buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्क (नवी दिल्ली)

Buddha jayanti park in marathi – बुद्ध जयंती ही बौद्ध धर्मीय लोकांचा सर्वात मोठा सण मानला जातो. याच दिवसाला तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्वाच्या घटना घडल्या आहेत. ही जयंती जगभरात साजरी करण्यात येते.

बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावून घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे सार्वजनिकरित्या वाचन करण्यात येते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते.

याच दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात. त्यांचे अनुयायी या ठिकाणी येऊन प्रार्थना करतात.

या लेखात आपण buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्क याबद्दल जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचा : सावंतवाडी मराठी माहिती – sawantwadi information in marathi

Buddha Jayanti Park – बौद्ध जयंती उद्यान

buddha jayanti park marathi
बुद्ध जयंती पार्क मराठी माहिती
नावबौद्ध जयंती उद्यान
ठिकाणवंदेमातरम मार्ग,
सेंट्रल रिज रिझर्व फॉरेस्ट,
नवी दिल्ली
स्थापनागौतम बौद्ध यांच्या 2500 व्या जन्मदिनी
जवळील पर्यटन स्थळेनेहरू पार्क
लोधी गार्डन
इंडिया गेट
राष्ट्रपती भवन
अग्रसेन बाओली
तालकटोरा गार्डन

गौतम बौद्ध यांच्या 2500 व्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ हे उद्यान नवी दिल्ली या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानास बौद्ध जयंती पार्क असे नाव देण्यात आले. हे उद्यान 88 एकर क्षेत्रावर उभारण्यात आले आहे. याच ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचे स्मारक असलेले मंदिर उभारण्यात आले आहे.

या उद्यानात दररोज सकाळी पाचशे हून अधिक लोक भेट देण्यासाठी येतात. यामध्ये स्थानिक लोक जॉगिंग करण्यासाठी येतात तर मुले खेळण्यासाठी भेट देतात. त्याचबरोबर पर्यटकसुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

सकाळी पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले असते.

बुद्ध जयंती पार्क 2.5 मीटर उंचीवर आहे. बुद्धाची बसलेल्या स्थितीतील मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. ही मूर्ती पाण्याच्या मध्यभागी एका बेटसदृश ठिकाणी एका सपाट व्यासपीठावर स्थापित केली आहे. जी सर्व बाजूंनी दगडी पुराने वेढलेली आहे आणि परिक्रमा मार्गाने वेढलेली आहे.

तळाशी रंगीत दगडांच्या रिंग्ज बनवल्या आहेत, त्यातील प्रत्येक रंग कालचक्र मंडलाचा संदर्भ नुसार आहे., यामध्ये पिवळा रंग भूमी दर्शवतो, पांढरा रंग पाणी दर्शवतो, लाल रंग आग दर्शवतो, काळा रंग हवा दर्शवतो आणि हिरवा रंग आकाश दर्शवतो.

या बागेत कृतीम तलाव आहे त्याच्या समोर असलेली बुद्धाची मूर्ती 8 फूट उंचीची आहे.

buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्कमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे

बुद्ध जयंती पार्क हे भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी आहे. हे उद्यान सुंदर आणि सुस्थितीत असलेले उद्यान म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

बुद्ध जयंती स्मारक उद्यानाची स्थापना गौतम बुद्धांच्या 2500 व्या जयंती उत्सवाचे प्रतीक म्हणून करण्यात आली आहे. श्रीलंकेतून आणलेल्या लोकप्रिय बोधी वृक्ष हे या पार्कचे महत्त्व आहे.

इसवी सन1964 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी बोधीवृक्षाखाली बुद्धांच्या निर्वाण प्राप्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ बोधी वृक्षाचे रोपटे येथे लावले होते.

दरवर्षी दिल्लीचे लोक या उद्यानात मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. या ठिकाणी प्रामुख्यानं बौद्धप्रेमी, निसर्गप्रेमी, फोटोप्रेमी आणि भटकंती करणारे पर्यटक भेट देतात.

buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्क जवळील पर्यटन स्थळे

नेहरू पार्क दिल्ली – बुद्ध जयंती पार्कपासून साधारणत 4 किलोमीटर अंतरावर हा पार्क आहे. नेहरू पार्क हे 85 एकर रुंद परिसरात पसरलेले एक सुंदर उद्यान आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव असलेले हे प्रसिद्ध उद्यान 1969 उभारले.

लोधी गार्डन – बुद्ध जयंती पार्कपासून साधारणपणे 9.3 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे. लोधी गार्डन हे एक हिरवेगार उद्यान आहे. या ठिकाणी सिकंदर लोधी आणि मोहम्मद शाह यांची समाधी आहे.

लोधी आणि सय्यदांनी केलेल्या अभियांत्रिकी कार्याचा मेळ येथील वास्तुकलाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सध्या ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली आहे.

इंडिया गेट – बुद्ध जयंती पार्कपासून साधारणपणे 7.2 किलोमीटर अंतरावर आहे. इंडिया गेट हे दिल्लीतील प्रमुख आकर्षणांपैकी आहे.

42 मीटरची ही विस्मयकारक रचना देशातील सर्वात मोठ्या युद्ध स्मारकांमध्ये समावेश केला जातो. तिसरे अँग्लो-अफगाण युद्ध आणि पहिल्या महायुद्धात प्राण गमावलेल्या 82,000 भारतीय तसेच ब्रिटीश सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या या स्मारकाच्या शरीरावर देशाच्या 13,300 सैनिकांची गौरवशाली नावे कोरलेली पाहायला मिळतात.

राष्ट्रपती भवन – बुद्ध जयंती पार्कपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

तालकटोरा गार्डन – बुद्ध जयंती पार्कपासून साधारण 3.3 किलोमीटर अंतरावर आहे. तालकटोरा गार्डन हे दिल्लीतील एक अतिशय सुंदर उद्यान आहे. या उद्यानात स्टेडियम आणि 1738 मध्ये मराठे आणि मुघलांचे युद्ध झालेले ऐतिहासिक क्षेत्र आहे पाहता येते.

अग्रसेन बाओली– बुद्ध जयंती पार्कपासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अग्रसेन बाओली हा एक प्राचीन जलसाठा आहे. या ठिकाणी विविध खडक आणि दगडांचे वर्गीकरण केले आहे. याचे महाभारत या वेळी केले असावे, अशी मान्यता आहे.

buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्कला कसे पोहचाल ?

हा पार्क भारत देशाची राजधानी दिल्लीमध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी येण्यासाठी विमानाने प्रवासकरू शकता. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी उतरल्यावर बुद्ध जयंती पार्कमध्ये जाता येते.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे. त्यासाठी तुम्ही बसेस किंवा टॅक्सी वापरून बौद्ध जयंती पार्कला भेट देऊ शकता.

हे उद्यान हिरवे आणि रंगीबेरंगी फुलांनी भरलेले आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हिवाळ्यात या उद्यानाचे सौंदर्य दुप्पट होते आणि हे चित्तथरारक दृश्य त्या ठिकाणच्या हवेत ताजेपणा निर्माण करते.

जर तुम्ही बुद्ध जयंती उद्यानाला भेट देण्याची योजना करत असाल, तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या वेळी येण्याची योजना करा.

पर्यटकांसाठी महत्वाची सूचना

  • बुद्ध जयंती पार्क ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे उद्यान स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. त्यामुळे उद्यानात कचरा टाकू नका आणि येथील कचराकुंडीचा वापर करा.
  • उद्यानाच्या असलेली फुले तोडू नका कारण असे केल्याने उद्यानाच्या सौंदर्यावर परिणाम होतो.
  • उद्यानाच्या आवारात लघवी करू नका.
  • तंबाखू खाऊ नका.
  • रस्त्यावरील कुत्र्यांपासून सावध रहा.
  • उद्यानात खाद्यपदार्थ घेऊन जाऊ नका.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्क या ठिकाणाची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी असणारे जवळील पर्यटन स्थळे याबाबत माहिती या लेखात आपण पाहिली आहे.

buddha jayanti park – बुद्ध जयंती पार्क तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उद्यानाची वेळ (Buddha Jayanti Park timings)

बुद्ध जयंती पार्क रविवारी बंद असतो. इतर संपुर्णवेळ सकाळी 6 ते रात्री 8.30 पर्यंत खुले असते.

उद्यानाचे तिकीट (Buddha Jayanti Park ticket price)

बुद्ध जयंती पार्कला भेट देण्यासाठी कसलाही प्रवेश शुल्क नाही.

Leave a Comment