जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra

By | November 5, 2022

Biggest dam in maharashtra – जायकवाडी धरण विषयी माहिती असेलच, हे धरण आशिया आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. या धरणाची लांबी 60 किमी आणि रुंदी 10 किमी आहे. एकदा जर हे धरण संपूर्ण भरले, की दोन वर्षे शेतीच्या पाण्याची सोय होते आणि चार वर्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. त्यामुळेच या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र असे म्हणतात.

जायकवाडी धरण विषयी माहिती - biggest dam in maharashtra
जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra

या लेखात आपण जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra जाणून घेणार आहोत.

धरण म्हणजे काय मराठी माहिती ?

पाऊस व नद्यातील पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी पाणी अडवले या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी केला. हे पाणी अडवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने बांधकाम केले जाते त्याला धरण असे म्हणतात. या धरणात अडवलेल्या पाण्यातून वीज निर्मिती देखील केले जाते. धरणाचे पाणी तेथील आजूबाजूच्या परिसराचे तहान भागवण्याचे काम करते. तसेच औद्योगिक क्षेत्रात विकास करण्याचे काम धरण करते.

जायकवाडी धरणाचा इतिहास

गोदावरी नदीवर जायवाडीसाठी कल्पना हैदराबादच्या राज्याने मांडले होते. यासाठी बीड जिल्ह्यातील जायकवाडी गावाजवळ 2,147 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण बांधणार होते. त्यामुळे या प्रकल्पाचे नाव जायकवाडी प्रकल्प असे पडले.

Biggest dam in maharashtra
Image by – Tv9marathi

या प्रकल्पाचे बांधकाम इसवी सन 1965 मध्ये सुरू झाले आणि धरणाचे उद्घाटन इसवी सन 1976 मध्ये झाले.

जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra

धरणाचे नावजायकवाडी धरण (नाथसागर)
स्थानपैठण, औरंगाबाद महाराष्ट्र
लांबी 9997.67 मीटर
उंची41.3 मीटर
पाणीसाठा क्षमता2170 दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ350 वर्ग कि.मी.
जायकवाडी धरण विषयी माहिती

1. जायकवाडी धरणाला नाथसागर असे देखील म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणजे जायकवाडी धरण.

2. या धरणावर महाराष्ट्र राज्यातील 5 जिल्हे अवलंबून आहेत. ते पुढीलप्राणे – औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड

3. बीड जिल्ह्यातील Parali Thermal Power Plant जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

4. जायकवाडी धरण परिसरातील प्राकृतिक रचना – जायकवाडी प्रकल्पाची बांधकाम भराव मातीचे असून बांधकाम दगडी आहे. याची उंची 41.3 मीटर आणि लांबी 9997.67 मीटर इतकी आहे.

5. जायकवाडी प्रकल्पाचे क्षेत्रफळ 350 वर्ग कि.मी. असून पाण्याची क्षमता 2909 दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी 2170 दशलक्ष घनमीटर इतके पाणी वापरण्यायोग्य आहे.

6. जायकवाडी धरणाला दोन कालवे आहेत. यातील दुसऱ्या कालव्याची लांबी 208 किलोमीटर आहे. या कालव्यातून औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत शेतीसाठी पाणी सोडलं जातं.

7. जायकवाडी धरणातून अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो.

8. जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन शहराच्या पाण्याची गरज भागवते. अश्या छोट्या-मोठ्या 400 गावाची पाण्याचा प्रश्न हेच धरण भागवते.

9. मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जायकवाडी धरण खूप मोठी भूमिका बजावतो कारण या धरणावर वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना या सारख्या मोठ्या औद्योगिक वसाहती अवलंबून आहे.

10. जायकवाडी धरणाचा योजना सर्वात पहिले जुन्या हैदराबाद राज्याने तयार केली होती.

जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra

11. या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आढळतात ज्यामध्ये बऱ्यासच्या प्रजाती स्तलांतरित आहेत.

12. जायकवाडी जलाशयामधे 30 विविध आकाराचे बेट तयार केले आहेत.

13. या ठिकाणी लावलेले झाडे अनेक पक्ष्यांना येण्यासाठी साद घालत असतात. त्यामुळे येथे स्थलांतरित पक्षांचे प्रमाण जास्त असल्याचे समजते.

14. या ठिकाणी साधारणतः 200 पक्ष्याचा प्रजातीचा किलबिलाट आहे, यातील बहुतांश प्रजाती या स्थलांतरीत आलेले असतात.

15. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.

हे देखील वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

जायकवाडी धरण कोठे आहे ?

जायकवाडी धरण औरंगाबादमधील पैठण या ठिकाणी आहे.

जायकवाडी धरण पाणीपुरवठा क्षमता किती आहे ?

जायकवाडी धरण पाणीपुरवठा क्षमता 2170 दशलक्ष घनमीटर आहे.

नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

नाथसागर धरण गोदावरी नदीवर आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी आहे.

जायकवाडी धरण किती दरवाजे आहेत ?

जायकवाडी धरणात 27 दरवाजे आहे.

भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?

हिराकुंड धरण

जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?

थ्री जॉर्ज डॅम

महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते ?

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण आहे.

महाराष्ट्रात एकूण किती धरणे आहेत ?

महाराष्ट्रात एकूण 9 हजार 400 धरणे आहेत.

कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे.

मांजरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

मांजरा धरण बीड जिल्ह्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *