते.

13. 13 ऑक्टोबर 1844 या दिवशी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगड जिंकुन घेतला.

14. पुढे चालून कुणी बंड करू नये म्हणून इंग्रजांनी किल्ल्याची तटबंदी पाडली.

15. गारगोटीवरून पुशपनगर राणेवाडी मार्गे किल्ल्यावर जाता येते.

भुदरगड किल्ला माहिती मराठी – bhudargad fort mahiti marathi

16. शिवापूर ही पूर्वीची बाजारपेठ होती.

17. रस्त्याने जात असताना महादेवाचे मंदीर आणि त्यासमोर असलेला नंदी पाहायला मिळतो.

18. गडावर जातांना भैरवनाथाचे हेमाडपंथीचे मंदीर पाहायला मिळते.

19. मंदिराच्या आवारात ओवर्‍या, कमानी व दिपमाळा आहे.

20. समोरच बुरुजावर ध्वजस्तंभ आणि तोफ आहेत.

21. देवळामागून जाताना जांभ्या दगडातील भव्य वाडा दिसतो.

22. वाड्यात महाराजांनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे.

23. सभा मंडपात महाराजांचा अर्धपुतळा आहे.

24. वाड्याजवळच भुदरगडचे शान असलेला दुधसागर तलाव आहे.

25. यातील पाणी हे दुधासारख्या रंगाचे आहे.

26. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर आहे. त्या मंदिरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे.

27. तलावाचे उजव्या बाजूला समाधी आहेत.

28. समोरच सभा मंडप असलेले एक मंदीर लागते.

29. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्त्या आहेत. उत्तरेकडे एक छोटा तलाव आहे.

30. या ठिकाणी देखील अनेक समाध्या आहेत.

भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi

31. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी असणारे शिवापुर गाव पाहता येते.

32. दूध सागर तलावाच्या डाव्या बाजूस महादेवाचे नक्षीकाम असलेले मंदीर पाहायला मिळते.

33. पूर्वेकडे गडाचे प्रवेशद्वार आहे, पण ते सध्या नामशेष झाले आहे.

34. या ठिकाणी एक भलीमोठी चौरसाकृती शिळा आहे.

35. प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी आहे.

36. त्यांच्यासमोर एक प्राचीन भुयार आहे.

37. भुयाराच्या आतमध्ये अनेक मुर्त्या आहेत, त्यामध्ये जखुबाइची शेंदरी मुर्ती पाहायला मिळते.

38. आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे.

39. या ठिकाणी एक बुजलेला दरवाजा आहे आणि 2 विहिरी आणि 2 तलाव आहेत .

40. बऱ्याच दिवस येथील पाणी वापरात नसल्यामुळे येथील पाणी पिण्यासाठी योग्य नाही.

41. भैरवनाथाचे मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे.

42. किल्ल्यावर एक मोठा तलाव आहे आणि त्याच्या शेजारी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर पाहायला मिळते.

43. किल्ल्यावर बरीच झाडे-झुडपे पाहायला मिळतात.

44. किल्ल्यावरून दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी पाहायला मिळतात.

45. त्याचबरोबर राधानगरीचे दाट जंगल आणि आंबोली घाटाचा परिसर येथुन पाहता येतो.

46. किल्ल्यावर सगळीकडे वनराई पसरली आहे.

47. यामुळे येथील परीसर हिरवागार आणि वातावरण कायम आल्हादायक असते.

भुदरगड किल्ला मार्ग – bhudargad fort information in marathi

48. किल्ल्यावर जाताना तुम्ही खासगी गाडी करून जाऊ शकता.

49. या व्यतिरिक्त विमान आणि रेल्वे सेवा कोल्हापूर पर्यंत आहे. तेथून पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी सुविधा केली आहे.

50. अशा या वातावरणात एकदा तरी भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

किल्ले भुदरगड स्वराज्यात केव्हा दाखल झाला ?

किल्ले भुदरगड स्वराज्यात इसवी सन 1667 मध्ये दाखल झाला.

भुदरगड तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ?

भुदरगड तालुका महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

भुदरगड किल्ला कोणी बांधला ?

भुदरगड किल्ला राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi जाणून घेतली.

भुदरगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे या मध्ये पर्यटन ठिकाणे व वैशिष्ट्ये पाहिले आहेत. भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment