जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? (biodiversity information in marathi)

Biodiversity information in marathi – पर्यावरणात असणाऱ्या सजीवांच्या विविध प्रजातीना जैवविविधता असे म्हणतात. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. जैवविविधता मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधता गरजेची असते.

आपल्या सभोवताली आपण अनेक सजीव सृष्टी पाहत असतो. ही सजीव सृष्टी नकळत पर्यावरणाला अनुकूल असे वातावरण निर्माण करत असते.

या लेखातून आपण जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? (biodiversity information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जैवविविधता म्हणजे काय (biodiversity meaning in marathi)

biodiversity information in marathi
Biodiversity information in marathi
विषय जैवविविधता
प्रकारजैविक विविधता
उपयोग पर्यावरण संतुलित राखण्यास मदत

Biodiversity information in marathi – जैवविविधता हा शब्द जैविक + विविधता या दोन्हींचा संयुग आहे. जैविक म्हणजे जिवंत असणारे आणि विविधता म्हणजे वेगवेगळे प्रकार. पृथ्वीवर अनेक सजीव (प्राणी, पक्षी, कीटक, भूचर, उभयचर, जलचर) आहेत. यामुळेच तर पृथ्वीला सजीवसृष्टी म्हणून ओळखले जाते.

पृथ्वी इतर ग्रहापेक्षा वेगळी असण्याचे कारण म्हणजे – पृथ्वीवर पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते. अशी बरीच कारणं आहेत, ज्यामुळे पृथ्वीवर संपूर्ण विश्वात वेगळेपण आढळते.

जैवविविधतेचे प्रकार माहिती मराठी (biodiversity types in marathi)

जैवविविधतेची व्याप्ती खूप मोठी आहे. यात सूक्ष्म किटक ते महाकाय प्राणी, वृक्ष, पक्षी अशा विविध सजीवांचा समावेश होतो. जैविक घटकाचे तीन प्रकारात (3 type of biodiversity) वर्गीकरण केले जाते. जैवविविधता सजीवांची शरीर रचना, आकार, अवयव, प्रजनन, आहार, गुणसूत्र अशा विविध बाबतीत आढळते.

#1 जनुकीय विविधता (genetic biodiversity in marathi)

जनुके हे सजीवांमधील आनुवांशिकतेचे एकक आहे. जनुकांमध्ये सजीव पेशी बांधण्याची तसेच जगवण्यासाठीची सर्व माहिती साठवलेली असते. या जनुकीय विविधता लक्षात घेऊन विविध प्रजातीचे वर्गीकरण करण्यात येते. या प्रकारात सजीवांच्या एखादया जातीच्या जनुकांतील विविधतेचा अभ्यास केला जातो.

उदाहरणार्थ. तांदूळ हे एक धान्य वनस्पती आहे. तांदुळाच्या हजारो जाती आहेत. पण तांदळाचे मूळ दोन जातीत आहे. तांदळाची पहिली जात ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका आणि दुसरी ओरिजा सॅटिव्हा इंडिका आहे.

यामध्ये रोपांची उंची, लोंब्यांची लांबी, एकेका लोंब्यातील दाण्यांची संख्या, दाण्यांचा आकार, वास, चव, उत्पादन हाती येण्यासाठी लागणारा कालावधी, त्या पिकाची नैसर्गिक कीडप्रतिकारक्षमता अशा गोष्टीत विविधता आढळते.

#2 जाती विविधता (species biodiversity in marathi)

या प्रकारात एखादया विशिष्ट प्रदेशात किंवा सजीवांच्या विशिष्ट गटात आढळणारी जैवविविधता अभ्यासली जाते. उष्ण प्रदेशात सजीवांच्या जातीतील विविधता ही थंड प्रदेशाच्या तुलनेत अधिक असते.

उदाहरणार्थ. कोस्टा रिका या लहान व उष्ण हवामान असलेल्या देशात पक्ष्यांच्या जातींची संख्या सुमारे 830 आहे. तर कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या क्षेत्रफळाने मोठया आणि थंड असलेल्या देशात कमी आहे.

#3 परिसंस्था विविधता (ecosystem diversity in marathi)

जैविक आणि अजैविक घटक एकमेकांवर अवलंबून राहतात, यालाच परिसंस्था म्हणतात. पृथ्वीवरील सर्वच घटक एकमेकांवर अवलंबून असतात. परिसंस्थेच्या विविधतेमुळे पृथ्वी संतुलित राहण्यास मदत होते.

उदाहरणार्थ. आपल्याला जगण्यास ऑक्सिजन हा वायू लागतो आणि वनस्पती अन्न बनविण्यासाठी, जगण्यासाठी कार्बन डायऑक्साइड हा वायू लागतो. या उदाहरणात मानवास लागणारा प्राणवायू वनस्पती मानवास पुरवितात. तर मानव श्वासोच्छ्वास करताना कार्बन डायऑक्साइड हवेत सोडतो. अशा प्रकारे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत.

जैवविविधता महत्व मराठी (biodiversity importance in marathi)

biodiversity in marathi
Biodiversity information in marathi

पर्यावरणात समतोल राखण्यासाठी जैवविविधता महत्वाची आहे. परिसंस्था ही एकमेकावर अवलंबून असते, हे आपण वरील उदाहरणाद्वारे समजून घेतले आहे. विविध प्राणी आणि पक्षी आपला निवारा म्हणून वृक्षावर अवलंबून आहेत. यामध्ये मानवदेखील झाडावर अवलंबून असतो.

हा लेख जरूर वाचाझाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi)

जैविक विविधतेचे महत्व समजून घेण्यासाठी आपण माणसाचे उदाहरण घेऊ आणि त्यातून जैविक विविधतेचे महत्व जाणून घेऊ.

माणसाचा जन्म होतो तेव्हापासून किंबहुना त्या अगोदर पासून तो प्राणवायू म्हणजेच ऑक्सीजन वायुवर अवलंबून असतो. वायू हा निर्जीव घटक आहे. मानव अन्न म्हणून विविध फळे, भाजीपाला, पिके, दूध, अंडी, मास यांवर अवलंबून असतो. हे सर्व मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या सजीवांची आवश्यकता असते.

मानव राहण्यासाठी निवारा म्हणून घर बांधतो, घर बांधताना मुख्य म्हणजे जमीनीची गरज असते त्यासोबतच वीट, सिमेंट, पाणी, पत्रे, लोखंड, दरवाजे, खिडक्या, केबल, फारशी अश्या अनेक गोष्टीची गरज लागते.

याचप्रमाणे वस्त्र बनविण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या निसर्गातूनच उपलब्ध होतात. यासाठी विशिष्ट वनस्पतीचे पीक घ्यावे लागते. तसेच निसर्गातून मिळणाऱ्या खनिजांपासून आणि प्राण्यांपासून कापडासाठी लागणारे धागे तयार केले जातात.

चाकाचा शोध लागल्यापासून मानवी जीवन गतिमान झाले आहे, मानवाची उत्क्रांती अभ्यासली तर असे लक्षात येईल की, मानवाने शिकारी अवस्थेपासून आजपर्यंत केलेली प्रगती ही नैसर्गिक स्रोतांचा वापर करून केली आहे.

मानव जसा आपला उदरनिरवाहासाठी पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटक अवलंबून असतो, तसेच इतर घटक देखील एकमेकांवर अवलंबून असतात. सजीवांच्या जन्म आणि मृत्यूनंतर शरीराचे विघटन होईपर्यंत विविध सजीव-निर्जीव घटकची गरज भासते.

हा लेख जरूर वाचापर्यावरण नीतीची पंचवीस सूत्रे माहिती मराठी (25 Principles of Environmental Policy in marathi)

जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? (why it is important to conserve biodiversity)

save earth in marathi
Biodiversity information in marathi

वरील परिच्छेदात आपण जैवविविधता म्हणजे काय ? त्याचे प्रकार आणि महत्व जाणून घेतले आहे. सजीव आणि निर्जीव घटक पर्यावरणाशी एकरूप होऊन एकमेकांची निकट कशी भागवतात, याविषयी आपण माहिती पाहीली आहे.

जैवविविधता जपणे आवश्यक आहे कारण (it is important to conserve biodiversity because) –

 • विविध वनस्पतींचे विशिष्ट गुणधर्म असतात. यात काही अन्न म्हणून तर काही निवारा बनून तर कुणी औषध बनून पर्यावरणातील घटकांना मदत करतात. यातील बहुतांश वनस्पती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर काही नामशेष झाल्या आहेत. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडतो आणि संबंधित घटकावर त्याचा परिणाम जाणवतो.
 • विविध प्रकारची प्राणी आपल्या परिसंस्थेत आहेत. यातील बहुतांश प्राणी शाकाहारी तर काही मांसाहारी आहेत. हे प्राणी आपापली भूक मिटवण्यासाठी एकमेकावर अवलंबून आहेत. यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. भक्ष आणि भक्षक यातील एक पक्ष नाहीसा झाला, तर दुसऱ्या पक्षास उपासमारीची वेळ येईल.
 • पर्यावरणात विविध पक्षी आढळतात. यापैकी बहुतांश पक्षी फुले आणि फळे यावर आपला उदरनिर्वाह चालवत असतात. फुलातील रस सेवन करत असताना, पक्षाला पायाला फुलातील बीज चिटकतात असे करत असताना, फुलाचे फलन होते.
 • मृत्यू झालेल्या प्राण्यांच्या शरीराचे विघटन सूक्ष्म कीटक करतात. शरीराचे विघटन होऊन ते मातीत मिसळून जातात. परिणामी जन्म आणि मृत्यू यानंतर प्राण्यांच्या शरीराचा भार पृथ्वीवर राहत नाही.
 • झाडांचे संवर्धन व्यवस्थित झाले तरच ऊन, वारा आणि पाऊस याचे संतुलन राहील. पाऊस झाला तरच पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी उपलब्ध होईल. तसेच ऊन पडले तरच बाष्पीभवन होऊन ढग बनेल आणि त्यातून पाऊस पडेल.

अशा प्रकारे पर्यावरणातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतात. एकमेकांची निकट भागवताना पर्यावरणात अनेक बदल होतात. हे बदल होत असताना, पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

जैवविविधता ऱ्हासाची कारणे मराठी माहिती (Causes of biodiversity loss in marathi)

जैवविविधता ऱ्हासाची कारणे अनेक आहेत. याचे विभाजन केले तर लक्षात येईल की, नैसर्गिक आणि मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात येऊ लागली आहे. पर्यावरणाचे होणारे प्रदुषण आणि बदलते वातावरण हे जैवविविधतेचे नुकसान करत आहेत.

शेतीसाठी रासायनिक खते आणि विषारी द्रव्याचा वापर वाढल्याने अनेक सुक्ष कीटक नामशेष होत आहेत. मातीची गुणवत्ता राखण्यासाठी या कीटकांचा उपयोग होत असतो.

सध्याच्या परिस्थितीत वाढती लोकसंख्या पर्यावरणास घातक बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी गरजा आणि आकांशा वाढत चालल्या आहेत. या गरजा वाढत असताना नैसर्गिक साधनसंपत्तीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. मानवी वस्तीसाठी जंगलतोड होत आहे. यामुळे मानव आणि जंगली प्राणी यांचा संबंध जवळ येत आहे. यातूनच जंगली प्राण्यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे काही जंगली प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

खाणकाम करीत असताना खोलवर केली जाणारी खोदाई जैवविविधतेस धोकादायक ठरते. खाणकामातून खनिजसंपत्ती सोबतच कीटकांचे अस्तित्व संपुष्टात येत आहेत.

नदी, तलाव आणि समुद अश्या पाण्याच्या स्रोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करण्यात येते. यासोबतच खेकडे, कासव आणि अन्य जीवांची शिकार केली जाते. यातून जलचर प्राण्यांची संख्या कमी होत आहे.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानव चरबीयुक्त प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी याची अमर्यादित प्रमाणात विक्री करतो. यामुळे त्या सजीवांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे.

हा लेख जरूर वाचापर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती मराठी (environment pollution types in marathi)

जैवविविधता वाचवण्याचे उपाय (how to save biodiversity in marathi)

 • स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही पक्षी किंवा प्राणी यांची शिकार करून विक्री करू नये.
 • खनिजतेल आणि खनिजे यांचा वापर प्रमाणात करावा.
 • जंगलतोड करू नये, उलट शक्य होईल तितके वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे.
 • वन्य प्राणी आणि पक्षी यांचे संवर्धन करण्यासाठी अभयारण्ये उभारावीत.
 • पाण्याचे स्रोत काळजीपूर्वक वापरले पाहिजे.
 • नको असलेल्या वस्तूचे योग्य विघटन केले पाहिजे. वस्तू जाळल्याने वायू प्रदूषण होते.
 • पृथ्वीवर तापमान नियंत्रित राखण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करावी.
 • शेतीसाठी रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरताना योग्य प्रमाणात वापरावी.
 • नैसर्गिक स्रोत काळजीपूर्वक वापरले पाहिजे, विनाकारण या स्रोतांवर ताण येईल असे कृत्य करू नये.

जैवविविधता निष्कर्ष

या लेखातून आपण जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? (biodiversity information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. यात आपण जैवविविधता म्हणजे काय, जैवविविधतेचे प्रकार आणि महत्त्व, जैवविविधता वाचवण्याचे उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ? हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? (biodiversity information in marathi) ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

जैवविविधता या शब्दाचे जनक कोण आहेत ?

जैवविविधता या शब्दाचे जनक वाल्टर जे रोशन (Walter G. Rosen) हे आहेत.

भारतामध्ये किती जैवविविधता क्षेत्र आहे ?

भारतामध्ये हिमालय, पश्चिम घाट, इंडो-म्यानमार (अंदमार आणि निकोबार) हे जैवविविधतेचे क्षेत्र आहे.

जगाच्या तुलनेत भारतातील जैवविविधतेचे प्रमाण किती टक्के आहे ?

जगाच्या तुलनेत भारतातील जैवविविधतेचे प्रमाण सात ते आठ टक्के इतके आहे.

जैविक विविधतेचा ऱ्हास व नाश टाळण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली आहे ?

जैविक विविधतेचा ऱ्हास व नाश टाळण्यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (national biodiversity authority nba) ही संस्था स्थापन केली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते ?

महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते.