cdpo exam information in marathi – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत जवळपास दर दोन वर्षांनी महिला व बालविकास विभागात ‘बालविकास प्रकल्प अधिकारी’ या पदांसाठी भरती करण्यात येत असते. जर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.
या लेखातून आपण महिला व बाल विकास अधिकारी माहिती मराठी (cdpo exam information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महिला व बाल विकास अधिकारीसाठी आवश्यक पात्रता, परीक्षा आणि निवड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- महिला व बाल विकास अधिकारी माहिती मराठी (cdpo exam information in marathi)
- महिला व बाल विकास अधिकारी पात्रता (cdpo exam eligibility in maharashtra)
- महिला व बाल विकास अधिकारी परीक्षा अभ्यासक्रम (cdpo syllabus information in marathi)
- महिला व बाल विकास अधिकारी परीक्षा स्वरूप (cdpo exam pattern in maharashtra)
- बाल विकास आणि महिला विकास निवड (cdpo selection process information in marathi)
- बाल विकास आणि महिला विकास वेतन (CDPO salary information in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
महिला व बाल विकास अधिकारी माहिती मराठी (cdpo exam information in marathi)

विषय | महिला व बाल विकास अधिकारी माहिती |
निवड | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मुलाखत) |
वारंवारता | दर दोन वर्षांनी |
पात्रता | कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून पदवी |
निवड | महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे |
पदे | 1. निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था 2. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी 3. रचना व कार्यपध्दती अधिकारी 4. अधिव्याख्याता 5. अधिक्षक 6. सांख्यिकी अधिकारी |
cdpo exam information in marathi – एमपीएससी ही महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात येणारी एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे. MPSC परीक्षेतुन विविध सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते. राज्याचा कारभार चालवण्यासाठी जे अधिकारी असतात जसे उप-जिल्हाधिकारी, तहसीलदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ई अधिकाऱ्यांची भरती MPSC परिक्षेमार्फत केली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात व दरवर्षी एमपीएससी परीक्षा देतात.
एमपीएससीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र राज्याचा कारभार चालवणाऱ्या महत्वाच्या पदांची भरती करण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. या परिक्षेमार्फत भरली जाणारी गट-अ व गट-ब ची मिळून एकूण 27 पदे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असतो, केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
महिला व बाल विकास अधिकारी हे गट-ब मधील पद आहे. यासाठी दर दोन वर्षांनी जाहिरात प्रसिद्ध होत असते.
हा लेख जरूर वाचा – भारतातील पहिले महिला विद्यापीठ माहिती (SNDT information in marathi)
महिला व बाल विकास अधिकारी पात्रता (cdpo exam eligibility in maharashtra)
एमपीएससी परीक्षा देण्यासाठी मराठी बोलता आणि लिहता येणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असायला पाहिजे. पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी MPSC पूर्व परीक्षा देऊ शकतात पण मुख्य परीक्षा देण्यासाठी त्यांची पदवी पूर्ण होणे गरजेचे आहे.
एमपीएससीसाठी विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 38 पर्यंत पाहिजे. विद्यार्थ्याच्या जातीनुसार वयोमर्यादेत सवलती देण्यात आलेल्या आहेत.
जात | किती वेळा परीक्षा देऊ शकतो |
---|---|
OPEN | 06 |
SC/ST | अमर्यादित (वयाच्या मर्यादेपर्यंत) |
OBC | 09 |
एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचे नागरिकत्व भारतीय असावे. भारताबाहेरील विद्यार्थी देखील एमपीएससी देऊ शकतात पण त्यासाठी वेगळे नियम आहेत, ते नियम तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईट पाहायला मिळतील.
महिला व बाल विकास अधिकारी परीक्षा अभ्यासक्रम (cdpo syllabus information in marathi)
विषय | उपविषय |
---|---|
सामान्य अध्ययन | जगातील चालू घडामोडी, भारतात, महाराष्ट्रात (राजकीय, औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक) |
IQ चाचणी / अंकगणित (शालेय स्तर) | उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी हे प्रश्न विचारले जातील. |
व्याकरण (शालेय स्तर) | वाचन, आकलन – मराठी आणि इंग्रजी उतारा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे, मराठी – आणि इंग्रजी व्याकरण. |
सामान्य विज्ञान | भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (शालेय स्तर) |
समाजशास्त्र | समाजाचे स्वरूप, मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक परिवर्तन, भारतीय समाजाचे विभाग, सामाजिक समन्वय, सामाजिक संस्थांचे बदलते स्वरूप, भारतातील सामाजिक समस्या विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक संशोधन पद्धती, समाजव्यवस्था, संस्कृती, समाजीकरण. |
मानसशास्त्र | व्याख्या, निसर्ग, व्याप्ती, संशोधनाची पद्धत, लक्ष, अभ्यास, मानवी स्मृती, प्रेरणा, भावना, मानवी वर्तनाचा आधार, मानसशास्त्राचे क्षेत्र. |
माहिती व संपर्क तंत्रज्ञान | संक्षेप, इंटरनेट आणि ईमेलचा अर्थ, फायदे, तोटे, जागतिकीकरण आणि मास मीडिया, प्रभाव. |
समाजकार्य | व्यावसायिक सामाजिक कार्य, सामाजिक कार्याच्या संशोधन पद्धती, सामाजिक कार्याचा इतिहास, सामाजिक कार्याचे तत्वज्ञान, सामाजिक कार्याची तत्त्वे आणि पद्धती आणि भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांचे कार्य. |
भारतीय संविधान | राज्यघटना, शासनाची रचना, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची रचना आणि कार्ये |
मानवी हक्क | मानवी हक्कांची घोषणा, मानवी हक्क अंमलबजावणी यंत्रणा, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महिला आणि बाल विकास कार्यक्रम, महिला धोरण, बाल धोरण, मुलांची राष्ट्रीय सनद, महिला आणि बालकांचे हक्क, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल कार्यक्रम, संयुक्त राष्ट्रांचा अहवाल, बालमृत्यू दर, लिंग गुणोत्तर. |
महिला आणि बाल विकास | केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना, महिला आणि मुलांबाबत काही ऐतिहासिक निर्णय, सर्व प्रमुख आयोग आणि त्यांची रचना आणि कार्ये |
महिला आणि मुलांचे कायदे | महिला आणि बालकांशी संबंधित कायदे, कायदे आणि इतर कायदे, माहितीचा अधिकार कायदा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा/अधिनियम, नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955, वैद्यकीय गर्भपात कायदा (एमटीपी कायदा), अनैतिक व्यापार कायदा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005, लिंग निदान प्रतिबंध कायदा, प्रसवपूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान यंत्रणा कायदा, 1994 (पीसीपीएनडीटी कायदा, 1994), |
गृहशास्त्र | पौष्टिक पोषण, पौष्टिक मूलतत्त्वे, पौष्टिक जैवरसायन, पोषण, सूक्ष्मजीवशास्त्र, सार्वजनिक पोषण, उपचारात्मक वैज्ञानिक आहार, अन्नाचे उष्मांक मूल्य मोजणे, चांगल्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी मानवी शरीराला आवश्यक पौष्टिक मूल्ये आणि उर्जा, भारतातील पोषण समस्या, सरकारी कारणे, कारणे. धोरणे, योजना, पूरक पोषण कार्यक्रम, लंच योजना |
बालविकास आणि महिला विकास | बालविकासाची ओळख, अर्थ, व्याप्ती, विकासाचे टप्पे, अंग, वाढ, विकास, जन्मपूर्व विकास, अभ्यासाच्या घटकांमधील नवजात अवस्था, बाल्यावस्था, पूर्व-शैशव – शारीरिक विकास, घटक विकास, संज्ञानात्मक विकास, नैतिक विकास, भाषा विकास, सामाजिक विकास , बाल संगोपन आणि शिक्षण , लसीकरण , मुलांचे विविध आजार , बालविकासातील आव्हाने , मुलांच्या विविध समस्या आणि उपाय , महिलांच्या समस्या आणि समस्या (आरोग्य पोषण संदर्भ) |
महिला व बाल विकास अधिकारी परीक्षा स्वरूप (cdpo exam pattern in maharashtra)
महिला व बाल विकास अधिकारी परीक्षा – MPSC CDPO Exam Pattern |
परीक्षा | गुण |
---|---|
लेखी | 200 |
मुलाखत | 50 |
विषय | प्रश्न | गुण | कालावधी | प्रकार |
---|---|---|---|---|
सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता, विभागाशी संबंधित प्रश्न | 100 | 200 | 1 तास | वस्तुनिष्ठ |
बाल विकास आणि महिला विकास निवड (cdpo selection process information in marathi)
एमपीएससी CDPO ही परीक्षा दोन टप्प्यात परीक्षा होते. पहिला टप्पा 200 गुणांची लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) आणि त्यानंतर निवड केली जाते.
बाल विकास आणि महिला विकास वेतन (CDPO salary information in marathi)
पगाराची रचना | एकूण रक्कम रु. |
---|---|
मूळ वेतन | 41,800 रू. |
महागाई भत्ता (DA) | 7,102 रू. |
घरभाडे भत्ता (HRA) | 4,488 रू. |
एकूण वेतन | 53,390 रू. |
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण महिला व बाल विकास अधिकारी माहिती मराठी (cdpo exam information in marathi) जाणून घेतली आहे. महिला व बाल विकास अधिकारी माहिती मराठी (cdpo exam information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
cdpo चा फुल फॉर्म काय आहे ?
cdpo चा मराठी फुल फॉर्म महिला व बाल विकास अधिकारी (Child Development Project Officer) हा आहे.
सीडीपीओ चे कार्य काय आहे ?
1. सहा वर्षाच्या वयाखालील बालके आणि गर्भवती महिलांच्या विकासासाठी काम करणे.
2. लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना पोषक आहार तसेच सरकारी सुविधा वाटप करण्याचे नियोजन CPDO कडून केले जाते.
Very important and proper information for the post of CDPO.
Very nice
Nice information…
Very nice information for the post of CDPO
Best information
2023-24 मध्ये cdpo ची परीक्षा होणार आहे का??