कापूरचे फायदे मराठी माहिती

By | February 5, 2023

Camphor benefits info in marathi – विविध धार्मिक पूजा करत असताना आपण कापूर वापरतो, तसेच गणपतीची आरती करताना कापूर पेटवला जातो. आशिया खंडात बऱ्याच देशामध्ये मिठाईचा स्वाद वाढण्यासाठी कापुराचा वापर केला जातो. तसेच तामिळनाडू राज्यात अन्न शिजविताना याचा वापर हिंगाप्रमाणे करतात. या लेखातून आपण कापूरचे फायदे मराठी माहिती (camphor benefits info in marathi) जाणून घेणार आहोत.

कापूरचे फायदे मराठी माहिती (camphor benefits info in marathi)

Camphor benefits info in marathi
नावकापूर
वैज्ञानिक नावCinnamomum camphora
रासायनिक फॉर्म्युलाC10H16O
वापरधार्मिक आणि औषधी
गंधसुवासिक

कापूरात अनेक औषधी गुण (medicinal properties) असतात तसेच त्याचा उपयोग धार्मिक कामांसाठी (religion uses) केला जातो. भारतीय संस्कृतीत अनेक धार्मिक विधीत कापूर आरती करण्याची पद्धत आहे. देवाची पूजा करताना कापूर आरती किंवा धुपारती केली जाते.

घरात कापूर जाळण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात कापूर जाळला जातो. कापूर हा धार्मिक विधीप्रमाणे अनेक आरोग्य समस्या दूर ठेवतो. याच्या वापराने घर निर्जंतूक होते.

कापूरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ते आपले सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. वेदना, सर्दी किंवा इतर आरोग्य समस्या बरे करण्यासाठी फायदेशीर असलेल्या बाम, मलम बनवताना याचा वापर केला जातो.

चेहऱ्यावरील डाग घालवण्याचे उपाय (remove pimples on face naturally in marathi) – चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांना घालवण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा घेऊन त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये कांद्याचा रस मिसळून घ्यायचा. त्यानंतर बनवलेली पेस्ट मुरुमांवर लावा, साधारण अर्धा तास ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. असा दिनक्रम काही दिवस केल्याने चेहऱ्यावर आलेले मुरूम निघून जातात.

हा लेख जरूर वाचा – चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय माहिती मराठी (how to remove pimple scars naturally at home)

तेलकट त्वचेसाठी उपाय (skin care for oily skin and acne) – बऱ्याच जणांचा चेहरा तेलकट असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी कापूरची पावडर, मुलतानी माती, बेसन पीठ यामध्ये गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट 10 मिनिट चेहऱ्यावर लावून नंतर थंड पाण्याने धुवावी. असा दिनक्रम काही दिवस केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि अधिक तजेलदार होतो.

पायाच्या भेगा जाण्यासाठी उपाय (foot rashes remove with camphor in marathi) – बहुतांश लोकांच्या पायाला भेगा पडलेल्या असतात. या भेगा हिवाळ्यात खूप वेदना देतात. या वेदना नष्ट करण्यासाठी कापूर खूप उपयोगी पडते. कोमट पाण्यात कापूर मिसळून, या पाण्यात अर्धा तास पाय ठेवावेत. यानंतर ब्रशच्या मदतीने भेगावर थोडा वेळ स्क्रब करा. त्यानंतर स्वच्छ करून त्यावर खोबऱ्याचे तेल लावा. असा दिनक्रम काही दिवस केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.

हिवाळ्यात धुतलेले कपडे वाळत नसल्याने बऱ्याच वेळा ओले कपडे घालावे लागतात. सतत ओले कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज सुटणे. त्वचेची खाज कमी करण्यासाठी बॉडी लोशन म्हणून कापूर वापरला जातो. कारण यात अँटीसेप्टिक आणि अँटी प्र्युरिटिक गुणधर्म असतात, जे त्वचेची जळजळ नाहीशी करतात. त्यामुळे कापूर खोब-याच्या तेलात मिसळून शरीरावर लावले तर बराच आराम मिळतो.

केसांसाठी कापूर तेलाचे फायदे (The Benefits Of Camphor For Hair) – महिलांच्या लांब केसांमुळे त्यात कोंडा होणे किंवा केस गळणे अशी समस्या निर्माण होते. कापराच्या तेलाने केस गळणे कमी करून केसांच्या वाढीसाठी प्रयत्न करता येतात. तसेच कोंडा नष्ट करता येतो. यासाठी फक्त खोबऱ्याच्या तेलात कापराचे तेल मिसळा आणि केसांवर रोज लावा. थोडा दिवस असा नित्यक्रम ठेवण्याने तुम्हाला फरक जाणवेल.

कापूर दातासाठी उपयुक्त (remedy to teeth pain camphor) – बऱ्याच जणांच्या दातांमध्ये कीड लागल्याने त्यांना वेदना होत असतात. या वेदना कमी करण्यासाठी दातावर कापूर पावडर लावा. असे केल्याने दातांचं दुखणं लगेच दूर होते.

कापूर हिवाळ्यात खूप आरामदायी ठरतो. पावसाळा आणि हिवाळा सर्दी आणि ताप येणे स्वाभाविक असते. यावर उपाय म्हणून कापूर पाण्यात घालून वाफ घ्यावी, असे केल्याने तुम्हाला सर्दी आणि ताप यापासून आराम मिळतो.

घरातील मुंग्या, ढेकूण, डास यांचे प्रमाण वाढले असेल तर मुंग्या, ढेकूण, डास कमी करण्यासाठी कापूरचा वापर केला जातो. नैसर्गिकरित्या कीडे-कीटकांना मारण्यास कापूर फायदेशीर ठरते.

हा लेख जरूर वाचाआरोग्यासाठी पाण्याचे उपयोग मराठी माहिती (water benefits information in marathi)

सारांश

या लेखातून आपण कापूरचे फायदे मराठी माहिती (camphor benefits info in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कापूर कसा तयार होतो ?

कापूर वृक्षापासून तयार होतो. कापूरच्या झाडात सर्व भागांत तेलपेशींमध्ये कापूर असतो.
पण खोड आणि पानांतून अधिक प्रमाणात कापूर तयार करतात.
वनस्पतीच्या खोडातील वा पानांतील कापूर तेल ऊर्ध्वपातनाने वेगळे करून त्यापासून कापराचे स्फटिक तयार करतात.

कापूर तेलाचे फायदे माहिती मराठी

1. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी
2. फुटलेल्याा टाचांसाठी फायदेशीर
3. केस निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त
4. केसातील कोंडा कमी करण्यासाठी

कापूर खाण्याचे फायदे माहिती मराठी

1. किडलेल्या दातांची कीड आणि ठणक कमी होते.
2. जिभेवरील किटाणू नष्ट होतात.
3. तोंडाची दुर्गंधी जाऊन सुवासिक वास येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *