बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi)

By | April 12, 2023

Buddha purnima information in marathi – जगातील सर्वात प्रभावशाली असलेला धर्म संस्थापक गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जगभरात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात येते. हा दिवस बौद्ध धर्मीयांचा महत्वाचा दिवस असून सर्व धर्माचे लोक हा सण आनंदाने साजरा करतात. या लेखात आपण बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

यात आपण बुद्ध जयंतीचे स्वरूप व माहिती, बुद्ध जयंती साजरी करण्यामागील शास्त्र व महत्व, बुद्ध जयंती कशी साजरी करतात (celebration of buddha purnima in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचागौतम बुद्ध कथा मराठी (gautam buddha story in marathi)

Table of Contents

बुद्ध जयंतीचे स्वरूप व माहिती (buddha purnima information in marathi)

buddha purnima information in marathi
गौतम बुद्धांचे जन्मस्थळ – लुंबिनी, नेपाळ
विषयबुद्ध जयंती
इतर नावे 1. बुद्ध जयंती
2. बुद्ध पौर्णिमा
3. वैशाखी पौर्णिमा
जयंती केव्हा साजरी करतात ?1. जपान – 8 एप्रिल
2. तैवान – मेे महिन्यातील दुसरा रविवार
3. भारत – वैशाखी पौर्णिमा
साजरा करणारेजगभरातील बौद्ध अनुयायी व इतर धर्मीय अनुयायी
जयंती साजरी करण्यामागील महत्वगौतम बुद्धांचा जन्मदिवस साजरा करणे

गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. इसवी सन पूर्व 563 मध्ये सिद्धार्थ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचा राजा होते. त्यामुळे लहानपणापासून राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य त्यांना लाभले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांची आई महामाया यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. गौतमी वरूनच सिद्धार्थ नावाचे गौतम नाव पडले, अशी मान्यता आहे.

सिद्धार्थ गौतम लहानपणापासून दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यापासून कोसो दूर होते. लोककथेनुसार एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. नगरातून फेरफटका मारताना सिद्धार्थ गौतम यांनी जगातील दुःख, ताप, त्रास, वेदना पाहिल्या, त्यानंतर त्यांचे मन सुखात रमेनासे झाले.

त्यानंतर त्यांनी गृहत्याग करण्याचा निश्चय केला आणि एके रात्री आपल्या पत्नीस आणि मुलास सोडून त्यांनी राजगृह येथे नवीन जीवनक्रम सुरू केला.

त्यानंतर त्यांनी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. सलग 49 दिवसांच्या तपस्येनंतर बोधिवृक्षाच्या छायेत त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हा दिवस वैशाखी पौर्णिमेचा होता, याच दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.

हा लेख जरूर वाचामहापरिनिर्वाण दिन माहिती मराठी (mahaparinirvan din in marathi)

त्यामुळे याच दिवशी भारतात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येते. जगभरातील सर्व बौद्ध अनुयायी व इतर धर्मीय अनुयायी ही पौर्णिमा साजरी करतात.

बुद्ध पौर्णिमेचे महत्व याविषयी माहिती (buddha purnima importance in marathi)

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.

वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. लोकांच्या जीवनातील दुःख नाहीसे कसे करता येईल, याविषयी ज्ञान असलेल्या गौतम बुद्धांचा जन्मदिवस साजरा करणे आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.

हा लेख जरूर वाचाबौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती

बुद्ध जयंती कशी साजरी करतात (celebration of buddha purnima in marathi)

या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी लुंबिनी, सारनाथ, गया, कुशी नगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. या ठिकाणी बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते.

तसेच व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो. विविध ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.

या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.

बोधिवृक्षाची पूजा केली जाते. त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात. गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.

भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती 2 मे 1950 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. त्यामुळे त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते म्हणतात.

हा लेख जरूर वाचा – बुद्ध जयंती पार्क नवी दिल्ली माहिती मराठी

बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. तसेच कुशीनगर येथील महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते.

सारांश

या लेखातून आपण बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. यात आपण बुद्ध जयंतीचे स्वरूप व माहिती, महत्व आणि बुद्ध जयंती कशी साजरी करतात (celebration of buddha purnima in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती कुठे झाली ?

गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती बोधगया, बिहार येथील बोधीवृक्षाखाली झाली.

गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते ?

गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते.

गौतम बुद्ध यांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केला होता ?

गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला होता.

भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती कुणी व केव्हा साजरी केली ?

भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती 2 मे 1950 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. त्यामुळे त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते म्हणतात.

गौतम बुद्धांच्या जीवनातील वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या घटना कोणत्या आहेत ?

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *