चंद्रयान 3 मराठी माहिती

Chandrayaan 3 Information In Marathi – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने मागील दिवसात मंगल यान आणि चंद्रयान 1 या मोहीम यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. परंतु चंद्रयान 2 ही मोहीम चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यामुळे अपूर्ण राहिली होती. परंतु आता भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे.

या लेखातून आपण चंद्रयान 3 मराठी माहिती (Chandrayaan 3 Information In Marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

चंद्रयान 3 मोहीम माहिती मराठी (chandrayaan 3 Information in marathi)

विषय चंद्रयान 3
प्रकार प्रदक्षिणा मारणारा उपग्रह
प्रक्षेपण14 जुलै 2023
ठिकाणश्रीहरिकोटा
नियंत्रण संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था
संकेतस्थळhttps://www.isro.gov.in/
देशभारत

भारतीय अंतराळ संशोधनाचे (ISRO ) चांद्रयान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार असून, आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचले नाही. यामुळे संपूर्ण जगभरात चांद्रयान 3 ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली.

Chandrayaan 1 Mission – 22 ऑक्टोंबर 2008 रोजी चांद्रयान 1 ची श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेसाठी दोन वर्षाचा कालावधी लागलेला होता. 8 नोव्हेंबर 2008 रोजी चांद्रयान 1 यशस्वीपणे चंद्राच्या कक्ष टाकण्यात आले. 14 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी यानाला जोडलेल्या मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरे त्या वेगळा करण्यात आला होता. तेव्हा चंद्रावर ध्वज फडकवणारा भारत हा जगातील चौथा देश बनला.

Chandrayaan 2 In Marathi – यानंतर भारताने 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2 ही मोहीम श्रीहरीकोटा आकाश केंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्ग 3 द्वारे प्रक्षेपण केले.

Chandrayaan 3 Information In Marathi

Chandrayaan 3 Information In Marathi – चंद्रयान 2 मोहीम 6 सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर बऱ्यापैकी अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली होती. चंद्रयान 3 चे प्रक्षेपण (chandrayaan 3 launch date and time) 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता श्रीहरिकोटा येथून झाले.

Chandrayaan 3 Information In Marathi

Chandrayaan 3 Objectives In Marathi – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चंद्रयान 3 या मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.

1. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.

2. चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.

3. चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण.

इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.

Chandrayaan 1 And 2 Difference in Marathi – चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 हे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार होते. चंद्रयान 3 हे प्रत्यक्षात चंद्रावर उतरून आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. चंद्रयान 3 हे चंद्रयान 2 सारखेच असणार आहे. परंतु यावेळी फक्त लॅन्डर ,रोवर आणि प्रोपलशन मॉडेल असणार आहे.

Chandrayaan 3 Purpose Of The Mission In Marathi – चंद्रयान 3 ही प्रॉपलशन मॉडेल लेंडर आणि रोव्हर हे चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत घेऊन जाईल आणि चंद्रयान 3 अगदी सहजपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल चंद्रयान 3 मध्ये ऑर्बिट पाठवले जाणार नाही. कारण चंद्रयान 2 च्या ऑर्बिट कडून यासाठी मदत घेतली जाणार आहे.

RelatedMoon Facts In Dutch language

पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून 100 किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. लँडर आणि रोव्हर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरणे अपेक्षित आहे.

जगभरात प्रतीक्षेत असलेल्या लूना 25 हे यान आणि भारतीय यान दोन दिवसाच्या फरकाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते.

पण आता हाती आलेल्या बातमीनुसार लूना 25 यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून रशियाची चंद्रमोहीम अर्धवट राहिली. परिणामी आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान 3 यानाकडे लागले आहे.

चंद्रयान 3 हे अंतराळयान 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. सर्व सुखरूप झाले तर भारत जगातील पहिला देश ठरेल, जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरला आहे.

सारांश

तर मित्रांनो, जगभरात प्रतीक्षेत असलेल्या चंद्रयान 3 यानाची 14 जुलै 2023 रोजी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत सर्व काही सुखरूप झाले आहे. परवा 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता भारतीय यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

आशा करतो, की चंद्रयान 3 मोहीम माहिती मराठी (chandrayaan 3 info in marathi) तुम्हाला नक्कीच आवडेल असेल.

Leave a Comment