वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Birthday Poems In Marathi – नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणापैकी एक क्षण म्हणजे जन्मदिवसाचा सोहळा. जर आपल्या प्रेमाच्या किंवा आवडीच्या व्यक्तीचा वाढदिवस असला, तर त्याला शुभेच्छा देखील खासच द्यायला हव्यात.

मागील लेखात आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाहिले होते. आज मी तुमच्यासोबत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कवितांचा संग्रह (Birthday Poems In Marathi) प्रसिद्ध करत आहे.

तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकांना, आई वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या कवितांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता (Birthday Poems In Marathi)

Birthday Poems In Marathi

क्षण रोज सुखाचे यावे,
पाहून हसरा चेहरा तुझा हृदयी प्रेम दाटावे,
कधी न यावे अपयश आयुष्यात तुझ्या,
तू नेहमी यशाचे शिखर गाठावे,
वाढदिवसानिमित्त देतो तुला शुभेच्छा,
तुला निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे…

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता 👇👇

आनंदाच्या क्षणी आनंदी गाणे गावे,
प्रेमाच्या पाऊसात तू चिंब भिजावे,
वाढदिवसानिमित्त देतो तुला गोड शुभेच्छा, तू नेहमी सुखी रहावे.

आजचा शुभ दिवस ठरावी तुमच्यासाठी एक गोड आठवण,
व्हावी हृदयात या शुभक्षणांची साठवण,
आपल्या नात्यांमधील गोडी कायम राहावी साखरेपरी,
कधीही न संपावी आम्ही दिलेली प्रेमाची शिदोरी,
व्हावीत तुझी सर्व स्वप्ने साकार,
मिळू दे तुझ्या जीवनाला एक नवा आकार.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

सूर्य उगवला प्रकाश देण्यासाठी,
फुले बहरली सुगंध देण्यासाठी,
अन् तू माझ्या आयुष्यात आला फक्त आनंद देण्यासाठी..
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

– भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Related – लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

दिवसामागून दिवस उलगडले, ऋतु मागून ऋतु,
अपार कष्ट तुम्ही घेतले,
जीवनभर जबाबदारीचे ओझे वाहिले,
तुमच्या ज्ञानाने सर्वजण अनुभव समृद्ध झाले,
तुमच्या सहवासात सर्वजण सुखी राहिले,
आज तुमचा वाढदिवस आहे,
हाच आमच्यासाठी आनंदाचा सण आहे.
वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

तुझ जीवन उमलत्या फुलांसारख फुलून जाव,
सूर्य बनून तू सर्वांना प्रकाश देत रहाव,
अलौकिक असे कार्य तुझ्या हातून घडाव,
निराधार लोकांना तू आपलस कराव,
तुझ्या सहवासाने सर्वांच कल्याण व्हाव.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
सुंदर आयुष्य जगावे हीच मनी सदिच्छा…

तिमिरात असते साथ तुमची,
आनंदात तुमचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम तुमचा सल्ला असतो.
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎂

जन्म एका टिंबासारखा असतो,
जीवन एका कवितेतील ओळीसारखं असतं,
प्रेम एखाद्या त्रिकोनासारख असतं,
पण मैत्री एका वर्तुळासारखी असते,
ज्याची ना सुरुवात होते, ना शेवट..
अगदी अशीच आपली मैत्री आहे.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…

मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो..
ज्यांना कधी ओळखतही नसतो..
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो….

– वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मित्रासाठी

मैत्री एक सुंदर धागा असतो,
मैत्री एक सुंदर किनारा असतो,
मैत्री एक सुंदर शहारा असतो,
मैत्री एक सुंदर मोरपिसारा असतो..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

माझ्या आयुष्याची सावली ❣
आई माझी विठू माऊली
कष्ट केलेस अतोनात
भरविण्या मला तू घास 🔥
केलीस मजवर तु माया
जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या आयुष्याची सावली 🔥
आई माझी विठू माऊली
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुगंधाविना फुलांना किंमत नाही
प्रकाशाविना ताऱ्यांना किंमत नाही
आणि तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही
डिअर बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

– वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बायको साठी

आपण कितीही दूर असलो तरी आपल्या नात्यात कधीही न यावा दुरावा,
कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या भेटीचा नेहमी योग यावा,
वाढदिवसा दिवशी देतो आपणास शुभेच्छा
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जावा

जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
ज्याच्याजवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात
अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर….

– मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर मराठी कविता 👇

कधी चुकला रस्ता माझा तर तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला ☺चांगल्या आणि वाईट व्यक्तीं मधला फरक तुम्ही मला दाखविला..

येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक दिवस ☺आनंदाने आणि उत्साहाने उजळून निघावा,

आरोग्य निरोगी असावे यश भरपूर मिळावे 🎁हीच ईश्वरचरणी प्रार्थना

– वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता नवरा साठी

Related – वाढदिवस कसा साजरा करावा?

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता (Birthday Poems In Marathi) पहिल्या. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या कवितांचा संग्रह आवडला असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment