Bhushi dam information in marathi – भुशी धरण हे महाराष्ट्र राज्यातील जुन्या धरणापैकी एक आहे. हे धरण साधारण इसवी सन 1860 च्या सुमारास बांधले गेले आहे. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेसाठी त्यांच्या वाफेच्या इंजिनांसाठी पाण्याचा स्रोत म्हणून या धरणाची निर्मिती केली आहे.
ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे याचे मुख्यालय होते. या कंपनीची स्थापना 1 ऑगस्ट 1849 या दिवशी झाली.
या लेखात आपण भुशी धरण माहिती मराठी – bhushi dam information in marathi जाणून घेणार आहोत.
भुशी धरण माहिती मराठी – bhushi dam information in marathi

नाव | भुशी धरण |
ठिकाण | लोणावळा , पुणे महाराष्ट्र राज्य |
मुख्यनदी | इंद्रायणी |
मालकी | मध्यरेल्वे |
जवळील तलाव | पवना तलाव |
जवळील पर्यटन स्थळे | खंडाळा |
1 भुशी धरण हे महाराष्ट्र राज्यातील लोणावळा या ठिकाणी असणाऱ्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेले एक धरण आहे.
2. मुंबई आणि पुणे या ठिकाणचे स्थानिक पर्यटक आठवड्याची सुट्टी मजेत घालवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून भेट देतात.
3. भुशी धरणाचे पाणी पावसाळ्यात पावसामुळे पायर्यावर वाहते, अश्या वेळेस हे ठिकाण पाहण्यासारखे असते.
4. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेसाठी त्यांच्या वाफेच्या इंजिनांसाठी पाण्याचा स्रोत म्हणून या धरणाची निर्मिती केली आहे.
5. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे याचे मुख्यालय होते. या कंपनीची स्थापना 1 ऑगस्ट 1849 या दिवशी झाली.
6. या धरणातून लोणावळा शहराला पाणी पुरविले जाते.
7. भुशी धरण हे लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणी आहे. मुंबईच्या आग्नेयस आणि पुण्याच्या वायव्येस सह्याद्रीच्या रांगांमध्ये हे थंड हवेचे ठिकाण आहे.
8. या थंड हवेच्या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट द्यायला येतात.
9. या ठिकाणी सरासरी तापमान 19-33 अंश सेल्सियस पर्यंत असते.
10. उन्हाळा सुरू झाला, की येथील तापमान 42 अंश डिग्री सेल्सिअस इतके होते.
11. आजूबाजूचा घाटाचा परिसर असल्याने हिवाळा ऋतू अत्यंत तीव्र जाणवतो. काही वेळेस रात्रीचे तापमान 10 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. दिवसाचे सरासरी तापमान साधारण 26 अंश डिग्री सेल्सिअस इतके असते.
12. दरवर्षी या ठिकाणी 4200 मिमी इतका पाउस पडतो. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची कमतरता भासत नाही.
13. भुशी धरण हे फिरण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
14. या ठिकाणी हिरवेगार डोंगर, पाण्याचा विलक्षण आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट असतो.
15. पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि या ठिकाणचा प्रसन्न असा नैसर्गिक वातावरण पाहून पर्यटक आकर्षित होतात.
16. पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास सक्त मनाई आहे.
17. अँम्बी व्हॅली सिटी ही सहारा परिवाराने महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळापासून साधारण 24 किमी अंतरावर बनवले आहे.
18. भुशी धरण पासून जवळच इंद्रायणी नदी आहे. हे ठिकाण देखील फिरण्यासाठी सोयीस्कर आहे. या ठिकाणी पाण्यामध्ये पोहण्यास परवानगी आहे.
कार्ले लेणी माहिती मराठी – karla caves history in marathi
19. याव्यतिरिक्त तुम्ही कार्ले लेणी ही प्राचीन बौद्ध लेणी पाहू शकता. या लेण्या दगडात कोरलेल्या आहेत. हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.
कार्ले येथील चैत्यगृह माहिती मराठी – कार्ले लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा गट आहे. त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. या लेण्या प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे.
20. महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळ लेणी आहे. तसेच लोणावळ्यात बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. या गुहेचा गाभारा हा भारतातील सर्वात मोठ्या चैत्य स्थानापैकी आहे.
21. कार्ले लेणीमध्ये एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. कारला लेण्यांमध्ये एकवीरा देवीला समर्पित मंदिरासह 15 मीटर उंच स्तंभ आहे.
लायन पॉईंट लोणावळा मराठी माहिती
22. लोणावळ्यापासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर टायगर लिप आहे हे देखील पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
23. सूर्योदय आणि सूर्यास्ताला दिसणार्या भव्य दृश्यासाठी टायगर लिप प्रसिद्ध आहे.
24. हा पॉईंट दरीमध्ये झेप घेणार्या वाघाच्या आकारासारखा आहे, म्हणून या ठिकाणाला टायगर लिप हे नाव देण्यात आले.
25. टायगर लिपवर एको पॉइंट पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.
26. भुशी धरण मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणाहून तुम्ही बसने नाहीतर खासगी गाडीने जाऊ शकता.
27. भुशी धरण या ठिकाणी येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत.
28. या ठिकाणी येण्यासाठी पुणे आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ आहे. पुणे विमानतळापासून हे अंतर सुमारे 75 किलोमीटर आहे, आणि मुंबई विमानतळापासून 93 किलोमीटर आहे.
29. भुशी धरणपासून लोणावळा रेल्वे स्टेशन 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा चिक्की साठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर छोला भाटुरा, बटर चिकन, आणि चोकोलेट फज हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. शेंगदाणे आणि गुळासह सुखामेवा यांचे मिश्रण असलेली लोणावळा चिक्की जगभरात प्रसिद्ध आहे.
30. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत. भुशी धरणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, सगळ्यात भारी काळ म्हणजे पावसाळा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भुशी धरण कोणत्या नदीवर आहे ?
भुशी धरण इंद्रायणी नदीवर आहे.
ठाणे जिल्ह्यात कोणते धरण आहे ?
ठाणे जिल्ह्यात भातसा धरण आहे.
लोणावळा व खंडाळा ही दोन थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
लोणावळा व खंडाळा ही दोन थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे.
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे.
लोणावळा पाहाण्यासारखी ठिकाणे
भुशी धरम
लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय
लायन पॉइंट
कार्ला लेणी ही भारतात सर्वात बौद्धकालीन लेणी आहे.
पवना लेक
मंकी हील
लोहगड किल्ला
कामशेठ पॅराग्लाइडिंग
एकविरा देवस्थान
हे देखील वाचा
- सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi
- पानशेत धरण माहिती – panshet dam information in marathi
- गंगापूर धरणाची मराठी माहिती – gangapur dam in marathi
- जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण भुशी धरण माहिती मराठी – bhushi dam information in marathi जाणून घेतली. त्याचबरोबर या लेखात आपण कार्ले लेणी माहिती मराठी पाहिली आहे.
लोणावळ्यात पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. तसेच येथील हिरव्यागार अशा निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लांबून येतात.
भुशी धरण माहिती मराठी – bhushi dam information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.