ब्रह्म मुहूर्त मराठी माहिती (brahma muhurta information in marathi)

By | December 3, 2022

Brahma muhurta information in marathi – ब्रह्ममुहूर्त असताना झोपेतून जागे व्हावे, असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल. पण हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय असतं, याबद्दल माहिती आपल्यातील थोड्याच लोकांना आहे.

वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।

ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥

वरील ओळीचा अर्थ असा आहे की, ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून जागे होणाऱ्या व्यक्तीला सुंदरता आणि स्वास्थ्य लाभते. त्याचबरोबर लक्ष्मी आणि बुद्धी यांची प्राप्ती होते. आपले शरीर कमळाप्रमाणे सुंदर होत राहते.

या लेखात आपण ब्रह्ममुहूर्त मराठी माहिती – brahma muhurta information in marathi याविषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत. जीवनात यशस्वी होण्यासाठी (brahma muhurta for success) हा मुहूर्त खूप महत्वाचा ठरत असतो.

हा लेख जरूर वाचा >> केळी खाण्याचे फायदे माहिती मराठी – banana benefits in marathi

Table of Contents

ब्रह्ममुहूर्त विषयी मराठी माहिती – brahma muhurta information in marathi

brahma muhurta information in marathi
ब्रह्म मुहूर्त मराठी माहिती

आपल्या सर्वांना माहितीच आहे की एका दिवसात साधारण 24 तास असतात, म्हणजेच 1440 मिनिट. या चोवीस तासांत 30 मुहूर्त असतात. प्रत्येक मुहूर्त 48 मिनिटाचा असतो.

सकाळी सूर्योदयाच्या आधीच्या प्रहरात दोन मुहूर्त असतात, यातील पहिल्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त (brahma muhurta time) असे म्हणतात. हा मुहूर्त साधारणपणे पहाटे चार वाजून चोवीस मिनिटे आणि पाच वाजून बारा मिनिटात असतो.

या नंतर विष्णूची वेळ सुरू होते, म्हणजे पहाट संपवून सकाळ उजाडते पण सुरू दिसत नाही. या मुहूर्तात काम करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद ठरते.

ब्रह्ममुहूर्त फायदे माहिती मराठी – brahma muhurta benefits in marathi

आपल्या धर्मग्रंथांमध्ये सकाळी लवकर उठावे असा नियम आहे. हा नियम मिनी पाळल्याने आपले शरीर निरोगी बनते. सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत पर्यावरणात आपल्या शरीराच्या चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात आढळतो.

वैज्ञानिक संशोधनानुसार पहाटे चार ते पाचच्या दरम्यान ऑक्सिजनचे 41 टक्के प्रमाण असते आणि चार टक्के कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण असते. हेच प्रमाण सूर्योदयानंतर जास्त होते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आणि याची उपलब्धता पहाटे ब्रह्म मुहूर्तावर असते. त्यामुळे सकाळी जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने आपले शरीर स्वस्थ राहते.

Brahma muhurta for success in marathi – असे म्हणतात की ब्रह्म मुहूर्तावर उठणारा व्यक्ती यशस्वी आणि सुखीसमृद्ध होतो. कारण लवकर झोपेतून उठल्याने आपल्याला इतरांच्या तुलनेने जास्त वेळ मिळतो. हा वेळ आपण दिवसभरात कोणकोणती कामे करावयाची आहेत, याची मांडणी करण्यासाठी करू शकतो.

याव्यतिरिक्त सकाळी लवकर उठून आपण व्यायम करून आपले शरीर सुदृढ बनवू शकतो. यामुळे आपण जीवनात यशस्वी होतो. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभून जीवन सुखी बनते.

हा लेख जरूर वाचा >> आरोग्यासाठी पाण्याचे उपयोग मराठी माहिती – water benefits information in marathi

ब्रह्म मुहूर्त काही खास माहिती मराठी

पवनपुत्र हनुमान यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये अशोक वाटिका मध्ये पोहचले. या ठिकाणी सीताला रावणाने कैद केले होते. हनुमान या ठिकाणी गेल्यावर वेदाचे पठण केले आणि सीतेला ऐकवले.

ब्रह्म मुहूर्तामध्ये निसर्गात चैतन्य निर्माण होते. हा मुहूर्त आपल्याला उठा आणि जागे व्हा, असा उपदेश करतो. यावेळी प्राणीपक्षी जागे होतात, फुले बहरतात. या वेळेस सर्वजण आपल्या सुखी जीवनाची सर्वात करतात.

संपूर्ण वातावरण सकारात्मक उर्जेने भरलेले असते आणि सकाळी उठल्यावर ही उर्जा आपल्याला ताजे टवटवीत करते. त्याचबरोबर आपल्या शरीरात उत्साह आणि ऊर्जा येतो.

Brahma muhurta for study – पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो, असेदेखील म्हणतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने सकाळी लवकर उठावे आणि अभ्यास करावा.

Brahma muhurta mantras in marathi – मंत्राचे उच्चारण

ॐ कराग्रे वसते वसते लक्ष्मीः कर मध्ये सरस्वती।कर मूलेः तू गोविंदाः प्रभाते करदर्शनम्।।

वरील मंत्राचा पहाटे चार वाजता उच्चार केल्याने, आपले मन प्रसन्न होते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण ब्रह्ममुहूर्त विषयी मराठी माहिती – brahma muhurta information in marathi मराठीमध्ये जाणून घेतली आहे.

ब्रह्म मुहूर्त बद्दल मराठी माहिती -brahma muhurta information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ब्रह्म मुहूर्त वेळ केव्हा असते ?

पहाटे चार ते पाच ची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते.

ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय असते ?

ब्रह्ममुहूर्त एक वेळ आहे, जी सूर्योदयाच्या एक तास 36 मिनिटे आधी सुरू होते आणि सूर्योदयाच्या 48 मिनिटांपूर्वी संपते. या वेळेला शुभ काळ मानली जाते.

3 thoughts on “ब्रह्म मुहूर्त मराठी माहिती (brahma muhurta information in marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *