Caste Certificate Documents In Marathi – नमस्कार मित्रांनो, उच्च शिक्षण असो किंवा सरकारी नोकरी अशा अनेक प्रकारच्या सरकारी क्षेत्रात जातीचा दाखला आवश्यक असतो. राज्य सरकारद्वारे दिला जाणारा हा दाखला आपल्या जातीचे प्रमाण असतो.
शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ शिष्यवृत्ती, पदवी, सरकारी नोकरी, राजकारण अश्या ठिकाणी उपयोगात येणारे जातीचे प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या काढू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता आहे.
तर आपण या लेखातून जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Caste Certificate Documents In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जातीचा दाखला काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात (Caste Certificate Documents In Marathi)

विषय | जातीचा दाखला |
प्रकार | जातीचे प्रमाणपत्र |
संकेतस्थळ | https://aaplesarkar.mahaonline.gov.in |
Maharashtra Caste Wise Reservation In Marathi – महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मागास वर्गीयांसाठी एकूण 52% आरक्षण दिले आहे. यामध्ये ओबीसींना (OBC) 32 टक्के तर अनुसूचित जातींना (SC) 13 टक्के आणि अनुसूचित जमातींना (ST) 7 टक्के आरक्षण दिलेले आहे.
आर्थिक दृष्टीने मागासवर्ग (EWS) असणाऱ्यांना 10% आरक्षण आहे. तसेच राज्यातील नोकरभरती करताना अनाथ व्यक्तिंसाठी 1% आरक्षण आहे.
याव्यतिरिक्त एनटी – डी, एनटी – सी, एनटी – बी, व्हीजे – ए, एसबीसी अश्या प्रवर्गाला महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिले जाते.
या आरक्षणाच लाभ घेण्यासाठी उमेदवाराला जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. जर तुम्ही शैक्षणिक किंवा नोकरीसाठी जातीचे प्रमाणपत्र काढणार असाल, तर पुढील कागदपत्रे सादर केल्यानंतर तुमचे जातीचा दाखला तयार होतो.
Jaticha Dakhla Documents In Marathi – जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
1. ओळखीचा पुरावा – पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, राज्य सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र (यापैकी एक)
2. पत्ता पुरावा – पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा (यापैकी एक)
Related – रहिवासी दाखला कसा काढावा?
3. अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा
4. अर्जदार किंवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो
5. वडील किंवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा (काका, चुलत आजोबा)
6. वडील किंवा जवळच्या नातेवाईकाच्या जातीचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
7. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र, अर्जदाराचे वडील किंवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
8. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
9. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावा
10. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावा
जात प्रमाणपत्र काढताना वरील कागदपत्रांपैकी एखादे नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.
याव्यतिरिक्त नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र, स्वघोषणापत्र इत्यादी द्यावे लागते.
FAQs
जातीचा दाखला म्हणजे काय?
आपण कोणत्या जातीचे आहोत, हे प्रमाणित करणारे सरकारी दस्तऐवज (कागदपत्र) म्हणजे जातीचा दाखला होय.
जातीचा दाखला किती दिवसात मिळतो?
आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांपर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळते.
जर काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.
सारांश
मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जातीचा दाखला काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात (Caste Certificate Documents In Marathi) याविषयीची सविस्तर माहिती समजली असेल.
जर जातीचा दाखला काढण्यासंदर्भात तुम्हाला काही अडचणी असल्यास आम्हाला विचारू शकता. तुमच्या समस्यांचे निराकरण करताना आम्हाला नक्कीच आनंद होईल.