बीटीएसटी व्यापार माहिती मराठी

By | November 10, 2022

BTST trade in marathi – बीटीएसटी ही एक शेअर बाजाराची व्यापार करण्याची पद्धत आहे. यामध्ये आज शेअर्स खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विकावे लागतात. यामध्ये 2 दिवसात निर्णय घ्यावा लागतो. बीटीएसटी (btst) ला एटीएसटी (atst) असेदेखील म्हटले जाते.

BTST meaning in marathi – बीटीएसटीचा फुल्ल फॉर्म आज खरेदी, उद्या विक्री (buy today sell tomorrow) असा आहे. एटीएसटीचा फुल्ल फॉर्म आज खरेदी करून उद्या विक्री करा (Acquire Today, Sell Tomorrow) असा आहे.

या लेखात आपण बीटीएसटी व्यापार माहिती – btst trade in marathi याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारतात ही सुविधा कोणकोणते स्टॉक ब्रोकर पुरवितात आणि या सुविधेचा फायदे आणि तोटे आपण अभ्यासणार आहोत.

हा लेख जरूर वाचाव्यापार म्हणजे काय मराठी माहिती

बीटीएसटी व्यापार माहिती – btst trade in marathi

btst trade in marathi
नावबीटीएसटी (आज खरेदी, उद्या विक्री)
सेवा पुरवणारे स्टॉक ब्रोकर

साधारणपणे इक्विटी डिलिव्हरी ट्रेडमध्ये व्यवहार दोन दिवसांमध्ये पूर्ण होतो. यामध्ये दोन दिवस म्हणजे T+2 ट्रेडिंग दिवस असतो. शेअर्स खरेदीदाराला त्याच्या डीमॅट खात्यात आज शेअर्स मिळतात तर विक्रेत्याला T+2 दिवसात पैसे मिळतात.

म्हणजेच, आपण सोमवारी एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केले, तर ते शेअर्स बुधवारी तुमच्या डीमॅट खात्यात जमा होईल. T+2 दिवस मोजताना स्टॉक एक्सचेंजमधील सुट्ट्या ग्राह्य धरण्यात येत नाही.

BTST ट्रेड करण्यासाठी CNC उत्पादन प्रकार वापरून शेअर्स खरेदी करावा लागेल आणि दुसऱ्या दिवशी CNC उत्पादन प्रकार वापरून खरेदी केलेल्या शेअर्सची विक्री करावी लागेल. स्टॉक ब्रोकर पार्श्वभूमीत या व्यवहारांची काळजी घेत असतो.

या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याला विशेष ऑर्डर प्रकार निवडण्याची गरज नाही. या सुविधेसाठी कोणत्याही विशेष परवानग्या आवश्यक नसतात.

हा लेख जरूर वाचाई-कॉमर्स माहिती मराठी (ecommerce information in marathi)

बीटीएसटी वैशिष्ट्य माहिती मराठी – btst trading features in marathi

1. खरेदी केलेला शेअर्स खात्यात जमा होण्यापूर्वी विकता येतो. यानंतर हा पर्याय खरेदी ऑर्डरनंतर दोन ट्रेडिंग दिवसांसाठी उपलब्ध असतो. तिसऱ्या दिवशी, शेअर्स डिमॅट खात्यात जमा केले जातात. यानंतर आपण सामान्य विक्री व्यवहार करू शकतो.

2. ही सेवा काही ब्रोकर्सद्वारे प्रदान केलेली एक अनोखी ट्रेडिंग सुविधा म्हणून ओळखली जाते. तसेच ही सुविधा फक्त स्टॉक ब्रोकरने मंजूर केलेल्या स्क्रिप्टसाठी उपलब्ध असते. उदाहरणार्थ. आयसीआयसीआय डायरेक्ट केवळ निफ्टी, निफ्टी ज्युनियर आणि मार्जिन ट्रेडिंग स्क्रिप्टवर ही सुविधा उपलब्ध आहे.

3. बरेच स्टॉक ब्रोकर एसएमई कंपन्यांसाठी (Small and mid-size enterprises) बीटीएसटी सुविधा देत पुरवित नाहीत.

बीटीएसटी वापरण्याचे फायदे आणि तोटे माहिती (btst advantages and disadvantages)

स्टॉक मार्केटमध्ये असणाऱ्या अस्तिरतेचा पुरेपूर फायदा घेता येतो. हा व्यवहार करत असताना डिमॅट खात्यात शेअर्स जमा होत नाहीत, त्यामुळे बीटीएसटी ट्रेडिंगवर डीमॅट डेबिट व्यवहार शुल्क आकारत नाही.

जर तुम्हाला इंट्रा-डे ट्रेडिंग फायदेशीर वाटत नसेल, तर ट्रेडिंग मधून नफा कमावण्यासाठी 2 दिवसाच्या कालावधीसह बीटीएसटी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

BTST वापरण्याचा कसलाही तोटा नाही पण बहुतांश सर्वच स्टॉक ब्रोकर फक्त इंटरनेट ट्रेनिंग साठी मार्जिन कॅश उपलब्ध करून देतात. BTST या सुविधेसाठी जास्त करून कोणताही स्टॉक ब्रोकर मार्जिन सुविधा उपलब्ध करून देत नाही. यामुळे ही सुविधा वापरत असताना आपल्याला संपूर्ण रक्कम भरावी लागते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण बीटीएसटी व्यापार माहिती – btst trade in marathi जाणून घेतली. यामध्ये आपण प्रामुख्याने बीटीएसटीचा मराठी फुल्ल फॉर्म (BTST full form in marathi) आणि ते कश्या पद्धतीने काम करते, याविषयीं माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे बी टी एस टी चे वैशिष्ट्य आणि फायदे तोटे जाणून घेतले.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बीटीएसटीचे चार्जेस किती आहे (BTST charges in zerodha, upstock, Angel broking)

झेरोधा (Zerodha)- यासाठी काहीही चार्जेस नाही.
अपस्टॉक (Upstock) – ही सुविधा उपलब्ध नाही.
Angel Broking – यासाठी काहीही चार्जेस नाही.

STBT आणि BTST काय आहे ?

BTST हे आज खरेदी करा, उद्या विक्री करा असे संक्षेप आहे तर, STBT म्हणजे आज विक्री करा, उद्या विकत घ्या. BTST मध्ये, तुम्ही T- दिवशी स्टॉक खरेदी करू शकता आणि T+2 वर तुमच्या डीमॅट खात्यात प्राप्त करण्यापूर्वी ते विकू शकता. STBT सुविधेमुळे गुंतवणूकदार आधी शेअर्स विकू शकतात आणि नंतर खरेदी करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *