ऑप्शन ट्रेडिंग माहिती मराठी (call and put option in marathi)

By | November 7, 2022

call and put option in marathi – वायदे बाजार या मागील लेखात आपण फ्युचर्स मार्केटविषयी माहिती जाणून घेतली. या लेखात आपण पाहिले की, फ्युचर्स मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची भविष्यातील देवाण-घेवाण करण्यासाठी करार केला जातो. या करारानुसार व्यवहार करणे अनिवार्य असते.

जर तुम्ही वायदे बाजार म्हणजे काय ? लेख वाचला नसाल तर नक्की वाचा. यामध्य फ्युचर्स विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

समजा. आयडिया हा शेअर तुम्ही तीन महिन्यानंतर 10 रुपयांना खरेदी करणार होते. पण तुम्हाला असे वाटले की पुढील 3 महिन्यात आयडियाची किंमत कमी झाली तर आपले नुकसान होईल. अश्या वेळेस तुम्ही विक्रेत्यांस म्हणाल, की जर आयडियाची किंमत वाढली तरच मी खरेदी करेल. पण जर मला त्यात नफा वाटला नाही तर मी खरेदी करणार नाही.

यात फक्त तुमचाच नफा असल्याने विक्रेता विचार करतो, की आयडिया जर 10 रुपयांच्या वर गेला तर तसेही हा शेअर तुम्ही खरेदी करणार आहात. यानुसार विक्रेता तुम्हाला एक विकल्प देतो. जरी आयडियाची किंमत 10 रुपयांच्या वर गेली तरीदेखील तो आयडियाचा शेअर तुम्हाला 10 रुपयांतच देईल. यासाठी तुम्हाला काही प्रीमियम द्यावे लागेलं.

तुमच्यासाठी ही एक सुरक्षितता आहे, जरी आयडियाचा भाव वाढला तरीदेखील तुम्हाला 10 रुपयांतच हा शेअर मिळणार आहे. म्हणजे तुमचा फायदा असेल तरच तुम्ही आयडियाचा शेअर खरेदी करणार. यालाच ऑप्शन्स असे म्हणतात.

ऑप्शन्समध्ये दोन प्रकार पडतात – कॉल आणि पुट. या लेखातून आपण कॉल व पुट ऑप्शन ट्रेडिंग (call and put option in marathi) याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊ.

कॉल व पुट ऑप्शन ट्रेडिंग (call and put option in marathi)

call and put option in marathi
विषयकॉल व पुट ऑप्शन
प्रकार डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमधील व्यापार पद्धती

डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमधील फ्युचरसारखेच कॉल व पुट ऑप्शन हा व्यापारची एक पद्धत आहे. ज्यात आपण शेअर्सचा भाव वाढला तरी पैसे कमवू शकतो आणि शेअर्सचा भाव घटला तरीदेखील पैसे कमवू शकतो.

एकंदरीत समजून घ्यायचे झाल्यास, तुम्हाला वाटले की आयडियाची 3 महिन्यांनी किंमत 10 रुपयांच्यावर जाईल. अशा वेळेस तुम्ही विकल्प म्हणून कॉल ऑप्शन्स निवडाल. तुमचा अंदाज बरोबर ठरला तर तुम्हाला फायदा होईल. जर तुमचा अंदाज चुकला तर कॉल विक्रेत्यास फायदा होईल.

याउलट जर तुम्हाला वाटले की आयडियाची 3 महिन्यांनी किंमत 10 रुपयांच्यावर जाईल. अशा वेळेस तुम्ही विकल्प म्हणून पुट ऑप्शन्स निवडाल. तुमचा अंदाज बरोबर ठरला तर तुम्हाला फायदा होईल. जर तुमचा अंदाज चुकला तर पुट विक्रेत्यास फायदा होईल.

कॉल ऑप्शन ट्रेडिंग माहिती (call options in stock market mahiti)

जर कोणत्याही अंतर्निहित मालमत्तेची किंमत वाढेल असे वाटल्यास केल्या जाणाऱ्या व्यापाराला कॉल ऑप्शन ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर्सची किंमत भविष्यात वाढली जाईल या हिशोबाने ट्रेडिंग करण्यासाठीच कॉल ऑप्शन आहे.

समजा. आयडिया शेअर्सची किंमत सध्या 10 रुपये इतकी आहे. तुमच्या असे वाटले पुढील 3 महिन्यांनी हा शेअर 10 रुपयांच्या वर जाईल. तर तुम्ही कॉल ऑप्शन निवडून 3 महिन्यांनी आजच्या किंमतीला आयडिया खरेदी कराल. या व्यवहारात झालेला फायदा आणि नुकसान आपण पुढील तक्त्याद्वरे समजून घेऊ.

Call buyer फायदाआयडिया शेअर्सची किंमतप्रीमियमCall seller फायदा
-4 824
-21022
01220
2142-2
4162-4

वरील तक्त्यात आपण पाहिले की, आयडियाचा सध्याचा भाव 10 रुपये इतका आहे. तो आपण पुढील 3 महिन्यांनी कॉल खरेदी करणार आहोत. यानुसार आपल्याला प्रीमियम 2 रुपये अगोदर द्यावे लागतील.

समजा – तीन महिन्यानंतर आयडियाची किंमत 8 रुपये झाली. पण तुम्ही करारानुसार 10 रुपयांना आयडिया खरेदी केला. तर 10 – 8 = 2 रुपये व 2 रुपयांचा प्रीमियम असे तुमचे 4 रुपयांचे नुकसान होते.

याउलट तीन महिन्यानंतर आयडियाची किंमत 16 रुपये झाली. पण तुम्ही करारानुसार 10 रुपयांना आयडिया खरेदी केला. तर 16 – 10 = 6 रुपये व 2 रुपयांचा प्रीमियम 6 – 2 = 4 रुपये फायदा होईल.

आयडिया कॉलचा प्रीमियम + तीन महिन्यानंतर शेअर्सची होणारी किंमत जर आजच्या किमतीहून (10 रुपयांहून) अधिक असेल तरच तुमचा फायदा होईल.

कॉल ऑप्शन कधी खरेदी करायचा ?

जर शेअर्सची किंमत वाढणार असेल तर कॉल ऑप्शन खरेदी करावा. पण कॉल ऑप्शन मधून पैसे मिळवण्यासाठी अगोदर प्रीमियम कव्हर करावे लागेल. म्हणजे आयडियाच्या कॉल मधून फायदा मिळवण्यासाठी 2 रुपये प्रीमियम + 10 रुपये = 12 रुपये मिळवावे लागतील, यानंतर होणारी रक्कम तुमचा फायदा असेल.

पुट ऑप्शन ट्रेडिंग माहिती (put options in stock market mahiti)

जर कोणत्याही अंतर्निहित मालमत्तेची किंमत कमी होईल असे वाटल्यास केल्या जाणाऱ्या व्यापाराला पुट ऑप्शन ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर्सची किंमत भविष्यात कमी होणार या हिशोबाने ट्रेडिंग करण्यासाठीच पुट ऑप्शन गरजेचं आहे.

समजा. आयडिया शेअर्सची किंमत सध्या 10 रुपये इतकी आहे. तुमच्या असे वाटले पुढील 3 महिन्यांनी हा शेअर 10 रुपयांहून खाली जाईल. तर तुम्ही पुट ऑप्शन निवडून 3 महिन्यांनी आजच्या किंमतीला आयडिया विक्री कराल. या व्यवहारात झालेला फायदा आणि नुकसान आपण पुढील तक्त्याद्वरे समजून घेऊ.

Put Buyer फायदाआयडिया किंमतप्रीमियमPut Seller फायदा
-41224
-21022
0820
262-2
442-4

वरील तक्त्यात आपण पाहिले की, आयडियाचा सध्याचा भाव 10 रुपये इतका आहे. तो आपण पुढील 3 महिन्यांनी पुट खरेदी करणार आहोत. यानुसार आपल्याला प्रीमियम 2 रुपये अगोदर द्यावे लागतील.

समजा – तीन महिन्यानंतर आयडियाची किंमत 4 रुपये झाली. पण तुम्ही करारानुसार 10 रुपयांना आयडिया विक्री केला. तर तुमचा 10 – 4 = 6 रुपये पण 2 रुपयांचा प्रीमियम अगोदरच दिल्याने 6 – 2 = 4 रुपये फायदा होईल.

याउलट तीन महिन्यानंतर आयडियाची किंमत 12 रुपये झाली. पण तुम्ही करारानुसार 10 रुपयांना आयडिया विक्री केला. तर 12 – 10 = 2 रुपये व 2 रुपयांचा प्रीमियम 2 + 2 = 4 रुपये नुकसान होईल.

आयडिया पुटचा प्रीमियम + तीन महिन्यानंतर शेअर्सची होणारी किंमत जर आजच्या किमतीहून (10 रुपयांहून) कमी असेल तरच तुमचा फायदा होईल.

पुट ऑप्शन कधी खरेदी करायचा ?

जर शेअर्सची किंमत घटणार असेल तर पुट ऑप्शन खरेदी करावा. पण पुट ऑप्शन मधून पैसे मिळवण्यासाठी अगोदर प्रीमियम कव्हर करावे लागेल. म्हणजे आयडियाच्या पुट मधून फायदा मिळवण्यासाठी 2 रुपये प्रीमियम + 10 रुपये = 12 रुपये मिळवावे लागतील, यानंतर होणारी रक्कम तुमचा फायदा असेल.

हे समजून घ्या – तुम्ही जेव्हा पुट खरेदी करत आहात तेव्हा खरेतर तुम्ही पुट विक्री करत आहात. म्हणजे तुम्हाला असे वाटत आहे की तीन महिन्यांनी (भविष्यात) या शेअरची बाजारातील किंमत कमी होईल. म्हणून पुट कारार करून तुम्ही आजच्या किमतीवर तीन महिन्यांनी (भविष्यात) शेअर विकाल.

कॉल व पुट यातील फरक (difference between call and put option in marathi)

कॉल (Buyer)पुट (Buyer)
शेअरची बाजारातील किंमत वाढेल, या हेतूने कॉल खरेदी केला जातो. शेअरची बाजारातील किंमत कमी होईल, या हेतूने पुट खरेदी केला जातो.
कॉल खरेदीदारांना स्टॉक खरेदीचा अधिकार आहे. पुट खरेदीदारांना स्टॉक विक्रीचा अधिकार आहे.
तुम्ही हा करार केव्हाही पूर्ण करू शकता. यावर कॉल सेलर प्रतिबंध करू शकत नाही. तुम्ही हा करार केव्हाही पूर्ण करू शकता. यावर पुट सेलर प्रतिबंध करू शकत नाही.
एक महत्वाची बाब – तुम्ही शेअर्स किंमतीबाबत सुरक्षितता घेत असल्याने तुम्ही खरेदीदार (call buyer) तर जो सुरक्षितता देत आहे तो विक्रेता (call seller) असतो. एक महत्वाची बाब – तुम्ही शेअर्स किंमतीबाबत सुरक्षितता घेत असल्याने तुम्ही खरेदीदार (put buyer) तर जो सुरक्षितता देत आहे तो विक्रेता (put seller) असतो

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये ऑप्शन ट्रेडिंग माहिती मराठी (call and put option in marathi) जाणून घेतली. यामधून आपण कॉल व पुट या संकल्पना व फरक (difference between call and put option in marathi) समजून घेतला. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *