महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी – chikhaldara hill station Maharashtra information in marathi

Chikhaldara hill station Maharashtra information in marathi – महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणांपैकी चिखलदरा हे एक ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्याला विशिष्ट असे निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे. ज्यामध्ये समुद्र, नद्या, डोंगर, अभयारण्य आणि थंड हवेचे ठिकाण आहेत.

चिखलदारा हे सातपुडा पर्वतरांग वर आहे. चिखलदारा हे समुद्रसपाटीपासून 3666 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी निसर्गाचे सुंदर रुप पाहायला मिळते. या शिखराला विदर्भाचे नंदनवन असे संबोधले जाते.

उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात. आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी – chikhaldara hill station Maharashtra information in marathi जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी – chikhaldara hill station Maharashtra information in marathi

नावचिखलदरा
ठिकाणउमरेड रोड, चूर्णी अमरावती
प्रकारथंड हवेचे ठिकाण
प्रसिध्दभीमकुंड
विदर्भाचे नंदनवन
जवळील पर्यटन स्थळेगाविलगड किल्ला
chikhaldara hill station Maharashtra
chikhaldara hill station Maharashtra

कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात आहे. हैदराबाद रेजिमेंटच्या कॅप्टन रॉबिन्स याने इसवी सन 1823 मध्ये चिखलदराला जगासमोर आणला. त्याअगोदर हे ठिकाण जास्त प्रमाणात लोकांना माहीत नव्हते. कॅप्टनचा रॉबिन्स यांचा असं म्हणणं होतं की चिखलदराचे नैसर्गिक प्रतिकृती त्यांना इंग्लंड ची आठवण येऊ देत नाही.

हे ठिकाण प्रामुख्याने नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते त्याच बरोबर या ठिकाणाला पौराणिक पाया देखील आहे. चिखलदरा याची एक आख्यायिका आहे. या आख्यायिका महाभारतातील आहे. वनवास मध्ये असताना पांडवांनी या ठिकाणी निवास केला होता. किचक याचा वध भीमाने येथे केला होता आणि त्याला जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले ती दरी म्हणजेच कीचकदरा आताची चिखलदरा.

ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकले होते, ती दरी आणि ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली होती ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील चिखलदरा हिल स्टेशन प्रेक्षणीय स्थळे माहिती मराठी

Chikhaldara waterfall
Chikhaldara waterfall

अमरावती जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे (Chikhaldara points In marathi) – चिखलदरा आहे सातपुडा पर्वत रांगा वर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी प्राचीन किल्ले, तलाव, आणि हिरवेगार निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळते. याला विदर्भाचे नंदनवन असे देखील म्हणतात.

चिखलदरा चे हवामान नेहमी थंड असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केला आहे. चिखलदर्‍याच्या घाटात आणि चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर वाघ आणि अस्वल दिसतात. त्याचबरोबर मोर, रानकोंबडा, अस्वले पाहायला मिळतात.

पंचबोल किंवा इको पॉईंट – हा पॉईंट तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल कारण इथे चारही बाजूने डोंगराने वेढलेले खोल दरी आहे आणि धबधबा देखील आहे. या दरी मुळे मोठ्याने आरोळी केली तर ती प्रतिध्वनी च्या स्वरूपात पाच ते सहा वेळा ऐकू येते.

चिखलदरापासून थोड्याच अंतरावर विराट देवीचे मंदिर आहे. त्याचबरोबर नर्सरी गार्डन पाहायला मिळेल.याला वनविभागाने विकसित केले आहे त्यात लहान मुलांसाठी रेल्वेची सोय केली आहे.

अजून बरेच पॉइंट पाहायला मिळतात – प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट अजून मंकी पॉईंटलॉग पॉईंटलेन पॉईंटवैराट पॉईंटहरिकेन पॉईंट पाहायला मिळतात.

चिखलदरा जवळील पर्यटन स्थळे माहिती मराठी

गाविलगढ किल्‍ला – गाविलगड किल्ला चिखलदरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. याच्या शेजारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. किल्ल्याच्या भोवताली घनदाट जंगल आहे. गाविलगड किल्ला विदर्भाचे भूषण आहे.

किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक तलाव आणि 10 तोफा आहेत.घोडे, हत्ती, कोरीव काम यावर उर्दू आणि अरबी भाषेत मजकूर आहे.

या ठिकाणी एक राणीमहाल आहे त्याच्यापासून 45 किलोमीटर अंतरावर विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणजेच छोटा किल्ला आहे.किल्ल्याला 13 मार्च, इसवी सन 1913 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा कसे पोहचाल ?

चिखलदरा महाराष्ट्रातील नॅशनल हायवे ला जोडल्यामुळे भेट देताना काहीच अडचण येत नाही. याठिकाणी येताना तुम्ही रेल्वे, विमान आणि राष्ट्रीय महामार्ग चा वापर करू शकता.

पुण्यापासून चिखलदरा 593 किलोमीटर असून खाजगी गाडीने जाण्यासाठी 13 तास लागतात. मुंबईपासून चिखलदराचे अंतर 663 किलोमीटर आहे त्यासाठी चौदा तास लागतात. अमरावती ते चिखलदरा 82 किलोमीटर आहे येथून चिखलदरा ला जाण्यासाठी फक्त दोन तास लागतात.

सर्वात जवळचे विमानतळ नागपुर आहे तेथून दररोज मुंबई, दिल्‍ली, कोलकाता, बेंगळुरु, रायपुर ,इंदोर या शहराशी जोडलेले आहे.

सारांश

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी – chikhaldara hill station Maharashtra information in marathi याबद्दल आपण या लेखात माहिती पाहिलेले आहे. या लेखात चिखलदऱ्याचे नैसर्गिक वातावरण, पौराणिक महत्व, आणि तेथील वन्यजीव आणि किल्ले याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.

चिखलदरा मराठी माहिती – Chikhaldara information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणरे प्रश्न

चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा आहे.

चिखलदरा उंची किती आहे ?

चिखलदरा हे समुद्रसपाटीपासून 3666 मीटर उंचीवर आहे.

मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अमरावती

पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?

पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान

पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पेंच अभयारण्य नागपूर जिल्ह्यात आहे.

गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

गाविलगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात आहे.

कोकरु आदिवासी असलेले चिखलदरा धारणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोकरु आदिवासी असलेले चिखलदरा धारणी अमरावती जिल्ह्यात आहे.

अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?

अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर बैराट शिखर आहे. याची उंची 1177 मीटर इतकी आहे.

हे देखील वाचा

Leave a Comment