कंपनीसाठी योग्य डोमेन नाव कसे निवडावे ?

how to choose a domain name for your business marathi – सुरुवातीच्या काळात व्यवसाय पारंपारिक पद्धतीने केले जायचे. पण इंटरनेटच्या शोधानंतर व्यवसायाची व्याप्ती वाढली, अन् व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ लागला. यामुळे व्यवसाय जागतिक पातळीवर आला.

इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन विश्वात अनेक मोठमोठ्या व्यवसाय संस्था उदयास आल्या. इंटरनेटचा वाढता वापर आणि बदलते तंत्रज्ञानामुळे अनेक व्यवसाय ऑफलाईन ते ऑनलाईन झाले आणि होत आहेत.

व्यवसाय ऑनलाईन सुरू करण्यासाठी एक डोमेन नाव घ्यावे लागते. या नावातून कंपनीचे स्वरूप आणि उत्पादन याविषयी ग्राहकाला कल्पना येईल याची खात्री करावी.

कंपनीसाठी योग्य डोमेन निवडताना अनेकांना अडचणी येतात, त्यामुळे या लेखातून आपण कंपनीसाठी योग्य डोमेन नाव कसे निवडावे (how to choose a domain name for your business marathi) याविषयी मार्गदर्शन करणार आहोत.

डोमेन म्हणजे काय (what is domain name marathi)

डोमेन म्हणजे वेबसाईटचे नाव होय. या नावाने वेबसाईट ओळखली जाते. डोमेन नाव उपयोगात आणण्यासाठी त्याला सर्व्हरशी जोडावे लागते. म्हणजेच डोमेन आणि होस्टिंग एकमेकांशी जोडलेले असतात.

शीर्ष स्तरीय डोमेन आणि देश कोड उच्च स्तरीय डोमेन हे डोमेन नावाचे मुख्य प्रकार आहेत. टॉप लेव्हल डोमेन जास्त लोकप्रिय आहे, त्यामुळे याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंवा देशांतर्गत व्यवसाय किंवा संस्थेसाठी या डोमेनची निवड केली जाते.

देश कोड उच्च स्तरीय डोमेन हे एका विशिष्ट देशासाठी वापरले जाते. जर समजा तुमचा ग्राहकवर्ग फक्त भारत देशापुरता मर्यादित असेल तर, तुम्ही .in हे देश कोड असलेले डोमेन वापरू शकता.

कंपनीसाठी योग्य डोमेन नाव कसे निवडावे (how to choose a domain name for your business marathi)

how to choose a domain name for your business marathi

तुमचा ब्रँड किंवा व्यवसाय स्थापित करण्यासाठी डोमेन नाव निवडणे ही सर्वात महत्वाची पायरी आहे. कारण डोमेन नाव हे तुमच्या कंपनीची ऑनलाईन ओळख किंवा ब्रँड असते.

यामुळे कंपनीसाठी योग्य डोमेन नाव निवडताना खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे ठरते.

1. जेव्हा डोमेन नावात कमीत कमी अक्षरे पाहिजे. कारण लहान नावे लक्षात ठेवणे आणि टाइप करणे सोपे जाते. सोपे आणि सरळ असलेले नाव लोकांना लक्षात ठेवणे अवघड वाटत नाही.

2. डोमेन नावातून आपल्या वेबसाईट आणि व्यवसायाचे स्वरूप लक्षात आले पाहिजे. यासाठी तुमचे उत्पादन काय आहे ? याचा विचार करा. उदा. जर तुमचा बेकरीचा व्यवसाय असेल, तर तुम्ही Bakery.com असे डोमेन घेऊ शकता.

3. जर तुम्हाला पाहिजे असलेले नाव उपलब्ध नसेल किंवा कुणी अगोदरच खरेदी केले असेल, तर तुमच्या व्यवसायाशी संबंधित keyword research करून डोमेन निवडावे.

4. तुम्ही जे डोमेन नाव घेणार आहात, ते दुसऱ्या कंपनी, ब्रँड किंवा ट्रेडमार्क अंतर्गत रजिस्टर केलेले नसावे. कंपनीचे नावावरून तिचे स्वरूप लक्षात येईल, असे डोमेन नाव निवडावे.

5. स्वतःच्या व्यवसायाची व्याप्ती लक्षात घ्यावी. अर्थात जर तुमचा व्यवसाय फक्त एका देशापर्यंत मर्यादित असेल तर तुम्ही देश कोड उच्च स्तरीय डोमेन निवडू शकता. उदा. तुमचा अपेक्षित ग्राहक वर्ग फक्त भारत देशात असणार असेल, तर तुम्ही .in किंवा co.in डोमेन निवडावे.

6. पण जर तुमचा अपेक्षित ग्राहक वर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, तुम्ही .com सारख्या शीर्ष स्तरीय डोमेनचा विचार करू शकता.

डोमेन खरेदी करताना या चुका टाकाव्यात (Mistakes To Avoid When Buying Your Domain)

1. तुमच्या डोमेन नावात क्रमांक (number) किंवा डॅश (-) हे वर्ण वापरू नये. कारण हे टाइप करणे युजरला कंटाळवणे ठरते. तसेच जर तुमच्या नावात क्रमांक किंवा डॅश असेल तर कदाचित तुमच्या वेबसाइट किंवा व्यवसायाची विश्वासार्हता कमी होते.

2. डोमेन नाव खरेदी करताना नावाचा उच्चार आणि स्पेलिंग बरोबर असणे गरजेचे असते. एकाच नावाच्या विविध स्पेलिंग वापरून घेतलेले नाव व्यवसायाची विश्वासार्हता कमी करते.

3. एखाद्या मोठा ब्रँड किंवा ट्रेडमार्क असलेले डोमेन नाव कधीही तुमच्या कंपनीसाठी वापरू नये. नाहीतर तुम्हाला कायदेशीर कारवाई प्रकियाला सामोरे जावे लागू शकते.

सारांश

या लेखातून आपण कंपनीसाठी योग्य डोमेन नाव कसे निवडावे (how to choose a domain name for your business marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती विषयी काही शंका असतील, तर आम्हाला नक्की कळवा. तुमच्या शंकाचे निरासन करताना आम्हाला नक्कीच आनंद होईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

Best free domain name generator

leandomainsearch ही वेबसाइट तुम्हाला डोमेन नावाची निवड करताना मदत करेल. यावर जाऊन तुम्ही keywords related डोमेन नाव निवडू शकता.

डोमेन खरेदी कशी करावी ?

डोमेन नावाची खरेदी करण्यासाठी तुम्हाला डोमेन रजिस्टर करणाऱ्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला आवश्यक असलेले नाव निवडून बिलिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुम्ही निवडलेले डोमेन नाव तुमच्या खात्यात जमा केले जाते.

Best domain provider in india 2022

1. GoDaddy
2. Hostinger
3. Milesweb
4. Bigrock
5. Namecheap
6. Domain
7. Blue host
8. Google
9. Cloudflare
10. Hostgator

पुढील वाचन :

  1. कंपनी संस्था माहिती मराठी
  2. कारखान्याचा परवाना कसा काढायचा ?
  3. ई-कॉमर्स माहिती मराठी माहिती
  4. वेब होस्टिंग काय आहे ?
  5. वेब होस्टिंग व्यवसाय कसा सुरु करावा ?

Leave a Comment