महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम दिशेला असून यामध्ये निसर्गमय सौंदर्य, मन मोहून टाकणारी जैवविविधता आणि देवस्थान, गड किल्ले अशी विविध प्रकारचे पर्यटन स्थळे आहेत.
जर तुम्ही निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहू इच्छित असाल तर निसर्ग महाराष्ट्र राज्याला भेट द्या. या ठिकाणी तुम्ही अनेक ऐतिहासिक किल्ले, घाट, थंड हवेचे ठिकाण, प्रसन्न धबधबे, समुद्रकिनारा, अभयारण्ये अशी बरेच ठिकाणाला भेट देता येईल.
महराष्ट्रातील अनेक ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात हजारो प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. यामध्ये स्थानिक, विदेशी आणि स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होतो.
आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य माहिती मराठी (bird sanctuary in maharashtra) जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य माहिती मराठी (Bird Sanctuary In Maharashtra)

पक्षी अभयारण्य | जिल्हा |
---|---|
कर्नाळा पक्षी अभयारण्य | रायगड |
जायकवाडी पक्षी अभयारण्य | पैठण |
मायानी पक्षी अभयारण्य | सातारा |
ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य | सोलापूर |
नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य | नाशिक |
भिगवण पक्षी अभयारण्य | पुणे |
डॉ. सलीम अली जैवविविधता उद्यान | पुणे |
पक्षी अभयारण्य भाल | ठाणे |
कर्नाळा पक्षी अभयारण्य (karnala bird sanctuary)
karnala bird sanctuary information in marathi – कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आहे. या ठिकाणी 150 हून अधिक पक्षांच्या प्रजाती पाहायला मिळतात. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील पहिले अभयारण्य आहे. ठिकाणी पक्षी याव्यतिरिक्त प्राणी आणि वेगवेगळ्या जातीचे वृक्ष देखील आढळतात.
ग्रे-फ्रंटेड ग्रीन कबूतर, निलगिरी वुड कबूतर आणि मलबार ग्रे हॉर्नबिल यांसारख्या प्रजातींशी जवळचा संवाद साधायचा असल्यास येण्यासाठी कर्नाळा अभयारण्य सर्वोत्तम ठिकाण आहे.
याव्यतिरिक्त येथे मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी पाहायला मिळतात.
पक्षी अभयारण्य नंतर पर्यटकांसाठी इथले मुख्य आकर्षण म्हणजे समुद्रसपाटीपासून 445 मीटर उंचीवर असणारा कर्नाळा किल्ला आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्य (Jayakwadi Bird Sanctuary)
Jayakwadi Bird Sanctuary information in marathi – जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण येथील नाथसागर (जायकवाडी धरण) या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पाणपक्ष्यांचे सर्वांत मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडी अभयारण्य ओळखले जाते.
या ठिकाणी 200 स्थानिक आणि 70 स्थलांतरीत विविध जातींचे पक्षी पाहायला मिळतात. यामध्ये ऑस्ट्रिया, सायबीरिया, नेपाळ, रशिया, चीन, तिबेट आणि दक्षिण आफ्रिका अशा विविध ठिकाणाहून पक्षी जायकवाडी धरणावर येत असतात.
अधिक माहितीसाठी हा लेख जरूर वाचा – जायकवाडी धरण विषयी माहिती मराठी
मायानी पक्षी अभयारण्य (Mayani Bird Sanctuary)
Mayani Bird Sanctuary information in marathi – मायानी पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यात आहे. या ठिकाणी अनेक पाणपक्षी आणि स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. रोहित पक्ष्यांचे थवे हे विशेष आकर्षण आहे.
याव्यतिरिक्त चक्रवाक, पट्टकदंब, हळद-कुंकू ही बदकेही आढळतात. कापशी घार, गरुड, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी पाहायला मिळतात. नदी सूर्य, खंड्या, कवड्या,राखी बगळा, वंचक, चित्रबलाक असे पाणपक्षी पाहायला मिळतात.
मायानी पक्षी अभयारण्य या ठिकाणाहून 100 किलोमिटर अंतरावर महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे यापैकी कास पठार आहे.
ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य (Great Indian Bustard Sanctuary)
Great Indian Bustard Sanctuary information in marathi – हे पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचे जवाहरलाल नेहरू बस्टर्ड अभयारण्य म्हणून या अभयारण्यास ओळखले जाते. महान भारतीय बस्टर्ड प्रजातींचे जतन करण्यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय बस्टर्ड पक्ष्यांना माळढोक पक्षी म्हणून ओळखले जाते.
पूर्वीच्या काळी बस्टर्ड हा महाराष्ट्रातील कोरड्या जिल्ह्यांमध्ये एक सामान्य पक्षी होता. या पक्ष्याचे शरीर आडवे आणि लांब अनवाणी पाय असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा उडणाऱ्या पक्ष्यांपैकी सर्वात वजनदार पक्षी म्हणून ओळखला जातो.
जर तुम्हाला महान भारतीय बस्टर्ड पहायचे असेल, तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य (Nandur Madhmeshwar Bird Sanctuary in marathi)
Nandur Madhmeshwar Bird Sanctuary in maharashtra – हे पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील हजारो सुंदर आणि स्थलांतरित पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी 230 पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आढळून येतात, त्यापैकी 80 प्रजाती स्थलांतरित आहेत.
यामध्ये व्हाईट सारस, ग्लॉसी इबिस, स्पूनबिल्स, फ्लेमिंगो, हंस ब्राह्मणी बदक, पिनटेल, मालार्ड, विजन, गार्जेनरी शोवेलर, पोचर्ड्स, क्रेन्स शँक्स, कर्ले, प्रेटिनकोल वॅगटेल, गॉडविट्स, विणकर इत्यादी स्थलांतरित पक्षी आहेत.
ब्लॅक आयबिस, स्पॉट बिल्स, टील्स, लिटल ग्रेब, कॉर्मोरंट्स, एग्रेट्स, हेरन्स, सारस, पतंग, गिधाडे, बझर्ड्स, हॅरियर्स, ऑस्प्रे, लावे, पार्ट्रीजेस, ईगल, वॉटर हेन्स, सँड पाईप, स्विफ्ट्स, ग्रे हॉर्नबिल असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.
भिगवण पक्षी अभयारण्य (bhigwan bird sanctuary)
bhigwan bird sanctuary information in marathi – भिगवण पक्षी अभयारण्य पुणे (bhigwan bird sanctuary pune) जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून भिगवण ओळखले जाते. या ठिकाणापासून 53 किलोमीटर अंतरावर उजनी धरण आहे. या धरणाजवळ रोहित पक्षी अभयारण्य पाहायला मिळते.
भिगवण पक्षी अभयारण्यात मानवनिर्मित तलाव आहे, ज्यामुळे हे जलचर पक्ष्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे, या तलावाच्या किनाऱ्यावर फ्लेमिंगोची प्रमुख प्रजाती आढळून येते. त्याचबरोबर बरेच स्थानिक पक्षी देखील या ठिकाणी आढळतात.
डॉ. सलीम अली जैवविविधता उद्यान (Dr. Salim Ali Biodiversity Park bird sanctuary in maharashtra)
Dr. Salim Ali Biodiversity Park information in marathi – डॉ. सलीम अली जैवविविधता हे उद्यान पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरूमानतात (bird man of India).
झाडांवर किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात.
पक्षी अभयारण्य भाल (Bird Sanctuary Bhal in marathi)
Bird Sanctuary Bhal bird sanctuary in maharashtra – भाल हे पक्षी अभयारण्य ठाणे या ठिकाणी आहे. हे अभयारण्य देशातील सर्वात लोकप्रिय पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
भाल हे पक्षी अभयारण्य गावाच्या परिसरापासून वेगळे आहे. येथील हवामान आणि नैसर्गिक पायाभूत सुविधा छान आहेत. या भागात अनेक पक्षी भेट देतात .पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी हे सर्वोत्तम क्षेत्र आहे. तसेच पक्ष्यांच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम हवामान क्षेत्र आणि नैसर्गिक रचना पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य माहिती – bird sanctuary in maharashtra मराठीमध्ये जाणून घेतली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पक्षी अभयारण्ये – bird sanctuary in maharashtra information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अभयारण्य म्हणजे काय ?
एखाद्या पक्ष्याचे, प्राण्यांचे अथवा वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी कायदेशीर रित्या उद्यान बनवण्यात येते. याठिकाणी प्राणी पक्षी या किंवा वनस्पती यांचे अस्तित्व नष्ट होणार नाही याची काळजी घेतली जाते या ठिकाणास अभयारण्य असे म्हणतात. अभयारण्या चा अर्थ अभय नसणारे आरण्य म्हणजेच जंगल.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य माळढोक पक्षी अभयारण्य हे आहे.
पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
पलामु अभयारण्य झारखंड या राज्यात आहे.
महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते आहे ?
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. या अभयारण्यास दाजीपूर अभयारण्य म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे.